नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,श्री स्वामी समर्थ ,प्रत्येक हिंदूच्या दारासमोर तुळस ही असते. कारण आपल्या संस्कृतीत तुळशीला पूजनीय आणि पवित्र तसेच देवी मानले गेले आहे.
यामुळे आपल्या दारात जर तुळशी वृंदावन असेल.तर तुम्हाला या गोष्टींची आठवण ठेवावीच लागेल.कारण जर या गोष्टींकडे लक्ष ठेवले, तर आपल्यावर सर्व देवी त्यांची कृपा होते.
तसेच घरात सकारात्मक व आनंदी वातावरणाची निर्मिती होते आणि घरात पैशाची अडचण राहत नाही.
घरात इथे ठेवा 1 तुळशीचे पान, घरात पैसा कधीच कमी पडणार नाही. हा उपाय केल्याने तुमच्या घरात बरकत राहील, धनधान्याची कमी राहणार नाही.
तुळशी म्हणजेच लक्ष्मी स्वरूप असते, आपल्या घराबाहेर असलेली तुळशी आपल्या घरातले संकेत दर्शवित असते, ज्यांच्या घराबाहेर तुळशी नेहमी वाळत असते, सुकून जात असते.
त्या घरात पैसा टिकत नाही. त्या घरी लक्ष्मीचा वास नसतो, याउलट ज्या घरात तुळशी बहरलेली असते, तिथे पैसा बरकत सुख-समृद्धी लक्ष्मीचा वास सगळं काही असतं.
म्हणून तुळशीचे महत्त्व खूप जास्त आहे आणि हा सुद्धा तुळशीच्या पानांचा एक उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता आणि कोणत्याही वेळी करू शकता.
सोमवारपासून रविवारपर्यंत कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता.हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पाच पानं तुमच्या तुळशीवृंदावन मधून तोडायचे आहे, फक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुळशीचे पानं तोडत असताना,
त्या दिवशी एकादशी नाही ते लक्षात घ्या, कारण एकादशीला तुळशीला हात सुद्धा लावायचा नसतो आणि दुसरी गोष्ट अशी की संध्याकाळी आणि रात्री तुळशीला हात लावायचा नाही.
6 किंवा 7 वाजेनंतर तुम्ही तुळशीला हात नका लावू, तुम्हाला तुळशीचे पान तोडायचे आहे तर दिवसा तोडा आणि एकादशी नाहीये हे लक्षात घेऊनच तोडा.तुम्ही एकादशी असेल.
आणि रात्री तुळशीचे पान तोडायचं नाही हा नियम फक्त लक्षात ठेवा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त पाच तुळशीचे पानं घेऊन देऊघरात बसायचं आहे आणि देवासमोर ही पाच तुळशीचे पानं ठेवायचे आहेत.
तुळशीचे पानं घेऊन झाल्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे, जप झाल्यानंतर तुम्ही त्यानंतर अक्षता हळदी वहा,
तुळशीच्या पानांच पूजन करायचे आहे आणि आपल्याला हात जोडून देवाला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरात बरकत राहुदे.
धनधान्याची कमी राहू देऊ नको आणि अन्न पैसा टिकून राहुदेत, सुख-समृद्धी राहुदे, लक्ष्मीचा वास राहू दे अशी मनोमन प्रार्थना करायची आहे. त्यानंतर ती पाच तुळशीचे पानं घ्या ,
लगेचच एक तुळशीच पान तुमच्या तिजोरीत तुम्ही जिथे पैसा – दागदागिने ठेवता तिथे तुम्हाला एक तुळशीचे पान ठेवायचे आहे.
हिंदू शास्त्रांमध्ये तुळशी विषयी या महत्त्वाच्या काही बाबी सांगितल्या केलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने आपण कधीही तुळशीची पाने कधीही तोडतो व आपल्या उपयोगात आणतो किंवा पुजेत वापरतो.
मात्र परंतु हिंदु शास्त्रात काही दिवस तुळशीची पाने तोडण्यासाठी निषिद्ध सांगितलेले आहेत. यामध्ये एकादशीला व रविवारी तुळशीची पाने तोडू नयेत तसेच सूर्य ग्रहण व चंद्र ग्रहणाच्या दिवशी हे तुळशीचे पाने तोडू नयेत.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments