नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, 5 डिसेंबर काळभैरव जयंती, 11 लिंबू आणि काळे उडीद 3 वेळा काळभैरव अष्टक करा हे 3 उपाय आणि उच्च कोटीची सेवा
श्री स्वामी समर्थ, सेवेचा सत्य अनुभव जळगाव येथील प्रताप नगरमध्ये स्वामी महाराजांचे केंद्र आहे. मी एक दिवशी स्वामी केंद्रात गेलो आणि स्वामींचे दर्शन घेतलं घरी निघताना माझ्या मनात विचार आला की,
आपण स्वामींची मूर्ती घरी घेऊन जाऊया आणि मंदिरात असलेल्या दुकानातून मी महाराजांची पितळी मूर्ती घरी घेऊन आलो आणि देवघरांमध्ये स्थापन केली. परंतु स्वामींची सेवा कशी करावी हे मला ठाऊक नव्हते रोज फक्त देवांची आंघोळ टिळा.
बत्ती मी लावत असे मंग असेच अधून मधून कधीतरी देवळात जात होतो परंतु कोणाशीही ओळख नसल्याने कोणाला विचारावं ही मनात द्विधा मनस्थिती होती एकेदिवशी केंद्रात असणाऱ्या दुकानात नजर टाकली आणि तिथे असणाऱ्या अनेक पुस्तकांमध्ये मला नित्यसेवा हे पुस्तक दिसले.
हे पुस्तक विकत घेण्याची माझी इच्छा झाली त्यातल्या आरत्या कालभैरव अष्टक मी रोज म्हणू लागलो अशातच एक स्वामीभक्त माझ्या घरी आले त्यांनाही संपूर्ण गोष्टींचे ज्ञान होतं असं नाही त्यांनी मला सांगितलं तुम्ही मूर्ती घरी का आणली मूर्तीचे नियम खूप कठीण असतात ,
मूर्ती ऐवजी तुम्ही एखादी स्वामी प्रतिमा आणायला हवी होती तुम्ही लवकरात लवकर या मूर्तीचे विसर्जन करा एक तर ही मूर्ती देवळात ठेवा किंवा तेव्हा त्या पाण्यात विसर्जित करा मी आणि माझे कुटुंब आता विचारत पडलो काय करावे पुन्हा माझे पाय केंद्राकडे वळले.
परंतु आता आपल्याला कोणाशी तरी बोलावच लागेल असा मी विचार केला त्या दिवशी का गुरुवार होता आणि केंद्रात स्वामी भक्तांसाठी प्रश्न उत्तरे चालू होती,
केंद्रात असणाऱ्या एका सेवेकरी दादांना मी माझ्या मनातील समस्या सांगितली ते म्हटले आपण आपल्या बापाला कधी घराच्या बाहेर काढतो का नाही ना मग तुम्ही का मूर्ती न ठेवण्याचा विचार करता आहात.
तुम्ही स्वामींना रोज अगरबत्ती लावत असालच मग बस स्वामींना ही सेवा देखील पुरी आहे स्वतः स्वामींना तुमच्या घरी येण्याची असल्यावर तिथं तुमच आमचं काय चालणार हे सगळे जे घडतं आहे.
ते स्वामींच्या इच्छेनेच तेव्हा निवांत रहा त्या दिवसापासून स्वामी माझ्याकडून माझ्या परिवाराकडून हळूहळू सेवा करून घऊ लागले त्यामध्ये सूक्त पुरुष सूक्त तारक मंत्र कालभैरव अष्टक आणि स्वामी मंत्र अशा तिथेच सेवा आमच्या हातून स्वामी आपोआप करून घेऊ लागले,
न चुकता अशी सेवा आमच्या हातून घडत गेली आणि दर गुरुवारी केंद्रात जाण्याची ओढ लागली पण अचानक सगळं व्यवस्थित चालू असताना आमच्या कुटुंबावर एक संकट आलं आणि इथून पुढे परीक्षा खरी सुरू झाली सगळीकडे कोरोना व्हायरस या आजाराने थैमान घातलं होतं.
अशातच माझ्या आईची तब्येत बिघडली आणि डॉक्टरांनी कोरोना टेस्ट करण्यास सांगितलं रिपोर्ट नॉर्मल येण्यासाठी स्वामींची अधिकाधिक सेवा कशी करावी हे स्वामी सेवेकडील करून मी जाणून घेतलं त्यांनी सांगितलं ही सेवा केल्याने रिपोर्ट नॉर्मल येईल.
परंतु झालं उलटच आईचा रिपोर्ट पॉसिटीव आला शंका आणि संशय हे श्रद्धेच्या मार्गातली सर्वात मोठे अडथळे रिपोर्ट असा आल्याने मनाचे शंका निर्माण झाली आणि परिणामी स्वामी विषयी असलेली श्रद्धा जवळजवळ उडालीच आईचा रिपोर्ट पॉसिटीव्ह आल्याने आम्हा कुटुंबाला सगळ्यांना टेस्ट करण्यास सांगितलं,
पुन्हा आपला रिपोर्ट तरी निगेटिव्ह यावा यासाठी पुन्हा माझ्या लहान मुलासह सर्व क्वारंटाईन सेंटर इथे स्वामींची उपासना करू लागलो पुन्हा माझ्या सह माझ्या सर्व परिवाराचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
आता यापुढे स्वामी सेवा करायची नाही असं मी मनोमन ठरवलं परंतु यामागेही स्वामींचीच लीला असेल हे आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला कळत नाही मला स्वामींची प्रचंड चीड येऊ लागली प्रसंगी ही स्वामीं बद्दल अपशब्द बोलू लागलो परंतु अनेकांना खूप त्रास झाला अनेक जण यात दगावले,
परंतु आम्हाला कुठलाच त्रास झाला नाही आणि सुखरूप सात दिवसांनी आम्हाला घरी सोडण्यात आलं स्वामी नेहमी आपल्या भक्ताला सुखरूप घरी आणतात पण स्वामींविषयी मनात श्रद्धा असावी लागते हे नंतर लक्षात आलं
आणि पुन्हा स्वामी सेवा सुरू केली हळूहळू सेवा आपोआप स्वामी माझ्या हातून करून घेऊ लागले स्वामी चरित्र क्रमशः तीन अध्याय आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करू लागलो आणि मला स्वामींचा खूप चांगला अनुभव येऊ लागला..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments