पितृपक्षाची संपूर्ण माहिती, पितृपक्षाच्या सर्व तिथी श्राद्ध तिथी माहिती नसल्यास कधी करावे?

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, हिंदू कॅलेंडरनुसार पितृ पक्ष हा महिना भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून अश्विन महिन्याच्या अमावस्या दिवसापर्यंत असतो. पितृ पक्षादरम्यान, लोक त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी विविध उपाय देखील करतात.

यावर्षी पितृ पक्ष 29 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. पितृपक्षात पितरांचे श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. मान्यतेनुसार पितृपक्षात पितर पृथ्वीवर येतात.

अशा परिस्थितीत, ज्योतिष शास्त्रानुसार, पितृ पक्षादरम्यान जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात पूर्वज दिसत असतील तर ते तुमच्या भविष्यासाठी काही संकेत असू शकतात. चला तर मग आज या रिपोर्टमध्ये जाणून घेऊया की पितृ पक्षात तुम्हाला तुमच्या पितरांचे स्वप्न पडले तर कोणते संकेत मिळतात.

पितरांचे श्रद्धेने स्मरण करून श्राद्ध कर्म केले जाते. ज्या तिथीला पूर्वज परलोकात गेले त्याच तिथीला श्राद्ध केले जाते. श्राद्ध केवळ पितरांच्या उद्धारासाठीच नाही तर त्यांच्याप्रती आपला आदर व्यक्त करण्यासाठीही केला जातो.

पितृपक्षात पितरांची उपासना केल्याने आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्याला सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळते. पितृ पक्षामध्ये आपल्या पितरांना श्रद्धेने जल अर्पण करण्याचा नियम आहे. पितृतीर्थाचे पाणी सकाळी थोडेसे काळे तीळ, मोतक कुशासह अर्पण करण्याचा नियम आहे.

तसेच या काळात पौर्णिमेच्या दिवशी अगस्त ऋषींना तर्पण करून जल अर्पण केले जाते. तसेच जर तुम्ही या पितृपक्षातच्या काळात या काही विशेष 5 कामे केल्यास, माता लक्ष्मीची कृपा तुम्हाला प्राप्त होईल.

भाद्रपद महिन्यात वद्य पक्ष म्हणजे प्रतिपदा ते अमावास्याचा काळ पितृपंधरवडा म्हणून ओळखला जातो.आपल्या कुटुंबातील सदस्यांचे श्राद्ध, त्यांचा मृत्यू ज्या तिथीस झाला असेल,पितृपक्षातील त्या तिथीस केले जाते.

श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केले जाणारे आपल्या पूर्वजांचे स्मरण होय. पितृपक्षात श्रद्धापूर्वक केले जाणारे श्राद्ध विधी पूर्वजांना प्रसन्न करतात, त्यामुळे त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. तसेच माता लक्ष्मीचेही शुभ आशीर्वाद आणि कृपा या काळात आपल्याला मिळू शकते.

मात्र त्यासाठी पितृपक्षात काही गोष्टी करणं उत्तम मानला गेला आहे. शास्त्रवचनात असे सांगितले जाते की, भाद्रपद पौर्णिमेपासून ते अमावस्येपर्यंत महालय श्राद्ध करावे. कुटुंबातील सदस्यांचे निधन ज्या तिथीला झाले असेल,

त्या पितृपक्षातील तिथीला कुटुंबातील सदस्य नावाने विधिवत श्राद्ध आणि तर्पण विधी करावा, असेही सांगितले जाते. आपल्या श्राद्धविधीनी पूर्वज तृप्त होतात, पूर्वजांच्या आत्म्याला शांतता लाभते, अशी मान्यता आहे.

पितृपक्षात श्राद्ध केले नाही, तर पूर्वजांचा आत्मा शांत राहतो, असे सांगण्यात येते. पितृपक्षात दिवंगत पूर्वज पितृलोकतून पृथ्वीवर येतात, अशीही फार प्राचीन मान्यता आहे.

त्यामुळे आपण केलेल्या सेवेमुळे ते प्रसन्न होतात आणि जाताना कुटुंबाला सुख-समृद्धी आणि ऐश्वर्याचा शुभ-आशीर्वाद देऊन जातात. या काळात अन्नदान केल्याने किंवा यथाशक्ती दानधर्म पितृ दोष दूर होण्यास मदत होते.

शक्य असल्यास रोज किमान तसेच या दिवशी श्राद्ध विधी केला जाईल, त्या दिवशी कबुतर किंवा कावळे यांसारख्या पक्षांसाठी काही पदार्थ घरात बाहेरची बाजूला ठेवून द्यावेत,तसेच ही पशुपक्षांच्या अपमान करू नये.

त्यांना त्रास देऊ नये, शक्य तेवढे अन्नदान करावे, यामुळे आपले पूर्वज प्रसन्न होण्यास मदत होईल.तसेच त्यांच्या आत्म्याला शांती लागते.

मग परिणामी यामुळे घरात सुख-समृद्धी येते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. पितृपक्षात श्राद्ध विधी आणि तर्पण करणे, उत्तम मानले जाते. तसेच या श्राद्धच्या दिवशी पंचग्रहास दानाचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते.

ते पंचग्रहास दान म्हणजे, आपल्या आसपासच्या प्राणी म्हणजे,यामध्ये गाय ,मांजर, कावळा, कुत्रा आणि अधिक रहदारी नसलेल्या आणि अधिक रहदारी नसलेल्या ठिकाणी काही भाग काढून ठेवावा, हे करताना पाठीमागे वळून बघू नये.

कारण,ते भोजन आपले पूर्वज ग्रहण करीत असतात, अशी मान्यता आहे. असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि कुटुंबातील वारसांना शुभआशीर्वाद देतात, अशी लोक मान्यता आहे. तसेच या काळात आणि कधीही इतर वेळेस चुकूनही गाईचा अपमान अजिबात करू नये.

शक्य झाल्यास केवळ श्राद्धाच्या दिवशी, नाहीतर नियमितपणे पशु पक्ष्यांना अन्न द्यावे. कारण हिंदू धर्मात भुकेल्याला अन्न देणे आणि तहानलेल्याला पाणी देणे,याला अत्यंत महत्त्वाचे आणि पुण्याचे काम मानले जाते.

त्याचे पितृपक्षात अधिक महत्त्व आहे. पितृपक्षात गरजू व्यक्तींची विशेष मदत करावी, त्यांना अन्न, पाणी द्यावे.याशिवाय त्यांची गरज पूर्ण करतेवेळी आपले चित्त प्रसन्न ठेवावे आणि मनापासून या गोष्टी दान कराव्यात.

यामुळे माता लक्ष्मीचा शुभ आशीर्वाद प्राप्त होतो.मग परिणामी धनधान्य, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!