नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,ओम नमः शिवाय, 13 जुलै बुधवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा आली आहे. प्रत्येक वर्षी आषाढी पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. असे मानले जाते की, महर्षी व्यास यांचे जन्म सुद्धा याच दिवशी झाला होता आणि म्हणूनच या दिवसाला व्यास पौर्णिमा असंही म्हटलं जातं.
आपल्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस होय. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत करण्यासाठी काही उपाय सुद्धा करता येतात. हे उपाय आपलं कुंडलीतील गुरु ग्रहास मजबूत करतात.
लक्षात घ्या मित्रांनो कुंडलीतील गुरु ग्रह हा एक अत्यंत महत्त्वाचा ग्रह आहे. त्यामुळे ज्यांचे कुंडलीतील गुरू ग्रहा मजबूत असतो असं लोकांना अत्यंत शुभफळ प्राप्त होतात, अशा लोकांच्या जीवनात कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्या येत नाहीत आणि पैसा मुबलक प्रमाणात असतो.
याउलट ज्यांच्या कुंडलीतील गुरु ग्रह अशुभ स्थानी असेल किंवा कमजोर असेल तर अशा लोकांच्या घरांमध्ये गरिबी आणि अनेक आर्थिक समस्या येतात आणि म्हणूनच गुरुपौर्णिमेस कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत करण्यासाठी आणि आपल्या जीवनातील आर्थिक समस्या नाहीशा करण्यासाठी एक विशेष उपाय आपण बघणार आहोत.
या उपायामुळे कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत होईलच, सोबतच माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर बरसेल.
चला तर जाणून घेऊया गुरुपौर्णिमेच्या दिवशी उपाय आपण कसा करायचा आहे. मित्रांनो या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे आणिअंघोळ झाल्यावर शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचा आहे.
मग त्यानंतर आपल्या घरातील देवपूजा आहे ते आपण करून घ्यायचे आहे आणि याच श्रीहरी श्रीविष्णूची विशेष पूजा आपण करायचे आहे. त्यांना पिवळ्या रंगाची फळे आणि पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायचे आहेत.
या ठिकाणी गायीच्या तुपाचा एक दिवा लावा. आपण आजही सर्व पूजा झाल्यानंतर आपल्या घराच्या अंगणामध्ये आपल्या घराच्या समोर आपण एक रोप लावायचे आहे.
हे पहा मित्रांनो यासाठी आपण यापेक्षाही उत्तम जागा असेल श्रीहरी श्री विष्णूचे मंदिर.
तुमच्या घराच्या आसपास जर भगवान श्रीविष्णूचा एखादं मंदिर असेल. श्रीकृष्णाच किंवा विठ्ठलाचे मंदिर असेल, कारण ही सगळी श्रीविष्णूची रूपे आहेत. श्री विष्णूचे मंदिरासमोर तुम्ही हे एक रोप तर नक्की लावा.
या गुरुपौर्णिमेचे श्रीविष्णूच्या कोणत्याही मंदिरासमोर किंवा मंदिराच्या परिसरामध्ये आपण 1 केळीचे रोप लावायचे आहे. ज्यांना मंदिराच हे रोपटे लावले शक्य नसेल लोकांनी घराच्या अंगणामध्ये केळीचे रोपटं लावायचा आहे किंवा जे लोक फ्लॅटमध्ये राहतात.
त्यांना अंगणामध्ये केळीचे रोप लावणे शक्य नसेल, अशा लोकांनी तुळशीच्या शेजारीच कुंडीमध्ये जरी केळीचं रोपटं लावलं तरी सुद्धा झाले. विशेष करून ज्या लोकांना धन संबंधित समस्या आहेत, घरामध्ये पैसा येत नाही.
पैसा सर्व मार्ग बंद केले आहेत अशा लोकांनी आपल्या घरातील तुळशीचे शेजारी हे केळीचे रोपटं नक्की लावा. यामुळे अनेक प्रकारच्या आर्थिक समस्या नक्की दूर होतात. धनप्राप्तीचे अनेक मार्ग खुले होतात.
कारण तुळस ही साक्षात माता लक्ष्मी स्वरूप आहे आणि त्याच्या शेजारी जर आपण विष्णू स्वरूप केळीचे रोपटं लावल्यास आपल्या घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर्य नक्की येतं.
मग ही केळीचं रोपटं लावल्यानंतर यांचे मनोभावे पुजा करून, हळद-कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहेत. पिवळ्या रंगाचे फूल अर्पण करायचे आहेत सोबतच गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे.
मित्रांनो हे सर्व झाल्यानंतर आपण मनोभावे हात जोडून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी धना ऐश्वर्या व आपल्या जीवनातील सर्व आर्थिक समस्या दूर व्हाव्यात यासाठी मनोमन केळीच्या रोपटे जवळ प्रार्थना करायची आहे.
आणि त्यानंतर ‘ओम नमो भगवते वासुदेवाय” मंत्र महामंत्र आपण 21 वेळा जप करायचा आहे. मित्रांनो तुम्ही श्रीविष्णूच्या मंदिरासमोर लावा. तुमच्या घराच्या समोर लावा किंवा घरांमध्ये तुळशीच्या शेजारी लावा, या सर्वांची समान फळे आपल्याला प्राप्त होते.
तसेच बृहस्पती देवतेचा मंत्र सुद्धा तुम्ही या दिवशी बोलू शकता. गुरु ग्रहाचा आणि बृहस्पतीचा अत्यंत जवळचा संबंध आहे. त्यामुळे या मंत्राचा जप केल्याने बृहस्पती दैवत प्रसन्न होते आणि सोबतच गुरु ग्रह कुंडलीत गुरू ग्रह आहे, तोसुद्धा मजबूत होतो.
ॐ बृं बृहस्पतये नम:, ॐ बृं बृहस्पतये नम: ,या मंत्राचा 108 वेळा जप गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण करायचा आहे. आपल्या घरातच देवघरासमोर बसून मंत्रजप आपण करू शकता.
यामुळे श्री विष्णू माता लक्ष्मीची असीम कृपा आपल्यावर आणि कुटुंबावर होईल.. माहिती आवडली असेल तर लाईक करा..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments