नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,शिवमहापुराणानुसार सोमवारच्या दिवशी या सहा वस्तूंचे दान अवश्य करा. जीवनातून दुर्भाग्य दूर होईल. दुर्भाग्य म्हणजेच तुमचं नशीब जर तुम्हाला साथ देत नसेल, कामे होता होता थांबत असतील, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला एखादा त्रास असेल,.
एखादं दुःख असेल की ज्यातून मुक्ती मिळत नाही किंवा तुम्हाला असा एखादा त्रास होतोय की तुम्ही कोणाबरोबर हा त्रास वाटू शकत नाही, या त्रासाबद्दल तुम्ही कोणाला सांगू शकत नाही.
तर हे सर्व त्रास,दुःख,वेदना दूर करण्यासाठी आणि नशीबाची साथ प्राप्त करण्यासाठी आपण सोमवारच्या दिवशी या सहा वस्तूंचे दान अवश्य करा. हे दानधर्म तर कराच कारण दानधर्माचं हिंदू धर्मशात्रात फार मोठे महात्म्य सांगितलेलं आहे.
तुम्हाला महाराज बली, महाधुरंधर कर्ण आणि राजा हरिश्चंद्र हे माहीत असतील हे खूप मोठे दानी व्यक्ती होऊन गेली. असं म्हणतात की आपण जी वस्तू दान करतो ती शंभर पटीने नव्हे हजार पटींनी आपल्याला पुन्हा प्राप्त होते.
म्हणजेच आपल्याला पुण्याची प्राप्ती होते. आपण या सहा वस्तूंचे दान सोमवारच्या दिवशी अवश्य करा मात्र सोबतच भगवान शिवशंकराना शरण जा.
तुमच्या हातून कळत नकळत जी काही पापकर्म घडली त्याबद्दल त्यांची माफी मागा,त्यांना शरण जा आणि दुःख कष्ट दूर करण्याची प्रार्थना करा. सोमवारी ज्या वस्तू दान करायच्या आहेत.
त्यातील पहिली वस्तू आहे मीठ. जर मोठं मीठ असेल तर अतिउत्तम. नसेल तर साधारण, दररोज मीठ वापरता त्याचे दान केले तरीही चालेल. मात्र अत्यंत महत्वाची गोष्ट ही की हे मीठ आपल्या हातात घेऊन कधीही दान करू नका.
तुम्ही ज्या भांड्यात मीठ टाकलेले आहे हे भांड खाली ठेवा आणि समोरच्या व्यक्तीला ते स्विकारण्याची विनंती करा. आपल्या हातून आपण मीठ कधीही दुसऱ्याला देऊ नये अन्यथा घरातून लक्ष्मी जाण्याचा धोका संभवतो.
ज्यांच्या जीवनामध्ये प्रचंड त्रास आहेत त्यांनी सोमवारच्या दिवशी मिठाचे दान अवश्य करा. एखाद्या गरजुला हे मीठ दान करा. जीवनातून गरिबी निघून जाते. दुर्भाग्य निघून जातं.
अनेक प्रकारचे त्रास,दुःख दूर होतात. दुसरी वस्तू आहे गूळ. ज्या घरामध्ये सासू सुनेचे पटत नाही, मुलगा व वडील यांचं पटत नाही, पती पत्नीत सारखे वादविवाद असतील, नातेसंबंध खराब झालेले आहेत, नात्यांमध्ये गोडवा उरलेला नाहीये.
अशा लोकांनी नाती दृढ करण्यासाठी सोमवारच्या दिवशी या गुळाचे दान अवश्य करा. गुळाचं दान केल्याने नाती तर सुधारतात मात्र जर तुम्ही गायीला गूळ व सोबत भाकरी किंवा चपाती खाऊ घातली तर धनप्राप्तीचे सुध्दा नवनवीन योग निर्माण होतात. या ना त्या मार्गाने धन,
पैसा, वैभव तुमच्याकडे आकर्षित होऊ लागते. म्हणून गुळाचे दान करून पहा. तिसरी वस्तू आहे तूप. ज्या घरामध्ये सतत रोगराई असते, सतत कोणी ना कोणी आजारी असत, आजाराने त्रस्त आहात अशावेळी हे आजारपण दूर करण्यासाठी, रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी.
आपण सोमवारच्या दिवशी तुपाच दान अवश्य करा. जी आजारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीने या तुपाच्या भांड्याला स्पर्श करावा आणि असं हे तूप आपण गोरगरिबांना दान करावं. रोगापासून मुक्ती मिळते.
तूप जर शिवलिंगावर अर्पण केले तर रोग नष्ट होतातच मात्र लक्ष्मीची कृपासुध्दा होते. माता लक्ष्मीही प्रसन्न होते आणि गरिबी,दरिद्रता, कंगाली या गोष्टी दुर राहतात.
तुम्हाला माहित असेल की, आपण महादेवाना अभिषेक करतो.
पंचामृताने तेव्हा त्या पंचामृतामध्ये एक अत्यंत आवश्यक गोष्ट असते ती म्हणजे तूप. असे हे तूपाच फार मोठे महात्म्य आहे. पुढची वस्तू आहे तीळ. तीळ दोन प्रकारचे असतात. सफेद तीळ आणि काळे तीळ.
ज्या लोकांच्या जीवनामध्ये शनीची साडेसाती सुरू आहे, सतत काही ना काहीतरी विपरीत गोष्टी घडत आहेत. शनीची अडीचकी चालू आहे, अडीचकी म्हणजे ढय्या. शनीची अंतर्दशा, महादशा चालू आहे.
अशाप्रकारचे कोणतेही शनीचे दोष दूर करण्यासाठी आपण शनिवारच्या दिवशी काळे तिळाचं दान करावे. सोबतच आपण शिवलिंगावर सुध्दा काळे तीळ अर्पण करू शकता. शनी दोषापासून मुक्ती मिळते.
सोमवारच्या दिवशी आपण सफेद तिळाचं दान करा. सफेद तीळ दान केल्यास आत्मविश्वासात वृध्दी होते. तुमच्याकडे ज्ञान भरपूर आहे, तुम्ही बुद्धिवान आहात मात्र जेव्हा एखाद्या समोर सादरीकरणाची वेळ येते.
तेव्हा मात्र आत्मविश्वास डळमळीत होतो, स्वतःवर विश्वास राहत नाही, तुम्ही घाबरता, तर हा आत्मविश्वास वाढवण्यासाठी या तिळाचं दान फार महत्वाचे आहे. पुढची वस्तू आहे कपडे म्हणजे वस्त्र.
शिवमहापुराण असं मानत की सोमवारी कपड्यांचं दान केल्याने व्यक्तीला दीर्घायुष्याची प्राप्ती होते. जर तुमचा घरामध्ये एखादी व्यक्ती अत्यंत आजारी आहे आणि काही दिवस काही महिनेच शिल्लक असतील.
तर अशा व्यक्तीने आपल्या हाताने या वस्त्रांच दान करावं. कोणतंही दान करताना ते निस्वार्थ भावनेने करावं.
मनामध्ये कोणतंही स्वार्थ ठेवू नये किंवा आपण खूप काहीतरी मोठं करत आहे अशा प्रकारची ही भावना मनात नसावी. हे वस्त्राच दान दीर्घायुष्याच्या प्राप्तीसाठी केलं जातं. ही सर्व माहिती शिवमहापुराणानुसार आहे.
आपण शिवमहापुराणात याबद्दलचा उल्लेख पाहू शकता. शेवटाची वस्तू आहे धान्य. गहू, ज्वारी, बाजरी, मका,तांदूळ कोणत्याही प्रकारचे धान्य असुदे. आपल्या स्वयंपाक घरात माता अन्नपूर्णा वास करते.
अन्नपूर्णा प्रत्यक्ष जगदंबा स्वरूप आहे. भगवान शिव शंकराची अर्धांगिनी आहे. म्हणून अन्नपूर्णेस प्रसन्न करण्यासाठी आपण सोमवारी धान्याचं दान करावे. असं म्हणतात सोमवारी धान्य दान केल्याने घर धनधान्याने नेहमी भरलेलं राहतं.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments