नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, यंदा उत्पत्ती एकादशीच्या दिवशी पाच शुभ योग तयार होत असल्याने या व्रताचे महत्त्व अधिकच वाढले आहे. उत्पत्ती एकादशीचे व्रत दरवर्षी कार्तिक कृष्ण पक्ष एकादशीला केले जाते.
या दिवशी भगवान विष्णू आणि एकादशी मातेची पूजा केली जाते. पौराणिक कथेनुसार, एकादशी माता उत्पत्ती एकादशीच्या तिथीला अवतरली होती, म्हणून या एकादशीला उत्पत्ती एकादशी व्रत म्हणतात.
कार्तिक कृष्ण पक्ष एकादशी 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:29 वाजता सुरू होते आणि 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:41 वाजता समाप्त होते. पंचांगात सूर्योदयापासून सूर्योदयापर्यंत तिथी मोजली जाते.
अशा स्थितीत उत्पत्ती एकादशी रविवार, 20 नोव्हेंबर रोजी आहे. 20 नोव्हेंबर रोजी उत्पत्ती एकादशीच्या दिवशी पाच शुभ योग तयार होत आहेत, ज्यात प्रीती योग, आयुष्मान योग, द्विपुष्कर योग, अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग यांचा समावेश आहे.
या एकादशीचा दिवशी आपण सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून, स्वच्छ वस्त्र परिधान करून, त्यानंतर नित्यनियमाप्रमाणे आपली देवपूजा करावी.तसेच भगवान श्रीहरी विष्णुची कोणत्याही रुपाची पूजा करावी.
तसेच यादिवशी आपल्याला एक विशेष उपाय करायचा आहे. जेणेकरून या घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे ती नष्ट व्हावी, यासाठी आपल्याला अत्यंत सोपा असा हा उपाय करायचा आहे.
यासाठी एका वाटीत आपल्याला शुद्ध जल घ्यायचे आहे आणि त्यामध्ये गंगाजल देखील आपण थोडेसे टाकायचे आहे. त्याचबरोबर थोडेसे काळे तीळ अगदी अर्धा चमचा काळे तीळ आपण या पाण्यामध्ये टाकायचे आहे .
आणि हे पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचे आहे. आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आणि मुख्य प्रवेशद्वारावर ती सगळीकडे आपल्याला हे पाणी शिंपडायचे आहे.
जेणेकरून जी काही नकारात्मक आपल्या घरामध्ये असेल ती नष्ट होईल, अशा पद्धतीने सगळ्या घरांमध्ये आपल्याला हे पाणी शिंपडायचे आहे. त्यानंतर जे पाणी शिल्लक राहील ते आपण घरातील कुठल्याही झाडाला अर्पण करीत आहे.
लक्षात ठेवा हे पाणी आपल्याला तुळशीला अर्पण करायचे नाही, दुसरी कुठली आपल्या घरामध्ये झाड असतील तर त्या झाडांना आपण हे उरलेले जे पाणी आहे ते अर्पण करायचा आहे.
तर अशा पद्धतीने या दिवशी आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये या पाण्याचा शिरकाव करायचा आहे, हे पाणी सगळ्या घरांमध्ये शिंपडायचे आहे.
दरम्यान, हा सोपा उपाय केल्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि तुमच्या जीवनात जे काही संकट आहेत ते सर्व दूर होतील. पितृदोष तुमच्या कुंडलीमधून नष्ट होईल, चारही बाजूंनी पैसा येऊ लागेल.
बऱ्याचदा घरामध्ये पैसा मार्ग आहे तो खंडित झालेला असतो, तर अशावेळी आपल्या घरामध्ये पैसा येत नाही. सतत पैशाची चणचण भासत राहते, जर अशी समस्या तुम्हाला असेल तर हा उपाय करा.
माता लक्ष्मीची कृपा आशीर्वादाने पिचड यांच्या कृपाशीर्वादाने तुमच्या घरामध्ये धन-वैभव आणि पैसा कधीही कमी पडणार नाही.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments