उद्या संकष्टी चतुर्थी दूर्वांचा हा उपाय नक्की करा..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  उद्या संकष्टी चतुर्थी दूर्वांचा हा उपाय नक्की करा..

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता श्री गणेशाची विधीवत पूजा अर्चना करण्याचं विधान आहे. असे सांगितले जाते की,श्री गणपतीची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटं समाप्त होतात.

सोबतच धन-संपत्ती, बुद्धी, वि​वेक, समृद्धीतही वृद्धी होते. भगवान गणेशाच्या पूजेत दुर्वा एक विशेष प्रकारची वनस्पती चढवली जाते.

त्याशिवाय गणेशाची पूजा संपन्न मानली जात नाही. गणेशजी एकमेव असे देव आहेत ज्याना पूजेत दुर्वा अर्पण केलं जातात.तसेच एक असा या दुर्वा संदर्भात उपाय सांगितलेला आहे,ज्यामध्ये तो उपाय योग्य प्रकारे केल्यास,आपल्या घरात माता लक्ष्मीचा वास राहील, तसेच सुख-समृद्धी नांदेल.

हा उपाय म्हणजे, आपण श्री गणपती बाप्पाला अर्पण केलेली दुर्वा जर किंवा गणपती जवळ ठेवलेली दुर्वा जर तुमच्या घरात या एका विशिष्ट ठिकाणी ठेवल्यास, तुमच्यां घरात बरकत होईल, घरात श्रीमंत येईल ,तसेच सुख समृद्धी नांदेल.

प्रत्येक हिंदू धर्मातील लोकांच्या घरांत गणपतीची बाप्पाची स्थापना झालेली असते. मग अनेक लोक हे अकरा दिवस खूप भक्ति भावाने गणपतीचा सण साजरे करत असतात. या गणपतीच्या खास दिवसांमध्ये

आणि गणपतीवर अनेक प्रकारचे फुलं आणि खूप प्रकारची पत्री किंवा फळे, मिठाई गणपतीला बाप्पाला अर्पण करीत असतो, गणपती जवळ ठेवत असतो आणि त्यासोबतच गणपतीचे आवडती एक वस्तू ती म्हणजे दुर्वा अत्यंत वस्तू दुर्वा होय.

मग आपण ही दुर्वा अकरा,एकवीस किंवा 51 ,101 या अश्या जोडी बनवून, आपण गणपतीला लावत असतो किंवा गणपती बाप्पा जवळ ठेवत असतो.कारण या दुर्वांमध्ये गणपती बाप्पाचा आशीर्वाद असतो,गणपतीची शक्ती आणि कृपा असते.

आपण बऱ्याच वेळेस ही दुर्वा गणपतीवर लावतो आणि संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी ती काढून, तिच्या जागेवर दुसरी दुर्वा ठेवतो आणि काढलेली जुनी झालेली दूर्वा, आपण वाहत्या पाण्यात प्रवाहित करतो किंवा कुठेही टाकून देतो.

परंतु जर आपण हे दुर्वा गणपतीच्या आशीर्वाद समजून घरातील या विशेष जागेवर ठेवल्यास, तर आपल्या घरात नक्कीच बरकत होईल. मात्र त्यासाठी हा उपाय तुम्ही योग्य प्रकारे केला पाहिजे.तर आपल्याला ही दुर्वाची जोडी , घरातील धन ठेवण्याच्या जागेवर ठेवायचे आहे.

मग ती आपण घरातील तिजोरीमध्ये ठेवू शकतो किंवा तुमचे दुकान असेल, तर दुकानाच्या गल्यात ठेवू शकता. ऑफिस असेल तर ऑफिसच्या मुख्य ठिकाणी ठेवा,जिथे तुम्ही कागदपत्र किंवा किमती सामान ठेवता.

त्या महत्त्वाच्या ठिकाणी ही श्री गणपती बाप्पाला वाहिलेली दूर्वा ठेवल्यास,तर नक्कीच गणपतीचा आशीर्वाद तुमच्या घरावर, ऑफिसकिंवा दुकानात राहील.

मात्र तुम्ही हो दुर्वा फक्त एका दिवशी कोणत्याही महत्वाच्या ठिकाणी ठेवायचे आहे. मग तुमच्या घरी 5 दिवसाचे गणपती किंवा 7 दिवसाचे गणपती असले तरी,यापैकी कोणत्याही विशेष दिवशी तुम्ही या वाहिलेल्या दुर्वाची एक जोडी ठेवू शकता.

मग आपण गणपतीच्या दिवशी बसेल ,त्यादिवशी ठेवू शकतात किंवा दुसर्‍या दिवशी ठेवू शकतात. तुम्हाला ज्या दिवशी की वाटेल ,त्या दिवशी तुम्ही एक दुर्वा तुमच्या तिजोरी किंवा दुकानात ठेवावी.

हा उपाय फक्त एकाच दिवशी करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला ही दुर्वा एकदाच ठेवायचे आहे. मग रोजची दुर्वा तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जित करायची आहे. पण कोणत्याही दिवशी ठरवून, ती एक जोडी दुर्वा तुमच्यां दुकानात किंवा ऑफिसमध्ये नक्की ठेवावी.

याशिवाय गणपतीची पूजा केलेल्या पाच देवतांपैकी पहिल्याच्या साधनेमध्ये दुर्वा विशेषतः वापरली जाते. असे मानले जाते की, जर साधकाने दुर्वाच्या पाकळ्यांनी गणपतीची पूजा केली तर त्याला कुबेरासारखे धन प्राप्त होते.

सर्वत्र सहज उपलब्ध होणारा हा दुर्वा गणपतीवर अर्पण केल्याने विशेष कृपा प्राप्त होते. दुर्वा अर्पण केल्याने प्रसन्न झालेला गणपती सर्व त्रास आणि अडथळे दूर करतो.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!