तुळशी विवाह घरच्या घरी करण्याची अतिशय सोपी पद्धत…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  तुळशी विवाह घरच्या घरी करण्याची अतिशय सोपी पद्धत…

23 नोव्हेंबर देवउठनी एकादशी साजरी आहे. ही वर्षातील सर्वात मोठी एकादशी तिथी मानली जाते. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू 4 महिने योगनिद्रा पूर्ण केल्यानंतर जागे होतात.

या एकादशीला देवोत्थान एकादशी आणि प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात. देव जागे झाल्याच्या आनंदात भक्त त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करतात. विशेष पूजा केली जाते. जे वर्षभर एकादशीचा उपवास करत नाहीत, ते या दिवशी उपवास करतात.

देवउठनी एकादशीचे व्रत केल्याने माणसाला संपूर्ण एकादशीचे पुण्य प्राप्त होते, असे मानले जाते. त्याचे पाप नष्ट होतात आणि मृत्यूनंतर त्याला मोक्ष प्राप्त होतो. परंतु जे व्यक्ती हे व्रत करु शकत नाहीत,

त्यांनीही या दिवशी काही नियमांचे पालन करावे, अन्यथा व्यक्ती पापाचा भागीदार होऊ शकतो. एकादशीला या गोष्टी खाऊ नयेत. तसेच या दिवशी माता तुळशीला ही 1 गोष्ट अर्पण केल्यास सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतील…

आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला मातेचा दर्जा दिला आहे. याचबरोबर आपल्या घरातील तुळशी वृंदावन हे घरात असल्याने नकारात्मक विचार व गोष्टी नष्ट करीत असते. तसेच यामुळे आपल्या घरातील वातावरण शुद्ध

आणि स्वच्छ राहण्यास मदत होते. त्यामुळे आपल्या घरात तुळस लावल्याने आपल्याला अनेक प्रकारे लाभ होत असतो. याशिवाय गरुड पुराणामध्ये ही या तुळशीचे महत्त्व सांगितले आहे,याचबरोबर आयुर्वेदात तुळशीला संजीवनी असेही म्हटले जाते.

त्यामुळे, आपल्या हिंदू धर्मात फार पवित्र आणि महत्त्वाचे मानले जाते,म्हणून प्रत्येक हिंदूच्या दारापुढे तुळशी वृंदावन पहावयास मिळते, त्यामुळे अशा घरांवर सर्व देवी-देवतांची कृपा राहते.

याच तुळशीला आपण धा र्मिकदृष्ट्या मातेसमान मानतो, तसेच तुळशीचे अनेक आयुर्वेदिक फा यदेही आपणास माहित आहे. तसेच माता तुळशीच्या फक्त दर्शन आपली सर्व पापे नष्ट होत असतात, याशिवाय आपल्या विविध धार्मिक ग्रंथांमध्ये तुळशीचे महत्त्व सांगतलेले आहे.

परंतु हिंदू शास्त्रात माता तुळशी विषयक काही महत्वाचे नियम सांगितले आहेत,त्यांचे पालन आपल्याला नक्कीच केले पाहिजे.कारण त्यामुळे आपल्या आणि आपल्याला कुटुंबावर माता तुळशी, विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा कृपाशिर्वाद प्राप्त होईल.

आपल्या हिंदु शास्त्रानुसार, चुकूनही तुळशी मातेला रविवारी आणि एकादशीच्या दिवशी पाणी घालू नका.कारण हिंदू धर्मात अशी श्रद्धा आहे की , या दोन्ही दिवशी माता तुळशी भगवान विष्णूंसाठी व्रत

आणि उपास करीत असते, त्यामुळे जर आपण पाणी घातले तर तुळशी मातेचे व्रत भंग होण्याची शक्यता असते, त्यामुळे या दिवशी तुळशीला पाणी घालू नये.

तसेच भगवान श्रीविष्णूला तुळस अतिप्रिय आहे, त्यामुळे श्री विष्णूच्या प्रत्येक पुजेत आणि नैवेद्दमध्ये तुळशीचे पान वाहिल्याने ते प्रसन्न होतात.तसेच तुळशीवरील उदक मस्तकी धारण केल्यास गंगास्नानाचे पुण्य लाभते.

त्यामुळे रोज आपण आपल्या देवघरात माता लक्ष्मी तसेच भगवान विष्णू याना तुळशीची पाने अर्पण करावी. याशिवाय पुराणानुसार, जी व्यक्ती जो माता तुळशीला दररोज दुधाने अभिषेक घालत असते, त्या व्यक्तीचे आरोग्य चांगले स्वस्त राहत असते आणि त्याचा घरी माता लक्ष्मी नांदते.

याचबरोबर, आपण उन्ह्याळ्यात माता तुळशीला पाणी दिल्यास, आपली सर्व पापे नष्ट होत असतात. तसेच तुलसी विवाह केल्यास, कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते व मोक्ष प्राप्ती होते.

माता तुळशीची मंजिरी ही सर्व देवांची प्रतिनिधी मानली जाते, त्यामुळे वारकरी संप्रदायात तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे. म्हणून जर वारकरीच्या गळ्यात आपण तुळशीची माळ घातल्यास,तसेच वैशाखात रोज तुळशीला पाणी घातल्यास अश्वमेध यज्ञाचे पुण्य प्राप्त होते.

याशिवाय माता तुळशीचे आयुर्वेदिक अनेक फायदे आहेत.तसेच माता तुळशीचे रोप लावल्यास, आपल्या आसपासच्या वातावरणातील ऑक्सिजन वाढण्यास मदत होते, त्यामुळे हवा शुद्ध होते.

तिचे पान, खोड सर्वच औषधी मानले जाते. तसेच काही मनोउपचार तज्ञाच्या मते, तुळशीची पाने दही किंवा गोड ताकाबरोबर खाल्ल्यास, शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!