नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, शिव शंकराची सर्वात आवडती वस्तू म्हणजे बेल, जसे गणेशाची प्रिय वनस्पती दुर्वा, भगवान विष्णूंची तुलसी तशीच बिल्वपत्र वाहिल्याने आपले सर्व पाप नष्ट होते असे इतके महत्व या बेलाचे आहे.
भोळे सांब सदाशिव हे भगवान शिव शंकर आपल्या भक्तांवर लगेच प्रसन्न होतात. शिवाची आराधना करताना आपण नेहमीच स्वच्छ पवित्र मनाने करावी
त्यासाठी विशेष विधी, मंत्र लागत नाहीत असा हा शिवाचा महिमा आहे. आपल्या घराजवळ जर बेलाचे झाड असेल तर ते अतिशय सुंदर,पवित्र लहरी घरामध्ये वास करतात.
तसेच घरातील वातावरण हे नेहमी सकारात्मक राहते. आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा असेल किंवा वाईट शक्ती असतील तर त्या दूर होण्यास मदत होते.
हिंदू धर्मातील शास्त्रनुसार ही एक दिव्य अशी अलौकिक वनस्पती सांगितली जाते. शिव पुराणात असा उल्लेख येतो की हे बेलाचे झाड देवादी देव महादेवांना अतिशय प्रिय आहे.
बेलाच्या पानाचे झाड आपल्या घराच्या आसपास लावण्याने तसेच कोणत्या दिशेला असावे याबद्दल काही पौराणिक शास्त्रात माहीत दिली आहे. काही लोकांचा असा गैरसमज आहे की बेलाचे झाड घरात असू नये.
कारण बेलाचे झाड हे अतिशय पवित्र व दिव्य असते. त्याशिवाय महादेवांना अतिप्रिय आहे म्हणून हे झाड घराच्या आसपास लावल्याने वातावरण प्रसन्न राहते.
आपल्या घराच्या पुढच्या बाजूला हे बेलाचे आणि मागच्या बाजूला केळीचे झाड असेल तर आपल्या घरात देवी लक्ष्मीचे निरंतर वास्तव्य राहते,असे सांगितले जाते.
कारण ही दोन झाडे आपल्या घरात असल्यास कधीही कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या जाणवत नाही. देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव या बेलाच्या झाडामुळे होत असते.
तसेच हे बेलाचे पान कधीही शिळे होत नाही ते स्वच्छ धुवून पुन्हा आपण महादेवांना बेलाचे पान अर्पण केले ,तरी चालते. बेलाच्या पानांचा वापर हा पूर्ण सुखेपर्यंत चूर्ण होई पर्यत देखील याचा वापर केला जातो.
याशिवाय महादेवांना प्रसन्न करून आपली मनातील इच्छा आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण जी महादेवाची पुजा करतो त्यामध्ये हे बेलाचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.
बेलाच्या झाडाचे पूजन केल्यास काशीयात्रा केल्याचे पुण्य मिळते ,असे सांगितले जाते. शास्त्रांमध्ये सांगितले जाते की , हे बेलाचे झाड लावल्याने आपला वंश पुढे वाढत राहतो
तसेच जे लोक बेलाचे झाड तोडतात त्यांचा वंश बुडतो असेही सांगितले जाते. जर कोणत्याही मृत व्यक्तीचा मृतदेह हा या बेलाच्या झाडाखालुन नेल्यास ,
त्या मृत आत्म्याला मोक्षाची प्राप्ती होते. जर घराच्या अंगणात अगदी समोर बेलाचे झाड लावलेले असेल तर आपल्या घरात कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही.
जर आपल्या घरात नेहमी वाद -विवाद, अपयश ,भांडण-तंटे होत असल्यास हे झाड आपल्या अंगणात किंवा घरच्या जवळपास लावल्याने या समस्या दूर होतात.
हे बेलाचे झाड घराच्या उत्तर पश्चिम म्हणजेच वायव्य दिशेला लावल्यास घरातील लोकांना कोणत्याही क्षेत्रात मानसन्मान मिळण्याची शक्यता असते.
त्यांना यशाची प्राप्ती होते , त्यांना त्याच्या क्षेत्रातील महत्त्वाच अधिकाऱ्याचे पद मिळू शकते. बेलाच्या झाडात देवी लक्ष्मी आणि केळीच्या झाडामध्ये भगवान श्री विष्णू यांचे देखील वास्तव्य असते,
त्यामुळे ही दोन्ही झाडं आपल्या घरच्या आसपास असली पाहिजेत. तसेच हे बेलाचे झाड आपल्या घराच्या उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य दिशेला लावले तर आपल्या घरात समृद्धी येते.
देवी माता लक्ष्मीचे आपल्या घरात वास्तव्य राहते.घरावर कोणतीही वाईट शक्ती प्रभाव टाकू शकत नाही. तसेच कोणत्याही प्रकारचा तंत्र-मंत्राचा परिणाम होत नाही , कुदृष्टी, करणी बाधा यापासून आपले रक्षण होते.
नेहमी स्वामींची उदी सोबत ठेवा. कोणतीच बाधा होणार नाही. ईश्र्वरावर भरोसा ठेऊन सगळी कामे करा. कोणावर पटकन विश्वास ठेऊ नका. कुणी घात करतेय का पडताळून पहा.
महाशिवरात्री पावन पर्वावर आपण बेल खा. बेलाचे पान खाल्याने सर्व आजार दुःख दूर होतात. शक्य तितकं ध्यान करा.
शिवसहस्त्र नाम घ्यावे. अखंड जलाभिषेक करा तसेच उसाचा रस घेऊन अभिषेक केल्यास मनातील इच्छा पूर्ण होते आणि जप शक्यतो रुद्राक्ष माळेवर करावा.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments