स्वामीना याप्रकारे मनापासून हाक द्या, स्वामी नक्की तुमच्या मदतीला धावत येतील, स्वामी अनुभव…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक लीला केवळ अद्भूत आणि अचंबित करणाऱ्या आहेत. स्वामींचा भक्त परिवार मोठा आहे. केवळ महाराष्ट्रात नाही,

तर देशभरात श्री स्वामी समर्थ महाराजांचे मठ असल्याचे दिसते. यातून महाराजांचे चरित्र, त्यांचे संदेश, त्यांची शिकवण, त्यांच्या लीला यांचे श्रवण, कीर्तन, वाचन केले जात असते.

श्री स्वामी समर्थां महाराजांचे अनेक मंत्र आहेत आणि प्रत्येक मंत्राचा एक विशेष महिमा सांगितला जातो. तसेच प्रत्येक स्वामी मंत्राचे लाभ आणि फायदे हे वेगवेगळे आहेत. तसेच असाच एक विशिष्ट श्री स्वामी समर्थ महाराजाचा मंत्र आहे,

या तुम्हाला श्री स्वामी समर्थांचे मंत्र बद्दल माहिती सांगितली आहे, तीच या मंत्राचा जप केल्याने आपल्या घरात आजारपण दूर होण्यास सुरुवात होईल.

श्री स्वामी समर्थ, स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करते आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवते हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार करून आज मी तुम्हाला एका स्वामी सेवेकरी ताईंचा अनुभव त्यांच्याच शब्दात सांगणार आहे.

माझ्या बालपणीची मैत्रिणी तिचे नाव देखील राजश्री होते. पुण्यात सहस्त्रबुद्धे महाराज यांचा मठ आहे, कर्वे रोडला तिथे घेऊन जात असत. नंतर आम्ही दोघी चौथीला गेल्यापासून पुण्यातल्या बुधवार पेठतील स्वामींच्या मठात जावू लागलो.

मग आम्ही पाचवीला गेलो होतो, तेव्हापासूनच स्वामींचा गुरुवारचा वास करायला सुरुवात केली.

मग स्वामीच जणू काही आम्हाला वेडच लागलं होतं. कारण मंडईत गेलो की, जा स्वामींना भेटायला. तुळशी बागेत गेलो की जा स्वामींना भेटायला. मग दोघी स्वामींचा जप करायला सुरुवात केली.

मनाला येईल तेव्हा दोघीजणी जपाची माळ घेऊन जप करायचो. किती जप केला असेल हा हिशोबच आम्ही कधी ठेवला नाही. मग कालांतराने सवय झाली की काहीही झालं की स्वामींना मठात येऊन सांगायचं.

मग अगदी आनंदाची गोष्ट असूद्यात किंवा शाळेत काही झालेलं असूद्यात किंवा मैत्रीणमध्ये काही झालेलं असूद्या, माझी मैत्रीण राजश्री व मी दोघेही मठात स्वामी जवळ नेहमी असायचो.

मी अकरावीला गेले आणि तेव्हा मला एक स्थळ आलं इचलकरंजीत. मात्र तेव्हा मी फक्त सोळा वर्षांचे होते, तर स्थळ चांगलं होतं. माझी आई, मावशी ऐकायला तयारच नव्हत्या.

मी म्हणायचे की, मला लग्न करायचं नाहीये. ते ऐकून दोघी माझ्याशी चक्क आठ दिवस एकही शब्द बोलल्या नव्हत्या. माझी मैत्रीण राजश्री तीदेखील आई व मावशीच्या बाजूने बोलायची.

आता काय करायचं हेच मला समजत नव्हतं. मला फक्त एकमेव आधार होता तो म्हणजे स्वामी महाराज. स्वामी शिवाय माझं कोणीच नाही. मग त्या दिवशी बुधवार पेठेतल्या स्वामींच्या मठात दुपारी 4 वाजता गेले, मठात कोणीच नव्हतं.

स्वामीं समोर बसले स्वामींना सगळं काही सांगितलं. मग किती तरी वेळ तशीच बसले होते. स्वामींकडे बघत एकदम मागून अचानक एक बाबा आले एकदम उंच साडेसहा फूट उंची असेल.

खूप गोरे व खूप तेज होता त्यांच्या चेहऱ्यावर आणि पांढरे सोहळ नेसलेलं, भरदार छाती आता एकदम गोरे गुलाबी आणि ते माझ्याजवळ आले तेव्हा चंदन मिश्रित अष्टगंधाचा सुवासाची झुळूक आली.

मी खाली बसलेले होते, माझ्या मागून आले व डोक्यावर त्यांचा म्हणाले काळजी करू नको सगळं ठीक होईल. मी मान वर करून बघितलं. तर माझे डोळे पाण्याने डबडबले होते..

ते माझ्याकडे बघून हसले अरे मी लगेचच पटकन उठली व त्यांच्या पाया पडणार तेवढ्यात ते निघाले मी त्यांच्या मागे पळत गेले तर नंतर ते मला दिसलेच नाहीत, कुठे गायब झाले समजलेच नाही.

बाहेर दोघेजण बसलेले होते आणि मी त्यांना विचारलं की, इथे एक बाबा आले होते त्यांना तुम्ही पाहिलं का??. तर ते दोघेही म्हणाले की, इथे बाहेरून कोणीच आतमध्ये आलं नाही. आम्ही इथेच कधीपासून बसलेलो आहोत. मग लक्षात आलं की, ते दुसर-तिसर कोणी नसून स्वामीच होते.

मग मला एकदमच बांध फुटला व मी खूप रडले स्वामीं जवळ. नंतर मी घरी आले तर माझ्या आईने मला मिठी मारली आणि म्हणाली नाही करत तुझं लग्न तुला बळजबरी आम्ही करणार नाही.

त्यामुळे कुठलाही भक्त दुःखात असुद्या आज की संकटात बाबा हाकेला धावून येणारच. तुम्ही फक्त बाबांना साद घाला आणि मग बघा. तुम्हाला आपल्या स्वामी महाराजांचे कसे अनुभव येतात.

कालांतराने मग माझ्या आईने एकोणिसाव्या वर्षी माझं लग्न तो भाग वेगळाच. पण आज मी माझ्या संसारात सुखी आहे. स्वामींनी मला काहीच कमी पडू दिला नाही.

श्री स्वामी समर्थ. आजच्या अनुभवाचा बोध. आम्ही हे गुरु तत्व आहे, हे गुरु तत्व आजही सगुण रूपात दर्शन देत आहे. विविध शरीरातून आधार देत आहे आणि मार्गदर्शन करत आहे..

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!