शनिवारच्या दिवशी चुपचाप इथे बांधा काळा धागा, वर्षभर पैसा कमी पडणार नाही..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर म्हणजेच ज्या दरवाजातून आपण घरात प्रवेश करतो अशा मुख्य प्रवेशद्वारावर लाल कपड्यात किंवा काळ्या रंगाच्या कपड्यात या काही वस्तू नक्की बांधून ठेवा. तुमच्या घरात सतत भांडणे होत असतील, चिडचिड होत असेल,

अगदी लहान-सहान गोष्टींच रूपांतर मोठ्या वादविवादात होत असेल, घरामध्ये अशांती असेल, लोक सतत आजारी पडत असतील, कोणता ना कोणता तरी दोष उद्भवतो अशा वेळी. घरात पैसा टिकून राहत नाही,

पैसा येत नाही या सर्व गोष्टी जर एखाद्या शक्तीमुळे नकारात्मक शक्ती मुळे होत असतील तर ही एक छोटीशी वस्तू आपल्या घरात नकारात्मक शक्तीना प्रवेशक करू देणार नाही.

या नकारात्मक शक्ती घराच्या बाहेरच राहतील. हा उपाय आपण जर मंगळवारी करणार असाल तर लाल कपड्याचा वापर करा आणि जर शनिवारी करणार असाल तर काळ्या रंगाच्या कपड्याचा वापर करायचा आहे.

कोणत्याही प्रकारचे टोने टोटके असतील भूत-प्रेत असतील प्रेत बाधा असेल ,नजर बाधा, वाईट नजर असेल कोणत्याही प्रकारची बाधा या सर्व गोष्टी तुमच्या घरात प्रवेश करण्यापासून ही पोटली आपण बांधणार आहोत ती तुमच्या घराच, तुमच्या वास्तूत घरातील संरक्षण करणार आहे. या पोटली मध्ये या काही वस्तू ठेवाव्यात.

यामध्ये लोखंडी 2 खिळे ठेवायचे आहेत, त्यावरती गंज चढलेला असेल तरीही चालेल मात्र स्तिल्स कोटिंग असणारे खिळे चालत नाहीत . दोन लोखंडी खिळे , छोटासा तुरटीचा तुकडा त्याला फिटकरी असही म्हणतात.

तुरटीचा छोटासा तुकडा, थोडस मोठ मीठ , खडेमीठ , आपण जे स्वयंपाकात वापरतो हे बारीक मीठ ते घ्यायचा नाहीये. थोडीशी पिवळ्या रंगाची मोहरी आपण टाकायचे आहे.

हे कोणत्याही पूजेच्या दुकानात पूजा शॉप मध्ये मिळून जाईल लोबान व एक वेखंडाचे लाकूड वेखंड नावाची वनस्पती आहे , ज्याला इंग्लिश मध्ये याला स्वीट फ्लॅग, एक लाल किंवा काळे कापड, 2 लोखंडी खिळे, लोबान, पिवळ्या रंगाचे सारसो म्हणजेच मोहरी थोडसं खडेमीठ फिटकरी तुकडा या वस्तू सर्व एकत्र करायचे आहे.

त्या लाल किंवा काळे कपड्यात मंगळवारी करताय तर लाल कपड्यांमध्ये गोळा करा, शनिवारी करताय तर काळे कपड्यात करा आणि हा उपाय करताना कोणालाही सांगू नका. हा उपाय शक्यतो शांत वासात करा.

म्हणजेच रात्री एक अकरा बारा वाजेच्या वेळी, बाराच्या आत करा, रात्री 10-11 पर्यंत आपण हा उपाय करू शकता. हा उपाय करताना तुम्हाला घरातल्या लोकांनी शक्यतो पाहू नये मात्र एकटक पाहायला सांगू नका ही सुद्धा आपल्या घराला आपले आपल्याकडूनच लागलेली नजर असते.

तुम्ही या वस्तू एकत्र करा स्वतः त्या ठिकाणी बांधा, कोणत्याही कोपऱ्यात उजवीकडे बांधायच्या आहेत , मात्र बाहेरच्या बाजूस बांधायचे आहे. याचबरोबर काळा धागा सुद्धा बांधायचा आहे..

यामुळे सर्व प्रकारची नकारात्मकता बाहेरच थांबेल. घरात प्रवेश करणार नाही आणि जर आधीच या वस्तूंनी या नकारात्मक शक्तीने तुमच्या घरात प्रवेश केलेला असेल तर बाहेर काढण्यासाठी सुद्धा हा उपाय लाभदायी ठरेल.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!