जेव्हा एका भक्ताने स्वामींना विचारलं, नेहमी चांगल्या माणसां सोबत वाईटच का घडते?

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या मनात येते की, मी कोणाचे वाईट केले नाहीये, तरी माझ्यासोबत एवढे वाईट का होते? मी तर नेहमी देवावर विश्वास ठेवतो, त्याची सेवा करतो. तसेच चांगल्या मार्गावर चालतो, चांगले कर्म करतो तरीही माझ्यासोबत सतत वाईट का होते.

असे भरपूर विचार तुमच्या आमच्या भरपूर लोकांच्या मनात येतच असतात, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर स्वामी समर्थांनी दिलेले आहेत.

एकदा अर्जुन कृष्णाला एखादा विचारतात की, हे वासुदेवा नेहमी खऱ्या आणि चांगल्या मानसासोबत वाईट का होते?, यावर भगवान कृष्णाने एक गोष्ट सांगितली. या गोष्टीमध्ये सगळ्या मनुष्यांचे प्रश्नांची उत्तरे आहेत.

कृष्ण सांगतात की, एका नगरमध्ये 2 पुरुष राहत होते, पहिला व्यापारी होता आणि चांगला माणूस होता. त्यामुळे तो धर्म आणि नीतीचे पालन करायचा आणि चांगले कर्म करायचा.

देवाची भक्ती करायचा आणि मंदिरामध्ये जाऊन देवाची सेवा करायलचा. तसेच सगळ्या चुकीच्या कामापासून दूर राहायचा आणि जो दुसरा माणूस होता तो वाईट प्रवृत्तीचा होता, वाईट कामे करायचा खोटे बोलायचा. तो नेहमी मंदिरातून पैसे आणि चप्पल चोरायचा आणि वाईट संगतीत होता आणि व्यसनी होता.

मग एका दिवशी नगरमध्ये खूप जोरदार मुसळधार पाऊस सुरू झाला आणि मंदिरामध्ये कोणीच नव्हते हे बघून वाईट माणसाने मंदिरातले सगळे पैसे चोरले आणि तिथून पळून गेला.

थोड्या वेळा तोच व्यापारी त्या मंदिरात दर्शन करण्याच्या हेतूने गेला, तर त्यावर लोकांनी चोरीचा आरोप केला. त्या ठिकाणी असलेले सगळे लोक त्याला वाईट बोलू लागले, चोर बोलू लागले.

त्याच्या खूप अपमान केला. तो जसे तसे करून मंदिराच्या बाहेर आला, मग बाहेर येताच त्याला एका बैलाने मारले पायाखाली चिरडले. तो व्यापारी गंभीर जखमी झाला आणि तिकडे थोड्या अंतरावर त्या वाईट माणसाला पुन्हा एक पैशाने भरलेली एक पोटली मिळाली.

मग तो व्यक्ती विचार करू लागला, आजचा दिवस किती चांगला आहे, आता मंदिरातून धन मिळाले आणि आता पुन्हा एवढा पैसा मिळाला. जखमी झालेल्या माणसाने सगळे ऐकले आणि तो घरी आला आणि त्याने घरातून सगळ्या देवांच्या मुर्त्या फोटो काढून टाकले.

आणि देवतांवर रुष्ट होऊन जीवन जगू लागला. खूप वर्षानंतर त्या वाईट माणसाची आणि चांगल्या माणसांची मृत्यू झाली, तेव्हा ते यमराजासमोर गेले. तर चांगल्या व्यक्तीने यमराजाला प्रश्न विचारला मी तर नेहमी चांगले कर्म केले,

कोणाचे वाईट केले नाही तरी मला दुःख अपमान मिळाला आणि यानें अधर्म केला तरी याला धनाची पोटली मिळाली, असे का?

या प्रश्नावर यमराजाने उत्तर दिले, त्या दिवशी तुझ्या सोबत ही दुर्घटना घडली आणि बैलाने तुला उडवले, पायाखाली चिरडले. तो तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस होता, परंतु तुझा चांगला कर्मामुळे तुझी मृत्यू फक्त जखमेमध्ये प्रवृत्तीत झाली.

आणि या वाईट माणसाला राज योग मिळणार होता. मात्र त्यांच्या वाईट कर्मामुळे तो राज योग फक्त एका छोट्या धनाच्या पोटलीमध्ये परिवर्तित झाला.

स्वामी म्हणतात की, भगवंत तुमची साथ कोणत्या देतो हे सांगणे कठीण असते. परंतु तुमचे चांगले कर्म वाईट कर्मापासून तुम्ही दूर आहात, तर तुम्ही ज्यांची सेवा करत आहात, ज्यांची तुम्ही पूजन करत आहात.

त्याची कृपा तुमच्यावर नक्कीच होती. तसेच जीवनात येणाऱ्या समस्या दुःख, संकट किंवा वाईट काहीही तुमच्यासोबत होत असेल, त्यांना कधीही समजू नका की देव तू सोबत नाही.

कारण असू शकते की, यापेक्षा ही जास्त वाईट तुमच्या सोबत होत आहे. यापेक्षा जास्त संकट येणार होते, पण तुमच्या चांगल्या कर्मामुळे ते सगळे कमी झाले.
तुमच्या चांगल्या कर्मामुळे तुमच्या सेवेमुळे ते खूप कमी प्रमाणात तुमच्यापर्यंत आले आहे, तसे समजून आयुष्य जगा.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!