नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, “कार्तिक पौर्णिमा स्वामी भक्तांनी करा 3 गोष्टी”..
27 नोव्हेंबर कार्तिकी म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा येत आहे. हिंदू परंपरेनुसार कार्तिकी पौर्णिमेचे खूपच महत्त्व आहे. यावर्षी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी औशिक चंद्रग्रहण आणि असणार आहे,
परंतु हे चंद्रग्रहण असल्याने याचा कोणताही सुतक काळ पाळण्याची आवश्यकता नाही, म्हणूनच या दिवशी आपले व्रत पूजा नाही. आपण करू शकतो, त्यावर कोणते त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या जीवनात सुख-समृद्धीसाठी काही खास उपाय केले जातात.
त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नानाचे खूप महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी नदीत किंवा कुंडात स्नान करणे खूप शुभ असते. कारण कार्तिक महिन्यात श्रीहरी विष्णू भगवंत नदीच्या पवित्र पाण्यामध्ये वास करीत असतात.
त्यामुळे कार्तिक महिन्यात कार्तिक स्नानाचा फार महत्त्व आहे. आपल्यावर खूप कर्ज झाले असेल, आपण कर्जबाजारी झाला असाल आणि संकटे आणि अडचणी येत असतील तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी दीपदान करावे. यासाठी दिवे लावून नदीमध्ये प्रवाहित करावे.
या दिवशी सकाळीच घरातील, दिवे, समया, निरांजने, लामण दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात. दिवे चकचकीत करुन पाटावर मांडून त्यांची पूजा केली जाते. पाटाभोवती रांगोळी आणि फुलांची सजावट करुन सर्व दिव्यांमध्ये तेल वात लावून प्रज्वलित करुन ही दीप पूजा केली जाते.
काही ठिकाणी ओल्या मातीचे दिवे करुन त्यांचीही पूजा केली जाते. हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून दिव्यांची पूजा करण्यात येते. अनेकजण कणकेचे उकडलेले गोड दिवे बनवून त्यांचा नैवेद्यही दाखवतात. सायंकाळी सर्व दिव्यांची आरती केली जाते.
हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्वाचं स्थान असून घरातील इडापिडा टळावी, अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो तसा ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा या प्रार्थनेसहीत दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते.
याशिवाय, हिंदू धर्मातील शास्त्रानुसार संध्याकाळी देवासमोर दिवा लावून “शुभं करोति कल्याणम्” म्हणून घरातील वडीलधार्यांना नमस्कार करणे हा संस्कार पिढ्यां पिढ्या चालत आला आहे.
आता आधुनिक जगात विजेच्या दिव्यांचे हजारो प्रकार असतानाही आपण देवासमोर मात्र तेल किंवा तुपाचाच दिवा लावतो. कारण त्याचा सात्विक प्रकाश अंधार दूर करतो आणि नजरेलाही सुखद, पवित्र वाटतो. दिवा मांगल्याचे प्रतिक आहे.
भरपूर पाऊस व अंधारून येणे हे तर श्रावणाचे वैशिष्ट्य आहे. घरातील इकडे तिकडे ठेवलेले, धुळीने माखलेले दिवे, समया, निरांजने, लामणदिवे या सर्वांना एकत्र करून, घासून पुसून लख्ख करून ठेवण्याचा हा दिवस असतो.
या दिवशी, सर्व दिवे चकचकीत करून पाटावर मांडून ठेवावेत. पाटाभोवती सुरेख रांगोळी रेखाटावी, फुलांची आरास करावी.सर्व दिव्यांमध्ये तेल वात घालून प्रज्वलित करावेत.
कणकेचे गोड दिवे बनवतात. ओल्या मातीचे दिवेही बनवून पूजेत मांडतात. या सर्वांची हळद कुंकू , फुले, अक्षता वाहून मनोभावे पूजा करावी. गोडाचा नैवेद्य दाखवावा.
दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम । गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥
म्हणजे हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस, तेजामध्ये उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्व आहे,
प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते. घरातील इडापिडा टाळून, अज्ञान, रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दिप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी हेच आपली संस्कृती सांगते. काही ठिकाणी या दिवशी पित्रृ तर्पण देतात. आपल्या पितरांना तर्पण देऊन पुरणाचा नैवेद्य दाखवतात
कार्तिक अमावस्येला हा विधी केल्याने पितरांना मुक्ती मिळते आणि ते पुढील पिढीला आशीर्वाद देतात असे मानले जाते.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments