नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, या गणेश चतुथी दरम्यान करा चमत्कारिक उपाय..
देवपूजा करताना फुले वाहणे हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कारण शास्त्रानुसार फुले वाहिल्याने देवी-देवता प्रसन्न होतात आणि देवपूजेचा संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होतं.
मात्र फुले वाहताना काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी, अन्यथा आपल्या माथी अनेक दोष लागू शकतात आणि मग आपल्या जीवनात मनात अनेक संकटे आणि समस्या उभ्या राहतात.
अनेकांचा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही, मात्र जाणून घेऊया की हिंदू धर्मशास्त्र देवी-देवतांना फुले वाहण्याच्या बाबतीत नक्की काय सांगत.
देवी-देवतांना फुले वाहावीत, मात्र कळ्या चुकूनही वाहू नयेत. याचबरोबर मातीत पडलेली किंवा खराब झालेले फुले चुकूनही देवी-देवतांना अर्पण करू नयेत. याशिवाय सुकलेली आणि आधीच वास घेतलेली,
कीड लागलेली फुले सुद्धा अपवित्र मानली जातात. तसेच एखाद्याच्या घरांतून किंवा तिथुन चोरून आणलेली शिळी झालेली, आपल्या शरीराचा स्पर्श होऊन, घाम लागलेली किंवा दुसर्याला न विचारताच आणलेली फुले सुद्धा देवीदेवतांना वाहू नयेत, कारण अशी फुले अपवित्र असतात.
एखाद्या झाडाला ओरबाडून तर आपण पत्री म्हणजेच पाने-फुले अनत असाल तर ती सुद्धा देवी-देवता स्वीकार करत नाहीत.तसेच एखाद्या अपवित्र जागी उत्पन्न झालेली फुले सुद्धा आपण देवी-देवतांना वाहू नयेत.
तसंच फुले नेहमी उजव्या हातानेच तोडावीत आणि ती देवी-देवतांना वाहताना सुद्धा उजव्या हाताचा वापर करावा. कारण डाव्या हाताने आणलेली फुले देवाला रुचत नाहीत.
फुले कधीही रुईच्या पानांनी किंवा एरंडाच्या पानाचे घालून नयेत, कारण ती वर्ज्य मानलेली आहे. याशिवाय वैशिष्ट देवी-देवतांना विशिष्ट फुले वर्ज असतात, त्यांना चुकूनही वाहू नयेत.
असं म्हणतात की, भगवान श्रीहरी विष्णूना तुळशीच पान आणि कमळ अतिप्रिय आहेत. मात्र मंदार म्हणजे रुई,धोत्रा, गोकर्ण कोरांटी, शिरीष, पुडा आणि बेलाचे पान हे भगवान श्रीहरी श्री विष्णूंना चुकूनही वाहू नये.
भगवान शिव-शंकर महादेव यांच्या बाबतीत त्यांना रुई, कन्हेर, बेलाचं पान आघाडा, शमी, बकुळ आणि कमळ तसेच सुगंधित पांढरी फुले आणि कमल ही अतिशय प्रिय आहेत.
मात्र शिवशंभुना काही फुले मात्र चालत नाहीत. यामध्ये पळसाचे फुल, कुंद, मालती, बाण, तुळस, माका, शिरसंगी, जुई, तांबडी कन्हेर, लाल जास्वंद किंवा गुलाब, केवडा, दौना ,कुडा, ही फुले शिवशंभु ना अर्पण करू नयेत. पुष्प असतात हि शिवशंकरांच्या फक्त माघ महिन्यातच वाहिली जातात.
जर तुम्ही एखाद्या देवीची पूजा करत असतात, तर त्या देवाची पूजा करताना तिला सोन चाफा, कमळ किंवा लाल फुले ही नक्की अर्पण करावी, तरी देवी प्रसन्न होते. तुम्ही जर एखाद्या देवस्थानी जाल, तिथे देवीचे मंदिर आहे आणि देवस्थान आहे.
देवीची ओटी नक्की भरा. देवीच्या पूजेतील तो एक अत्यावश्यक भाग आहे. तसेच सुर्यदेवांना दौना, नगर, मंदार, लाल फुले रक्त चंदन अतिशय प्रिय आहे. याशिवाय गणपती बाप्पांना मंदार प्रिय आहे. तसेच हे दुवा प्रिय आहेत.
शमीपत्र जास्वंद सिंदूर रक्तचंदन या गोष्टी प्रिय आहेत. तुम्ही श्रीगणेशांना तुलसीपत्र तुळशीचे पान वाहु शकता. मात्र फक्त गणेश चतुर्थीला अन्यथा वर्षभरात कोणत्याही दिवशी गणपतीला चुकूनही तुळशीपत्र अर्पण करू नये,
कारण ते वर्ज्य मानण्यात आलेला आहे. देवाला फुले वहातांना ती नेहमी देवाकडे देठ करून आपण व्हायचे आहेत. फुलांचे देठ देवाकडे असावेत आणि बेलाच पान वाहताना तर बेलाचे पान पालथा झाल्यावर दुर्वा वाहतात तर दुर्वाच्या शेंडी हे आपल्याकडे ठेवून आपण दुर्वा वाहायच्या आहेत.
एक पान वाहा किंवा 100 आधी मोजून घ्या आणि मग एकदम 100 वाहू शकता. तसेच कोणत्याही देवी देवतेला फुलं वाहताना त्या देवाचं नाव घेऊन नमः म्हणण्याची प्रथा आहे.
जसं कि, भगवान श्रीहरी विष्णुना आपण जर काही वाहत असाल तर विष्णवे नमः गणपती बाप्पांना वाहताय ओम गणेशाय नमः, नमो शिव शंकरा वाहताना ओम नमः शिवाय असं म्हणू शकता.
जी बेलाची पान आहेत ते 5 दिवस शेळी होत नाहीत. आपण त्यांचा पुनर्वापर करू शकता. मात्र ही बेलाची पानं पाण्यात घालून कधीच वापरू नयेत ते कोरडीच व्हावीत. ही पानं फाटलेले नसावी त्याच्यावर धूळ बसलेले नसावी
कोळ्याची जाळी नसावीत कीटक वगैरे त्यावर नसावेत. आता ही पाने किंवा फुल वाहताना नेहमी आपल्या उजव्या हाताने वाहायचे आहेत, मात्र उजव्या हाताचे मधले बोट आणि करंगळी जवळचं अनामिका बोट आणि अंगठा यात तीन बोटात धरून आपण ही पाने वाहायचे आहेत.
भगवान शिव शंभू शिव यांना निर्गुडी, आवळी, जंबु हे पान सुद्धा खूप प्रिय आहेत. तसेच कमळाचे फुलं एका दिवसात शीळ होत आणि म्हणून त्याचा पुनर्वापर आपल्या करता येत नाही.
पळसाचे फुल सुद्धा एका दिवसात शिळे होते. बेलाचे फुल मात्र 5 दिवस चालते. तुळशीची पानं 10 दिवस आपण वापरू शकतो. कारण ते 10 दिवस ते शिळे होत नाही किंवा अपवित्र होत नाही.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments