लक्ष्मी प्राप्तीसाठी सोपे उपाय, कमळ आणि जास्वंदाचे फुल घरात ठेवा, माता लक्ष्मीची कृपा होईल.

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, लक्ष्मी प्राप्तीसाठी सोपे उपाय, कमळ आणि जास्वंदाचे फुल घरात ठेवा, माता लक्ष्मीची कृपा होईल.

देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी शुक्रवारी वैभव लक्ष्मी व्रत केले जाते. व्रत करणाऱ्यांचा असा विश्वास आहे की जर संकल्प करून 21 किंवा 11 शुक्रवारी तिची पूजा केली तरच या संसारी सुखासाठी व्रत ठेवले आहेत ते यशस्वी होते.

परंतु वैभवलक्ष्मीचे व्रत करणाऱ्यांनी व्रतामध्ये काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी आणि या पाच गोष्टींचा पूजेमधे समावेश करणे आवश्यक आहे. कारण या वस्तू देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या वस्तू लक्ष्मीपूजन असल्या पाहिजे…

त्याची पहिली वस्तू आहे चांदीचं नाणं. काही वैभव लक्ष्मीचा पूजेसाठी आवश्यक असणारी एक सामग्री मानली जाते. अनेक लोक दिवसभर वैभव लक्ष्मीचा उपवास पकडतात आणि संध्याकाळी तिची पूजा करून उपवास सोडतात.

वैभव लक्ष्मीचा पूजेमध्ये बरेच साहित्य गोळा केले जाते. त्या चांदीच्या नाण्याच्या शुक्रवारी संध्याकाळी चांदीची नाणी पूजेमध्ये घेण्याआधी कच्च्या दुधाने धुऊन घ्यावेत आणि नंतर ती पूजेत अर्पण करावे.

दुसरी वस्तू श्रीयंत्र. शास्त्रानुसार यांच्या श्रीदेवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. शुक्रवारी वैभव लक्ष्मीचा पूजेमध्ये या यंत्राचा समावेश करणे बंधन कारक मानले जाते. तुमच्याकडे मूळ श्रीयंत्र नसेल तर तुम्ही ते कागदावर बनवून पूजेसाठी देखील घेऊ शकता.

शुक्रवारी संध्याकाळी पूजेमध्ये श्रीयंत्राची पूजा करावी, असे केल्याने तुम्हाला श्री प्राप्ती बरोबरच भगवान विष्णूचे आशीर्वाद प्राप्त होते.

तिसरी वस्तू म्हणजे अष्टलक्ष्मीचे चित्र. शुक्रवारी संध्याकाळी वैभव लक्ष्मी पूजेमध्ये अष्टलक्ष्मी ते एक चित्र ठेवून त्याची पूजा करावी. ही संपत्ती वैभव आणि संपन्नता प्रदान करणारी देवी मानले जाते.

त्यांच्या कृपेने तुम्हाला संपत्ती, वैभव आणि ऐश्वर्या मिळू शकते. घरातील दारिद्रय दूर होऊ शकते. शुक्रवारी अष्ट लक्ष्मीची पूजा करणाऱ्यांना सर्व कामांमध्ये यश मिळते. घरात भरभराट होऊ शकते.

चौथी वस्तू म्हणजे कमळाचे फूल किंवा गुलाबाचे फुल. आई वैभव लक्ष्मीच्या पूजेमध्ये लाल रंग खूप शुभ मानला जातो.

शुक्रवारी तुम्ही वैभवलक्ष्मीच्या पूजेची बसता तेव्हा लाल वस्त्र घालून लक्ष्मीला कमळ किंवा गुलाबाचे फुल अर्पण करा. वैभव लक्ष्मीच्या पूजेमध्ये गुलाब खूप खास मानले जाते. असा विश्वास आहे की,

हे फुल वैभव लक्ष्मीला खूप प्रिय आहे. तुम्हाला कमळ गुलाबाची फुले न मिळाल्यास तुम्ही लाल जास्वंदाचं फूल देखील वापरू शकता.

पाचवी वस्तू आहे कमल गट्टामाळ. वैभव लक्ष्मी देवीचा पूजेमध्ये कमळाचा बियांपासून तयार केलेली माळ फार महत्त्वाची मानली जाते. शुक्रवारी तुम्ही वैभव लक्ष्मीची पूजा करतात तेव्हा नक्कीच करावी.

त्यानंतर हि माळ लाल कपड्यात बांधा आणि ज्या ठिकाणी तुम्ही धनधान्य ठेवतात त्या ठिकाणी ती माळ ठेवा. असे केल्याने घरात पैसा वाढतो

आणि सुख-समृद्धी नांदते. गंगाजलाने कमळाची स्वच्छ केल्यावर ती वापरावे. तर तुम्हीसुद्धा वैभवलक्ष्मीचे व्रत ठेवत असाल तर या पाच वस्तू पुजा अवश्य वापरावे.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!