नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, ताक हे अमृतासमान मानले जाते. ताक पिल्याने शरीरातील भरपूर समस्या ठीक होतात. तस्क हे वेड पुराणानुसार आयुर्वेदिक औषध मानले जाते. हे औषध विना खर्चिक घरगुती उपाय आहे.
ताक हे शरीरातील घातक विषारी पदार्थ बाहेर टाकते. त्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. ताक पिल्याने सर्व शारिरीक दोष, पोटाचे विकार नाहीसे होतात.
तुमच्या शरीराचे पंचकर्म करायचे असल्यास बाहेर कुठेही न जाता घरी बसून करता येते त्याच कारण म्हणजे ताक.
सलग 3 दिवस काहीही न खाता फक्त ताक घेतल्यास संपूर्ण पंचकर्म होऊन जाते. इतकेच नव्हे तर चेहऱ्यावरील काळे डाग जाऊन इथे चेहरा फ्रेश व तरतरीत होतो.
ताकामध्ये व्हिटॅमिन बी 12 आहे, पोटॅशियम, फॉस्फरस असते जे शरीरातील पाचन संस्थेस मदत करते. कॅल्शिअम सुदधा असते. इतकी सारी तत्वे आपल्याला भरपूर उपयोगी असतात.
जसे की ज्यांना बद्धकोष्ठता आहे, पोटात आवाज येतो, पचनास त्रास होतो. त्यांनी रोज ताक घेतलेच पाहिजे. एक ग्लास ताक हे एक टॉनिकची गोळी घेतल्यासारखे आहे.
ताक घेतल्यावर शरीरातील संपूर्ण झीज भरून , सगळी उष्णता निघून जाते व त्यामुळे थंडपणे शांत झोप लागते. लहान मुलांना दात येताना त्रास होतो त्यामुळे ते खूप रडतात, अशावेळी दिवसातून 3-4 वेळेस 3-4 चमचे ताक दिल्यास तो त्रास होत नाही.
पित्तावर एक घरगुती जालीम उपाय म्हणजेच ताक. ताकामध्ये काळे मिरे आणि साखर टाकून घेतल्यास नक्कीच फायदा होतो. तसेच पोट दुखीचा त्रास वारंवार होत असेल तर रिकाम्या पोटी ताक घ्या.
तसेच डोके दुखीचा त्रास होत असल्यास ताकामध्ये जायफळ टाकून घेतल्यास डोके दुखायचे थांबते. ताकात ओवा टाकून घेतल्यास पोटातील जंतू मरतात. तसेच काही लोकांना लघवी करताना जळजळ होते त्यासाठी ताकामध्ये गूळ मिक्स करून प्यावे.
ताक हे जठराग्नी शमक आहे. भरपूर आरोग्यवर्धन असल्याने ताकातील गुणधर्म शरीरासाठी खूपच लाभदायी आहेत. मूळव्याध, भूक न लागणे, अतिसार होणे असे त्रास होत असल्यास तुम्ही एक ग्लास ताक घेऊ शकता.
आयुर्वेदिक महत्व असणारे ताक हे सर्वत्र गुणकारी मानले जाते. ताक हे खरंच टॉनिक व अमृत मानले जाते. अशा प्रकारे आपण दररोज जेवणात ताजे ताक घ्यायलाच हवे, त्यामुळे पचनशक्ती सुधारते.
दह्याचे किंवा ताकाचे पाणी सुदधा तोंड आल्यावर गुणकारी ठरते, त्याने तेव्हा आपण गुळण्या केल्यास आराम मिळतो.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
I was very pleased to find this site. I wanted to thank you for your time for this particularly wonderful read!! I definitely savored every little bit of it and i also have you book-marked to see new stuff in your site.