श्रावण महिन्यात शिवलीलामृत पारायण कसे करावे, नियम व अटी जाणून घ्या…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, मृत्यूच्या दाढेतून परत आणणारे हे पारायण कसे करावे हे शिवलीलामृताचे पारायण काही इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे आपल्या अडी अडचणी दूर करणारे आपल्याला ऐश्वर्य प्राप्त करून देणारे इच्छित मनोकामना पूर्ण करणारे,

तसेच आपल्याला इच्छित जोडीदार प्राप्त करून देणारे हे पारायण आपल्याला संतती प्राप्त करून देणारे कर्जातून मुक्त करणारे आजारपणातून मुक्त करणारे हे पारायण कसे करावे खासकरून महादेवासाठी केले गेलेले पारायण शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण कसे करावे

हे जाणून घेऊया शिवलीलामृत पारायण सोमवारच्या दिवशी सुरू करावे बरा महिन्यातील कोणत्याही सोमवारी आपण या पारायनाला सुरुवात करू शकता तसेच श्रावण महिन्यात शिव भक्तीला अधिक महत्त्व आहे.

त्यामुळे श्रावण महिन्यात पारायण करू शकता संपूर्ण वर्षभर हे पारायण करू शकतो फक्त सोमवारी या पारायनाला सुरुवात करावी पारायनाची सुरुवात कशी करावी? तर सर्वप्रथम पारायनाच्या दिवशी म्हणजे सोमवारी प्रथम मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घ्यावे

त्याला सफेद फुल आणि बेलपत्र वाहून प्रार्थना करावी की आपल्या आशीर्वादाने आज शिवलीलामृत ग्रंथाचे मी पारायण करायला सुरुवात करत आहे ते निर्विघ्नपणे पार पडू दे कोणतीही अडचण येऊ नये माझे जे इच्छित फळ आहे .

ते पूर्ण होऊदे अशी प्रार्थना करायची शक्य झाल्यास काही गोडाचा नैवेद्यही दाखवावा घरी आल्यावर आपल्या देवाऱ्याजवळ बसावे किंवा पूर्वाभिमुख म्हणजे पूर्वेकडे तोंड करून बसावे यानंतर सर्वप्रथम आपण संकल्प करावा की आपण हे पारायण कोणत्या इच्छेसाठी कोणत्या कारणासाठी करत आहोत

संकल्प झाल्यानंतर पहिला पारायणाला बसताना शुभ्र वस्त्र परिधान करणे आवश्यक आहे शुभ्र वस्त्र परिधान करुनच हे पारायण करावे याच्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचे आसन घेऊ शकता पाटावर बसू शकता आणि पारायणाला सुरुवात करू शकता .

आपल्याला सात दिवसांचे पारायण करायचे आहे आपण अध्याय कशाप्रकारे वाचावे हे लक्षात घेणं गरजेचं आहे की शिवलीलामृत ग्रंथामध्ये १५ अध्याय आहेत यापैकी १४ अध्याय अत्यंत महत्त्वाचे आहेत,

म्हणजे १५ वा अध्याय हा त्यामध्ये नंतर जोडलेला आहे त्यामुळे १४ अध्याय हे महत्त्वाचे आहेत या सात दिवसांमध्ये प्रत्येकी दोन अध्याय प्रती दिवशी वाचावे असे १४ अध्याय पूर्ण करावे

आणि शेवटच्या दिवशी सोमवारी सुरू केल्यानंतर रविवारी पारायण पूर्ण होईल १४ वा अध्याय झाल्यावर १५ वा अध्याय वाचू शकता तो अध्याय वाचून पारायण पूर्ण करावे अशाप्रकारे याचे वाचन करावे

कोणत्या वेळेत पारायण करावे? महादेवाला जी प्रदोष काळाची वेळ सर्वात आवडती आहे जी प्रिय आहे ती वेळ वाचण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे काहीजणांना हे शक्य नसल्यास त्यांनी सकाळी सुध्दा याचे वाचन करू शकता.

पारायण करताना उपवासाचे काही नियम आहेत हे पारायण करताना उपवास करणे गरजेचे आहे एकमुक्त राहून उपवास करावा एकमुक्त म्हणजे एकवेळ खाऊन राहणे यामध्ये संपूर्ण दिवस उपवास झाल्यानंतर संध्याकाळी आपण कोणत्याही प्रकारचे अन्न ग्रहण करू शकता.

त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मांसाहार मद्यपान वर्ज्य आहे संपूर्णपणे सात्विक आहार करावा पोथी वाचन झाल्यानंतर अन्न ग्रहण करू शकता असे प्रती दिवसाचे वाचन व नियम आहेत या ग्रंथाचे पारायण स्त्री पुरुष दोघेही करू शकतात.

महादेवाची भक्ती सर्वांसाठी समान आहे पारायण काळा असे वागावे? पारायण काळात आपले आचरण हे संपूर्ण सात्विक साधेपणाचे असणे गरजेचे आहे कोणत्याही प्रकारे असत्य भाषण करू नये कोणालाही दुखावले जाईल असे कृत्य करू नये या पारायनाचे

उद्यापन करणे हे अत्यंत सोपे आहे वाचन पूर्ण झाल्यानंतर रविवारी जेव्हा पारायण पूर्ण होते त्यांनतर महादेवाच्या मंदिरात जावे आणि महादेवाला बेलपत्र वाहून नमस्कार करावा नैवैद्य दाखवावा कोणत्याही प्रकारचा नैवैद्य आपण दाखवू शकता.

त्यांनतर मंदिरात पूजाही असते त्यांना वस्त्रे द्यावीत तांदूळ द्यावे काही दक्षिण द्यावी त्यांचा आदर सत्कार करावा किंवा काही जोडप्यांना बोलावून त्यांचा आदर सत्कार करू शकता याबरोबरच काही गरजू लोकांना आवश्यक असलेल्या वस्तू पुरवू शकता.

अशाप्रकारे याचे उद्यापन करू शकता उद्यापन करण्यासाठी काहीवेळा मंदिरात जाणे शक्य होत नाही त्यावेळी घरच्या घरी करू शकता आठव्या

दिवसापासून कोणतीही पारायनाचे नियम लागू होणार नाहीत या काळात ब्रह्मचर्यचे पालन केल्यास उत्तम राहील महादेव हे वैरागी असल्यामुळे आपण ब्रह्मचर्येचे पालन केल्यास आपल्याला अधिकच त्याची फल प्राप्त होतात हे पारायण सुरू करताना काही गोष्टींची दक्षता घ्यावी.

आपल्या पारायणात कोणत्याही प्रकारे खंड पडणार नाही हे पाहूनच पारायानाला सुरुवात करावी, म्हणजे महिलांनी पारायण सुरु करताना आपल्या मासिक धर्माची अडचण येणार नाही याची काळजी घ्यावी

आणि अजून एक काळजी म्हणजे सर्वांनीच घ्यावी ती म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचे सुतक लागणार नाही अशी वेळ पाहूनच पारायणाला सुरुवात करावी अत्यंत सोपे नियम आहेत फक्त इच्छा श्रद्धा भक्ती असणे गरजेचे आहे

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!