नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, होळीच्या दिवशी करा चमत्कारिक उपाय, पुढील 12 तासांत परिणाम दिसेल.. वसंताच्या आगमनाची चाहूल लागताच साजरा होणारा पहिला सण म्हणजे होळी होय. संपूर्ण देशात होळी हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो.
होळी हा सण रंगाचा असल्यामुळे लहान मुलांची उत्सुकता शिगेला पोहोचते. साधारणता फाल्गुन म्हणजेच मार्च महिन्यात येणारा हा सण मृग नक्षत्रपूर्वी संपूर्ण वातावरण शुद्ध करून पर्जन्याच्यात दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती करत असल्याने होळी पेटवण्याला विशेष महत्त्व आहे.
देशात होळी हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. असलं तरी हिंदू शास्त्रात होळीतील भस्माला मात्र विशेष महत्त्व आहे. या सणाशी निगडीत बऱ्याच समजुती आणि प्रथा आहेत.
होळीतल्या भस्मामुळे अनेक दोष दूर होतात अशी मान्यता ही आहे. काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर सण साजरा केल्याने त्याचे चांगले फळ मिळते, त्यामुळे या काही विशेष गोष्टीं केल्यास त्यांचे शुभफल प्राप्त होते.
होळी सणाच्या दिवशी घराची नीट स्वच्छता करावी आणि भगवान श्रीहरी विष्णूचा नृरसिंह अवताराची पूजा करावी. असं केल्याने भगवान श्रीहरी विष्णूची कृपा प्राप्त होते आणि तसं होळी दहना वेळीसुद्धा अवश्य सहभागी व्हावं.
काही कारणास्तव होळी दहनाच्या दिवशी आपण तिथे उपस्थित राहणं शक्य नसेल, तर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी होळीला तीन प्रदक्षिणा घालाव्यात. होळीमध्ये जवस, वाटाणा, गहू किंवा हरभऱ्याच्या जोड्या यांपैकी जे तुमच्याकडे असेल,
होळीच्या आगीत भाजून प्रसादाच्या स्वरूपातील सर्वांना वाटावं. होळीतील भस्म पुरुषांनी मस्तकावर लावावा आणि स्त्रियांनी गळ्याभोवती लावावं. त्यामुळे समाजात कीर्ति वाढते आणि संपत्तीतही वाढ होते, असा समज आहे.
होळीच्या दिवशी पिवळी मोहरी, लवंग, जायफळ आणि केळ तसेच तीळ काळ्या कपड्यात बांधून होळी टाका, असं केल्याने नकारात्मक उर्जेचा प्रभाव कमी होतो. होळीतील भस्म लॉकर किंवा जिथे पैसा ठेवतो तिथे ठेवा,
असं केल्याने तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही, असं म्हटलं जातं. घरांमध्ये छोटीशी शेनाची होळी अवश्य करा, तसेच त्यात कापूर जाळा. असा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
याशिवाय होळीच्या दिवशी वडीलधाऱ्यांचा पायांच्या बोटांवर गुलाल लावून त्यांचा आशीर्वाद घ्या, लहानांना रंग लावून त्यांना आशीर्वाद द्या. पंचांगानुसार होळी दहन दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला होत.
होलिका दहनासाठी प्रदोष काळाची वेळ निवडली जाते. या काळात भद्रा काळाची सावली नसते. होळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments