नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, आपल्या कर्मावर लक्ष ठेवणाऱ्या 13 गोष्टी..
सनातन धर्माचा अनेक पुस्तकांमध्ये 84 लक्ष योनीचा उल्लेख आहे. असे म्हणतात की, 84 लाख जन्मांचा टप्पा ओलांडल्यानंतर सत्कर्माच्या जोरावर मनुष्य देह मिळतो आणि आत्मा मनुष्य रुपात जन्माला येतो.
पण 84 लक्ष योनी नेमक्या कशा आहेत? याबद्दल पद्मा पुराणामध्ये तपशीलवार वर्णन केलेला आहे. चला जाणून घेऊया..
पद्म पुराणानुसार 84 लाख योनीचा अर्थ ब्रह्माडात आढळणारे विविध प्रकारचे प्राणी होय. याच सजीवांना योनीज आणि संज्ञावती या दोन भागात विभागला आहे. त्याचबरोबर प्राण्यांचे शरीर थलचर, नभचर आणि जलचर असून 3 भागात वर्गीकरण करण्यात आलेला आहे.
पुराणात 9 लाख जलचर, 20 लाख झाडे आणि वनस्पती, 11 लाख कीटक, 10 लाख पक्षी आणि 30 लाख प्राणी आणि 4 लाख देवता मानव आणि दानव असल्याचे सांगितले जाते. या सर्वांचा मिळून एकूण 84 लाख योनी तयार होतात.
नरदेहाला अर्थात मनुष्य देहाला मुक्तीद्वार म्हटलं जातं. कारण मानवी देहात ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, मेंदू आणि विचार करण्यासाठी मन दिले आहे. त्यामुळे बरेवाईट यातला फरक मानव ओळखू शकतो.
पुण्यकर्म करावे आणि या चक्रातून मुक्ती मिळावी अशी ईश्वराची रचना आहे. तसं झालं नाही तर आत्म्याचा प्रवास पुन्हा सुरु होतो. सुखदुःखाचे सोहळे, पीडा, भय या सगळ्या गोष्टी 84 लाख देहाच्या प्रवासात पुन्हा सहन करावे लागतात, म्हणून हा देवाची सत्कारणी लावा अस संत सुद्धा कानीकपाळी ओरडून सांगतात.
याच गोष्टीला पद्मपुराण आणि इतर ग्रंथात सुद्धा दुजोरा दिलेला आहे. पद्मपुराणात असे म्हटले गेले आहे की, जेव्हा आत्मा 84 लाख विहीत योनीचा प्रवास पूर्ण करतो आणि त्याचं कर्म देखील चांगला असतं.
तेव्हा त्याला पितृ किंवा देवयोनी प्राप्त होते, अर्थात ती व्यक्ती मृत्यू नंतर वैकुंठ धमाला जाते. दुष्ट कर्म करणारा आत्मा पुन्हा 84 लाख योनीच्या जन्मास जन्म घेण्यासाठी पाठवला जातो आणि पुराणांमध्ये यालाच दुर्गति म्हटले आहे, म्हणजे आत्मा पुन्हा जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो.
त्यामुळे स्वर्गात कि नरकात हे आपलं भाग्य नाही तर आपलाच कर्म ठरवत असतं. त्यामुळे हे लक्षात ठेवा आणि नेहमी प्रामाणिकपणे आपलं काम करत राहा. कारण आपल्या प्रत्येक कामाची नोंद घेतली जाते
आणि ते काम नीट केलं नाही तर पुन्हा आपल्या आत्म्याला 84 लक्ष योनीचा प्रवास करावा लागणार हे निश्चित.
मग मंडळी आता विचार करा मनुष्यचा जन्म किती दुर्लभ आहे आणि तो मिळाला तर आपण सत्कर्मात घालवायला हवा की नाही. उगाच नको त्या गोष्टींमध्ये वाया का घालवावा. म्हणून सत्कर्माची कास धरा आणि नामस्मरण करा..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments