नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, आपण पूर्ण श्रद्धेने लक्ष्मीव्रत केल्याने जीवनातील आर्थिक अडथळे दूर होतात. संपत्ती आणि आनंद आणि समृद्धी प्राप्त होते. कुटुंबात लक्ष्मीचे स्थिर निवासस्थान आहे.
जे लोक व्यवसायात नफा कमवू इच्छितात, त्यांच्यासाठी हे व्रत विशेषतः फलदायी मानले जाते. उपवासाच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या पूजेबरोबरच श्री यंत्राची पूजा करण्याचे अनेक फायदे सांगितले जातात.
जर हे महिलांनी लक्ष्मीमातेचे व्रत अवश्य केले पाहिजे. हे व्रत अगदी सरळसोपे असल्याने,जर विवाहित महिलांनी हे व्रत केल्यास, त्यांच्या घरची परिस्थिती सुधारेल, घरात सुख-समृद्धी नांदेल, लक्ष्मीचा वास होईल .
तसेच पैसा टिकून राहील. तिच्या नवऱ्याची बिझनेस किंवा नोकरीमध्येप्रगती होईल.याशिवाय मुलांचे शिक्षणात लक्ष लागेल आणि त्यांची सुद्धा प्रगती होईल.
आपण हे व्रत कोणत्याही महिन्यापासून किंवा मार्गशीर्ष महिन्यात सुरू करू शकतो,पण हे व्रत सुरू केले पाहिजे. तसेच जर हे पवित्र व्रत आपण मार्गशीर्ष महिना सुरू केल्यास, याचा अधिक लाभ होतो.
त्यामुळे हे व्रत आपण या महिन्यात कोणत्याही गुरुवारी करण्यासाठी, आपल्याला फक्त या दिवशी उपवास करायचा आहे. या दिवशी सकाळी उठल्यानंतर अंघोळ झाल्यावर, लक्ष्मी मातेचे आपल्या देवघरात दर्शन घेऊन,त्यांना प्रार्थना करून, व्रताला सुरवात करावी.
तसेच याशिवाय त्या गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला फक्त श्रीसूक्तचे पूर्ण वाचन करायचे आहे. कारण त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यास आणि माता लक्ष्मीचा वास होण्यास सुरुवात होते.
तुम्ही या दिवशी दुसरी कोणतीही पोथीचे वाचन करू नये जसे की, महालक्ष्मी किंवा वैभव लक्ष्मीची पोथीचे वाचन करण्याऐवजी तुम्हाला फक्त दर गुरुवारी श्रीसूक्त एक वेळेस वाचायचे आहे .
तसेच यासाठी आपल्याला कोणतीही प्रकारची पूजा करण्याची गरज नाही, फक्त तुमच्या घरात लक्ष्मीची मूर्ती देवघरात असाली पाहिजे. उपवास केल्यानंतर संध्याकाळी त्याच मूर्तीसमोर अगरबत्ती,दिवा लावून एक वेळेस श्रीसूक्त वाचन करावे.
त्यानंतर, फक्त देवघरामध्ये थोडी साखर किंवा खडीसाखर ठेवावी. तसेच संध्याकाळी नैवेद्द म्हणून भाजी-चपाती किंवा वरण-भात तसेच गोड पदार्थ शिरा किंवा खीर करून देवीला नैवेद्य दाखवावा.
तसेच त्याच नैवेद्याने तुम्ही उपवास सोडावा. याशिवाय हा उपवास करत असताना, दिवसभर फराळ करून नये. तसेच मिठाचे पदार्थ, जेवण किंवा साबूदाण्याची खिचडी असे काहीतरी खाऊ नये.
या दिवशी फक्त फळं किंवा सरबत पिऊ शकता. हे व्रत आपण 3-4 गुरुवारी करावे. याशिवाय जर मध्ये काही प्रॉब्लेम आला तसेच काही अडचण आली,त्या वेळेस फक्त उपवास करावा आणि पण श्रीसूक्तचे वाचाण करू नये.
मग गुरुवारी हे व्रत पूर्ण झाल्यानंतर, शेवटच्या गुरुवारी काही गोड पदार्थ करून माता लक्ष्मीला संध्याकाळी नैवेद्द दाखवा तसेच पुरणपोळी करून साध्या पध्दतीने उद्यापन करावे.
तसेच पाच मुलींना घरी बोलावून त्यांना जेवण करू शकतो किंवा शक्य नसेल तर फक्त मंदिरात जाऊन काहीतरी दान-धर्म करावा.
सोप्या पद्धतीचे लक्ष्मीचे उपवास कोणत्याही महिन्याच्या गुरुवारपासून सुरू करू शकता.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments