नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, 2 आणि 4 मिळून 6 अंक तयार होतो. 6 या अंकाचा स्वामी शुक्र ग्रह आहेत, त्यामुळे आरोग्य, संपत्ती, आनंद आणि समृद्धी मिळते आणि इतर अनेक चांगल्या गोष्टी आयुष्यात घडतात.
तुमची समस्या काहीही असो 24 सर्वांसाठी भाग्यवान असतो आणि नशीब घेऊन येतो. खरे म्हणजे कोणताही अंक पूर्ण चांगला किंवा पूर्ण वाईट नसतो. प्रत्येक अंकाचे काही गुण आणि काही दोष असतात. काही अंकात गुणांचे प्रमाण जास्त असते. तर काही अंकात दोषांचे प्रमाण जास्त असते.
24 या अंकात इतरांच्या अंकाच्या बाबतीत दोषांचे फारच कमी असते, त्यामुळे या अंकाला एक चांगला अंक म्हणता येईल. 24 या अंकातील घटक अंक 2 आणि 4 हे आहेत. या घटक अंकांची बेरीज 6 येते. त्यामुळे 24 या अंकात 6, 2 आणि 4 या तिन्ही लोकांचे गुणदोष असतात.
हे गुणदोष याप्रमाणे असतात. यामध्ये 6 हा अंक शांती, सहयोग, कुटुंबवत्सलता, जबाबदारी सौंदर्यदृष्टी दर्शवतो. तर 2 हा अंक व्यवहारीकता, मुत्सद्दीपणा, सौंदर्यदृष्टी आणि चंचलता स्वभाव दर्शवतो.
तर 4 हा अंक तर्कनिष्ठ आणि चिकित्सक बुद्धी, योजनाबद्ध आणि स्पष्टवक्तेपणा दर्शवतो. अर्थात 24 या अंकात हे सगळेच गुण आहेत आणि या अंगावर 6 या अंकाचा प्रभाव जास्त आहे. त्यानंतर 2 या अंकाचा प्रभाव आहे आणि त्यानंतर 4 या अंकाचा प्रभाव आहे.
विशेष म्हणजे 6, 2 आणि 4 अंक एकमेकांशी सुसंगत आहेत. 24 या अंकाला कालगणना आणि धर्म या दोन्ही ठिकाणी महत्त्व दिल गेल आहे. जसा की दिवसाचे 24 तास, 24 तीर्थंनकर तसेच अशोक चक्रातील 24 आरे आणि त्याचबरोबर 24 बुद्ध, 24 अवतार ही त्याची उदाहरणे आहेत.
कोणत्याही महिन्याच्या 24 तारखे जन्मलेली व्यक्ती कुटुंबवत्सल,प्रेमळ जबाबदार आणि सर्वांना सांभाळून घेणारी असते. तिचे हे गुण इतर अंकानुसार कमी-जास्त होवू शकतात. 24 हा शांती, सुसंवाद, सुबत्ता यांचा अंक आहे. शांत स्वभाव आणि सुसंवाद यामुळे 24 जन्मतारीख असणाऱ्या व्यक्तींकडे प्रेमळ असतात.
अर्थात या गोष्टीला काही लोकं अपवाद असू शकतात, पण त्यांचे प्रमाण फार कमी आहे. ज्या घरात भांडणे, कलह व अशांतता परस्पर नातेसंबंधांमध्ये तिडा असतो तिथे 24 हा अंक घरातील सर्वांसाठी उपयोगी ठरतो.
अशा ठिकाणी 24 हा अंक लावला तर जादूचा सारखं उपयोग होऊ शकतो. तसेच हा अंक मोबाईल वॉलपेपरवर ठेवला तरी त्याचा उपयोग होतो.
जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्ती अथवा ज्यांचा पूर्ण जन्मतारखेतील अंकांची बेरीज 24 येत आहे, अशा व्यक्तींची संख्या जास्त आहे.
उदा. जगातील सर्वात श्रीमंत पहिल्या 40 व्यक्तीमध्ये 7 व्यक्तींची जन्मतारीख 24 आहे किंवा त्यांचा लाइफ पार्ट नंबर 24 आहे. याशिवाय अनेक प्रसिद्ध आणि श्रीमंत व्यक्तींची जन्मतारीख 24 आहे. तुमची जन्मतारीख कोणताही महिन्याची 24 असेल.
किंवा तुमचा लाईफ पार्ट नंबर 24 असेल तर तुमच्यात एक अतिशय यशस्वी आणि श्रीमंत व्यक्ती होण्याची मोठी क्षमता आहे, हे समजून घ्या. अशा या 24 नंबरचा वापर कसा करायचा ते पाहूया. यासाठी 24 नंबर कागदावर निळा पेनने लिहून तुमच्या घराच्या दक्षिण भिंतीवर चितकवा आणि ऑफिस किंवा प्रत्येक खोलीत लावा.
तुम्ही तुमच्या गाडीवर आता किंवा बाहेरच्या बाजूला सुध्दा लावू शकता किंवा कोणत्याही हाताच्या तळहातावर तसेच अंगठ्याच्या खाली 24 नंबर लिहा. कुठेही लिहा पण फक्त दक्षिणेकडे तोंड आले पाहिजे.
दुकानदार 24 नंबर लिहुन तो त्यांच्या गल्ल्यात ठेवू शकतात. तुम्ही तुमच्या पर्समध्ये सुद्धा आता नंबर ठेवू शकता. तसेच आजारी लोकांच्या बाधीत भागावर 24 नंबर लिहीलेला सुध्दा फरक जाणवतो. तुम्ही हा उपाय नक्की करून पहा..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments