नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, उद्या कालभैरव जयंतीला कुत्र्याला खाऊ घाला ही 1 वस्तू..
दररोज स्वयंपाक करताना आपल्या जीवनात घडणाऱ्या गोष्टींचा परिणाम त्यावरती होत असतो, जर तणाव असेल तर त्याच लहरीमध्ये जेवण बनते तसेच आपलं स्वयंपाक घर हे सर्वात मोठा सकारात्मक ऊर्जेचा स्रोत मानला जातो.
तिथे घडणारी प्रत्येक गोष्ट सकारात्मक असते. कणिक मळताना स्त्रियांच्या मनात जे काही विचार असतात त्यांचा प्रभाव त्यावरती पडत असतो व त्यानुसारच आपली वृत्ती बनत असते.
आपल्या घरी माता लक्ष्मीचा वास होण्यासाठी आपण पीठ मळताना या 3 वस्तू वापरा ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा तर वाढेलच सोबत माता लक्ष्मीचा अखंड वास राहील. हा उपाय केल्याने आपला शुक्र मजबूत होतो.
शुक्र हा धनसंपदा व सुखाच कारण आहे. शुक्र मजबूत असेल तर आपल्याला सर्व प्रकारचे सुख व ऐश्वर्य मिळते. चंद्र हा आपल्या मनाला शीतल बनवतो . जर चंद्र मजबूत असेल तर आपल्याला समाजात मान सन्मान प्रतिष्ठा मिळते
आणि पीठ हे सूर्याचं प्रतीक आहे. त्याचमुळे आपण जर पीठात ही वस्तू टाकली तर आपला सूर्य ही मजबूत होईल व आपले जीवन उजळून निघेल. हा उपाय अगदी साधा सोपा करण्यासारखा आहे. कणिक मळली की ती स्त्री ती तशीच गोल गोल करून ठेवत नाही, तर त्या कणकेच्या गोळ्यावर हातांच्या बोटांचे ठसे उठवते.
याचे कारण हे आहे की, आपण ज्यावेळी आपल्या पित्रांसाठी कणकेचे पिंड बनवतो त्यावर कोणत्याही प्रकारचे चिन्ह नसते. ते अगदी मऊ गुळगुळीत गोल गोल केले जाते. त्यावर बोटे उमठवलेली नसतात.
म्हणजेच ज्या कणकेच्या गोळ्यावर बोटांची चिन्हे नसतात, गोल गरगरीत गोळा केलेला असतो त्या गोळ्याला पिंडा समान मानले जाते. त्या गोळ्याला पित्र, वाईट शक्ती ग्रहण करतात.
म्हणून स्त्रियांनी कणिक तयार केली की त्या गोळ्यावर आपली दोन चार बोटे उमठवावी. म्हणजे त्या कणकेवर पित्रांचा व वाईट शक्तींचा अधिकार राहत नाही. त्या कणकेच्या पोळ्या देवांच्या नैवेद्यासाठी तसेच घरातील सर्वांच्या खाण्यासाठी योग्य बनतात.
म्हणून जर तुम्हाला माहीत नसेल तर कणिक मळली की सर्वात आधी त्यावर आपल्या बोटांचे ठसे उमठवावेत आणि तेव्हाच त्याच्या पोळ्या कराव्यात.
आपण जसे अन्न ग्रहण करतो त्याप्रमाणेच आपले शरीर बनते आणि जसे शरीर असते तसेच आपले मनही तयार होते. म्हणून स्त्रियांनी स्वयंपाक करताना नेहमी हसत मुखाने, आनंदाने आणि देवाचे नामस्मरण करत स्वयंपाक बनवावा.
काही स्त्रिया कणिक मळून तशीच फ्रीज मध्ये ठेवतात, ज्याला शास्त्रानुसार निषिद्ध मानले आहे. आपण जर भगवंतांचे नामस्मरण करत स्वयंपाक केला तर जेवण करतांना ही भगवंतांचे नामस्मरण केले जाते व हसत बोलत जेवण केले जाते.
ज्यावेळी आपण कणिक मळतो त्यावेळी त्यामध्ये अगदी थोडेसे तूप व दूध टाकाव. आपण हा उपाय दररोज करू शकतो. जर दररोज हा उपाय करणे शक्य नसेल तर सोमवार, बुधवार व शुक्रवारी तरी जरूर करावा.
या उपायामुळे आपला चंद्र व शुक्र मजबूत होऊन त्यांची सर्व शुभ फळे आपल्याला प्राप्त होतात. दररोज स्वयंपाक झाला तर सर्वात आधी जी पोळी बनवतो ती पोळी गायीला खायला द्यावी.
म्हणजे आपल्या सर्व देवी देवतांना नैवेद्य दिल्याप्रमाणे होईल. बहुतेक घरांमध्ये सर्वात शेवटची जी चपाती असते ती कुत्र्यांना खायला दिली जाते. कुत्र्याला पोळी खायला दिल्यास आपली अदृश्य भीती दूर होते आणि शत्रूंची पीडाही नष्ट होते.
म्हणून कुत्र्याला पोळी खायला जरूर द्यावी. परंतु शेवटची पोळी कुत्र्याला देऊ नये त्यापूर्वीची कोणतीही पोळी आपण कुत्र्याला देऊ शकतो. स्वयंपाक झाल्यावर तवा स्वच्छ धुवून झाकून ठेवावे असे शास्त्र सांगते, किचन मधील स्वच्छता आपल्या जीवनात भरभराट सुख आणत असते.
तसेच आपल्या घरी असणारी भांडी स्वच्छ ठेवावीत, असाच भांड्यातच स्वयंपाक करावा.यामुळे आपल्या घरात नेहमी भरभराट राहते. आपले घर नेहमी अन्न , धान्य व धनसंपत्तीने भरलेले राहते.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments