नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,26 सप्टेंबर पासून नवरात्रीची सुरुवात झाली आहे, देवी दुर्गेची विशेष आराधना केली जाते. तसं तर प्रत्येक महिन्यातील अष्टमी ही तिथी ही महत्त्वाची मानली गेली आहे.
परंतु माघ महिन्यातील दुर्गाष्टमी विशेष महत्व आहे. नवरात्रीमुळे दुर्गा अष्टमी चे महत्व ही आणखीनच वाढलं आहे. या दिवशी मनोभावे दुर्गा मातेची उपासना करते आणि पूजा आराधना करते, त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि माता दुर्गा त्या भक्तांना सर्व संकटातून मुक्त करते.
तसेच आपल्या जीवनातील अडचणींचा नाश करण्यासाठी दुर्गाष्टमी दिवशी आपण काही विशेष उपाय सुद्धा करू शकतो. या दिवशी केलेले उपाय हे त्वरित फलदायी ठरतात.
तुमच्या जीवनात जर धनसंबंधित समस्या असतील, घरात पैसा टिकत नसेल किंवा नोकरीमध्ये काही अडचणी येत असतील. तसंच आपल्या घरामध्ये धन आणि पैसा संपत्ती सुख-समाधान समृद्धी यावी यासाठी दुर्गा अष्टमी या दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे.
या दिवशी दिवसभरात कधीही हा उपाय आपण करू शकतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला स्वच्छ स्नान करायचा आहे आणि शक्य असेल तर लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचा आहे.
कारण लाल रंग हा दुर्गामातेला अत्यंत प्रिय आहे आणि त्याचा अर्थ लाल रंग हा धन पैसा वैभव खेचून आणतो. धनाला आकर्षित करणार आहे. त्यामुळे शक्यतो लाल रंगाचे वस्त्र यावेळी परिधान करायचा आहे.
आपल्या आसपास जिथे कुठे दुर्गा मातेचे मंदिर असेल किंवा माता लक्ष्मीचे मंदिर असेल त्या मंदीरात जायचा आहे आणि जाताना 2 विड्याची पाने आणि 2 अखंड न तुटलेले साबुत लवंग.
आणि दोन विलायची आपल्याला घ्यायचे आहेत आणि हे घेऊन दुर्गा मातेच्या मंदिरात जायचे आहे.
मग तिथे गेल्यानंतर गाईच्या तुपाचा एक दिवा आपल्याला लावायचा आहे. आता हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करून दुर्गामातेची विधिवत पूजा करायचे आहे. हे सर्व पूजा झाल्यानंतर आपण जी विड्याचं पान आनलेला आहे.
त्या सोबत 2 लवंगा आणि 2 विलायची ठेवून हा विडा दुर्गा मातेचे चरणाजवळ आपल्याला अर्पण करायचा आणि हा विडा अर्पण करताना एक मंत्र सुद्धा आपल्याला म्हणायचं आहे.
मंत्र म्हणजे,”सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।।”
हा मंत्र आपल्याला फक्त 1 वेळा बोलायचं आहे आणि तो विडा दुर्गामातेच्या चरणी जवळ अर्पण करायचा आहे. मग गंध अक्षता फुले अर्पण करायचे आहे आणि हात जोडून आपल्या मनातील ची इच्छा आहे.
हे दुर्गामाते समोर मनोमन बोलून दाखवायचे आहे. आपल्या जीवनातील सर्व दुःख संकटांचा नाश व्हावा आणि आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी धना ऐश्वर्या व तसेच प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं यासाठी प्रार्थना करायची आहे.
मग त्यानंतर तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दुर्गा मातेला अर्पण करायचा आहे. हे सर्व झाल्यानंतर दुर्गामातेच्या नवार्ण मंत्राचा आपल्याला मंदिरामध्ये बसूनच करायचा आहे.
जर तुम्हाला मंदिरमध्ये बसून मंत्र जप करणे शक्य नसेल, तर तुम्ही घरी येऊन सुद्धा आपल्या देवघरासमोर बसून हा मंत्र जप करू शकता.
फक्त लक्षात ठेवा की, मंत्र जप करताना आपणास आसन नक्कीच घ्यावे. हा मंत्र म्हणजे, “ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चै ।”, मग हा मंत्रजप झाल्यानंतर सगळे आपापल्या घरी निघून यायचा आहे.
पूर्ण विश्वासाने श्रद्धेने हा उपाय करून पहा, दुर्गा मातेच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व संबंधित समस्या दूर होतील…..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments