नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असा आशादायक, आश्वासक आणि सकारात्मकता प्रदान करणारा गुरुमंत्र देणारे स्वामी समर्थ महाराज यांचा आज पुण्यदिन आहे.
चैत्र वद्य तृतीयेला स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या अवतारकार्याची सांगता केली. स्वामी समर्थ महाराज भगवान श्रीदत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार अवतार आहेत, अशी मान्यता आहे. चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे दाखल झाले.
श्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्यानंतर स्वामी समर्थांच्या रूपाने दत्तात्रेय प्रकट झाले. मी नृसिंह भान असून, श्रीशैलम्जवळील कर्दळी वनातून आलो आहे, असे स्वामींच्या तोंडचे उद्गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सूचक आहेत.
निर्भीडता, स्पष्टवक्तेपणा आणि आत्मीयता, यांमुळे लाखो भक्तांना स्वामी समर्थांनी आपलेसे केले.
स्वामी समर्थांच्या विविध शिष्यांद्वारे स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे.
यातील प्रमुख शिष्य कोल्हापूरचे कुंभार स्वामी, पुण्याचे बिडकर महाराज, मुंबईचे श्रीतात महाराज, आळंदीचे नृसिंहसरस्वती, शंकर महाराज, वामनबुवा, गुलाबराव महाराज, केळकरबुवा, स्वामीसुत, आनंदभारती, गजानन महाराज, मोरेदादा, आनंदनाथ महाराज हे आहेत.
या शिष्यांनी विविध ठिकाणी स्वामी समर्थांचे मठ स्थापन केले आहेत. तसेच स्वामी मंदिरे आणि सेवा केंद्रे सुरू केली आहेत.
अशक्यही शक्य करतील स्वामी, या अगाध श्रद्धेने स्वामी भक्त महाराजांसमोर नतमस्तक होतात.
जर तुम्ही स्वामींची सेवा करत असाल तुम्ही सेवेकरी असाल, तुमच्या मनोभावाने इच्छेने तुमच्या शक्तीने स्वामी सेवा करत असाल.
परंतु स्वामींची पुण्यतिथी येत आहे, आणि म्हणून तुम्ही विशेष सेवा करावी. तसेच याशिवाय एक वेळ तुम्ही ठरवून घ्या..
सकाळी संध्याकाळची कोणती वेळ ठरवायची आहे आणि त्यावेळेस तुम्ही स्वामी समोर बसायचं आहे…
स्वामींच्या समोर किंवा आपल्या देवघरासमोर बसून सोपी सेवा तुम्हाला करायचे आहे आणि ही सेवा स्वामींच्या पुण्यतिथी पर्यंत करायची आहे.
तुम्हाला वाटलं तर तुम्ही स्वामींच्या पुण्यतिथी नंतर सुद्धा ही सेवा करू शकतात.. तर या सेवेमध्ये फक्त दोन गोष्टी करायच्या आहेत, पहिली गोष्ट म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, या नामाचा जप तुम्हाला 108 माळी करायचा आहे..
मग त्यानंतर श्री स्वामी समर्थ नामाचा जप केल्यानंतर तुम्हाला एक वेळेस अक्कलकोट स्वामी स्तोत्र म्हणायचं आहे.
हे गुगल वर मराठीमध्ये तुम्हाला उपलब्ध होईल. तर अक्कलकोट स्वामी स्तोत्र जरी तुम्ही टाकलं तरी तुम्हाला मराठीमध्ये अक्कलकोट स्वामी स्तोत्र उपलब्ध होईल..
मग तुम्हाला या 2 सेवा करायचा आहेत.. मग श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप मंत्र आणि श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र एक वेळेस तर 28 एप्रिल गुरुवारच्या स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे, परंतु आता काही दिवस बाकी आहेत.
काही दिवसांत पुण्यतिथी येईपर्यंत आपण ही सेवा नक्कीच केली पाहिजे आणि घरातल्या कोणत्याही सदस्याने केली तरी चालते आणि मनोभावाने श्रद्धेने विश्वासाने करा…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा.
Recent Comments