नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, भावासाठी बहिणीने राखी बांधण्याआधी ही प्रार्थना एकदा नक्की म्हणावी, भावाला दीर्घायुष्य लाभेल..
हिंदु धर्मात, रक्षाबंधन हा अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो,तसेच मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी म्हणजे राखी पौर्णिमा या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ आपल्या बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.
जेव्हा बहीण लग्न होऊन सासरी जाते, त्या बहिणी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात.या दिवशी बहीण आपल्या भावाला जेव्हा राखी बांधायला येतांना, तेव्हा ती एका ताटात कुंकू, तांदूळ, नारळ,राखी, मिठाई तसेच दिवा व पाण्याने भरलेला कलश अशी संपूर्ण सामग्री घेत असते.
कारण हिंदु शास्त्रानुसार, भावाचे पूजन करून राखी बांधतांना या 7 वस्तू पूजेच्या ताटात असणे अनिवार्य असते.कारण या 7 वस्तु पूजेच्या ताटात ठेवल्यामागे काही कारणे सांगितले जातात.
1.कुंकू : बहिण-भावाला सर्वात आधी कुंकवाचा टिळा लावते,कारण कुंकू सूर्यग्रहणाची संबंधित असल्याने, कुंकवाचा टिळा लावल्याने भावावर सूर्य देवाची कृपा दृष्टी पडते व बहिण भावासाठी सूर्य देवांकडे प्रार्थना करते,की भावाला यश व प्रसिद्धी मिळावी.
याशिवाय कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी कुंकू लावणे शुभ मानले जाते.म्हणून या दिवशी बहीण भावाच्या कपाळावर तिलक लावते.
2. तांदूळ : कोणत्याही पूजेत तांदळाला सर्वात अत्यंत शुभ मानले जाते,त्यामुळे तांदळा शिवाय कोणतेही पूजन पूर्ण होत नाही. म्हणून बहिण आपल्या भावाला कुंकू लावून, त्यावर अक्षता लावते ,
कारण हे शुक्र ग्रहाचे संबंधित असते. तसेच अशी प्रार्थना करते की, माझे व माझ्या भावाचे संबंध नेहमी स्नेहपूर्ण व प्रेमपूर्ण राहावे. म्हणून,कुंकू लावल्यानंतर कपाळावर तसेच डोक्यावर अक्षता टाकणे अनिवार्य मानले जाते.
3.नारळ : नारळाला पुजेत श्रीफळ म्हटले जाते, तसेच नारळ राहू ग्रहाच्या संबंधित असतो. त्यामुळे बहीण पूजन झाल्यानंतर भावाला जेव्हा नारळ देते,कारण येणाऱ्या वर्षात माझ्या भावाला सर्व प्रकारच्या सुखसोयी व त्याचे जीवन आरामदायक व आनंदी असो.
4. रक्षा स्तोत्र किंवा राखी: राखी नेहमी उजव्या हातात मनगटावर बांधली जाते,कारण हे मंगळ ग्रहाचे संबंधित आहे. याद्वारे असा संदेश मिळतो की, हे बहिणीची प्रार्थना मानली जाते की,
तिच्या भावाने प्रत्येक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संकटांमध्ये रक्षण करावे. याचबरोबर,रक्षा सूत्र बांधल्याने त्रिदोष शांत होतात,तसेच मनगटावर रक्षा सूत्र बांधल्याने शरीरात यांचे संतुलन राहतं.
5.मिठाई : राखी बांधून झाली की, बहीण भावाला मिठाई खायला देते व त्याचे तोंड गोड करते.कारण हे गुरू ग्रहाशी संबंधित असल्यामुळे, त्याद्वारे अशी प्रार्थना केली जाते की,
माझ्या भावावर देवी लक्ष्मीची कृपा सदैव असावी व आपल्या भावाची मुले-मुली व वैवाहिक जीवन सुखी आणि आनंदी राहावे.
6.दिवा: राखी बांधण्याची सुरुवात करत असतानाच दिवा प्रज्वलित करून घेतला पाहिजे, कारण दिव्याच्या ज्योतीमुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते.तसेच दिवा हा शनी आणि केतु ग्रहाशी संबंधित असतो.त्यामुळे येणारे सर्व रोग व बांधा आणि त्रास दूर होतात.
7. पाण्याने भरलेला कलश : पाण्याने भरलेला कलश हा चंद्राशी संबंधित असल्यामुळे,बहीण पूजा करताना अशी प्रार्थना करते की, माझ्या भावाच्या जीवनात मानसिक शांतता राहावी. त्यामुळे,पाण्याने भरलेला चांदीचा किंवा तांब्याचा कलश ताटात असावा.
वरील या सात वस्तूंमधून, तुमचे आठ ग्रह शुभ होतात,त्यातील 9 वा ग्रह म्हणजे,बुध ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी, राखी बांधून पूजा झाल्यानंतर, तुम्ही बहिणीला भेटवस्तू दिली पाहिजे. असे म्हटले जाते की,ते बुध ग्रह आपल्या व्यापाराशी संबंधित कार्य करतो.
यासाठी आपल्या बहिणीला कधीही नाराज न करता तिला नेहमी भेटवस्तू देऊन त्याचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावे आणि आपल्या व्यापार-व्यवसायात प्रगती करीत राहावे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments