नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,घरामध्ये पैशाची तंगी असणे, पैसा येतो आणि जातो, आलेला पैसा लगेच निघून जातो. या सारख्या अनेक समस्या देवी लक्ष्मीशी संबंधित आहेत. मित्रांनो तंत्र-मंत्र शास्त्रानुसार चलन म्हणजे काय तर जे पैसे असतात, त्यामध्ये प्रामुख्याने नोटांऐवजी जे सिक्के असतात.
त्यांचा एक महत्वाचा उपाय टोटके तंत्र-मंत्र शास्त्रात सांगितलेले आहेत. हे टोटके जर आपण योग्य रीतीने केले , हे टोटके सिद्ध झाले तर आपल्याला खूप पैशांची प्राप्ती होईल. घरात आलेला पैसा हा दिवसेंदिवस वाढत राहील. या लेखात 10 रुपयाच्या सिक्काचे काही प्रभावशाली टोटके जाणून घेणार आहोत.
हा उपाय करण्यासाठी पौर्णिमा, अमावस्या,नवरात्र, या तिथी सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत. ह्या तिथी खूपच प्रभावशाली असतात मात्र नवरात्रीतल्या नऊ दिवसात सुद्धा या सिक्कांचे टोटके अति प्रभावशाली पद्धतीने कार्य करतात.
कोणत्याही नवरात्रीतील दिवशी विशेष करून नवरात्री नवमीला आपण या सिक्कांचे टोटके नक्की करावेत. हा उपाय करण्यासाठी एक लवंग तुटलेली न फुटलेली आणि ज्या लवंगला समोर फुल आहे, अशी लवंग आणि एक लाल कपडा ही तीन सामग्री वापरून आपण माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे.
लक्ष्मीची नवरात्रीमध्ये सकाळी संध्याकाळी हा उपाय करू शकतो. हा उपाय रात्री केला तर अतिउत्तम आहे. आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. हळदीकुंकू वाहायचे आहे.
अगरबत्ती धूप लावायचे आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे. मातेसाठी नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि सोबत ही पूजा करत असताना मातेसमोर एक लाल कपडा अंथरून त्यावर एक रुपयाचा शिक्का आणि त्या शेजारी किंवा सिक्कावर एक साबूत लवंग आपण ठेवायचे आहे.
आणि “ओम श्रीम श्रीये नम:”, हा लक्ष्मी बीज मंत्र आहे, याचा 108 वेळा जप करायचा आहे. माते समोर नतमस्तक होऊन घरातून गरीबी निघून जावी, घरामध्ये पैसा यावा अशा प्रकारची प्रार्थना आपण नक्की करायची आहे.
आणि त्यानंतर लाल कपडा मध्ये हे सिक्के बांधून ही लवंग दुसऱ्या दिवशी त्या लाल कपड्यात बांधून आपल्या पैसे ठेवण्याच्या जागी आपण ती पुरचुंडी ठेवायची आहे.
हा उपाय आपण पौर्णिमा अमावस्या, नवरात्रीत करू शकतो.
पण पोर्णिमा तिथी माता लक्ष्मीची सर्वात लोकप्रिय तिथी आहे. या प्रत्येक पौर्णिमेस हा उपाय पुनरावृत्त करायचा आहे. माता लक्ष्मीची पौर्णिमेस विधिवत पूजा करून त्यांच्यासमोर लाल कपडा अंथरायचा व सिक्का ठेवायचा व लवंग पुजून विधिवत पूजा करा.
ओम नमः लक्ष्मी भ्यो नमः या मंत्राचा सातत्याने 108 वेळा जप करावा.हा उपाय केल्याने पैसा खेचून येतो. पैसा आकर्षित होतो. हा उपाय करण्यासाठी आपण दहा रुपयांचा सिक्का ही वापरू शकतो.
एक रुपयाचा ही वापरू शकतो त्यानंतर दुसरा उपाय असा आहे की ,आपण दहा रुपयाच्या शिक्क्यावर कुंकुवाच्या सहाय्याने स्वतःचे पहिले अक्षर, स्वतःच्या नावाचं पहिलं अक्षर लिहायचे आहे.
जर आपण देवनागरी लिपीने लिहिले तर अति उत्तम आहे असे पहिले अक्षर सिक्कावर लिहा व पूजा संपन्न झाल्यानंतर हा एक रुपयाचा शिक्का आपण आपल्या घराच्या छतावर ठेवायचा .
रात्रभर हा सिक्का ज्या ठिकाणी पाण्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीवर ठेवायचा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे लवकर जाऊन स्नान वगैरे ब्रह्म मुहूर्तावर आपण हा सिक्का घरी परत आणायचा आहे.
घरी परत आल्यावर हा सिक्का तिजोरीमध्ये बॉक्समध्ये सांभाळून ठेवायचे आहे. हा सिक्का हरवणार नाही, खर्च केला जाणार नाही याची थोडीशी काळजी मात्र नक्की घ्यायची.
ज्यांच्या घरामध्ये पैशांची अतिशय कडकी आहे,पैसा टिकत नाही, पैसा येतो आणि जातो आहे. त्या ठिकाणी लक्ष्मी टिकत नाही अश्या वेळी आपण हा उपाय करू शकता.
आपण अजून एक उपाय करू शकतो.
यासाठी आपल्याला मातीचा एक कलश म्हणजेच मातीचे मडके घ्यायचे आहे आणि मडके स्वच्छ धुऊन घ्या, त्या मातीच्या मडक्यात कुंकवाने स्वस्तिक आपण काढायचे आहे, स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला दोन दोन उभ्या रेषा नक्की द्या आणि या मडकेमध्ये आपण जल म्हणजे पाणी भरायचे आणि एक शिक्का या पाण्यामध्ये टाकायचा आहे.
तुम्ही एक रुपया किंवा दहा रुपये सिक्का सुद्धा टाकू शकता. संपूर्ण दिवसभर हे मडके, हा कलश माता लक्ष्मी समोर ठेवायचा आहे. जर तुम्हाला पैसा हवा आहे माता लक्ष्मीची पूजा करा.
संपूर्ण दिवस आणि रात्र मातेच्या चरणी हे मडके असेल आणि दुसऱ्या दिवशी आपण या मडक्यातील पाणी, कलशातील पाणी एखाद्या झाडाच्या बुंध्याशी टाकायचा आहे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments