नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, महाशिवरात्रीला भारतातील अनेकविध ठिकाणी महादेवाची पूजा मोठ्या प्रमाणात करता येते. तसे पाहिल्यास प्रत्येक मराठी महिन्यात शिवरात्र असते. मात्र, माघ महिन्यातील शिवरात्र, महाशिवरात्री म्हणून साजरी करण्यात येते.
माघ वद्य चतुर्दशीला म्हणजेच १ मार्च रोजी महाशिवरात्री साजरी करण्यात येत आहे. भारतीय संस्कृती व परंपरांमध्ये महाशिवरात्रीला अनन्य साधारण महत्त्व आहे. यावर्षीची महाशिवरात्री अनेकार्थाने विशेष आहे.
या वर्षी तुम्ही प्रत्यक्ष देवळात जाऊन दर्शन घेऊ शकतात आणि महादेवाची संपूर्ण पूजा विधी करू शकतात. इतर कारणांमुळे तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरच्या मंदिरातही पूजा करू शकतात.
या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा. महाशिवरात्रीदिनी प्रत्येक प्रहराच्या वेळी आणि निशीथकालात यशाशक्ती शिवपूजा करावयाच्या असतात. पहिल्या प्रहरात ‘श्रीशिवाय नमः’ असा नामोच्चार करावा.
दुसऱ्या प्रहरात ‘श्रीशंकराय नमः’ असे म्हणावे. निशीथकाली ‘श्रीसांबसदाशिवाय नमः’ असे जपावे. तिसऱ्या प्रहरात ‘श्रीमहेश्वराय नमः’ आणि चौथ्या प्रहरात ‘श्रीरुद्राय नमः’ असा नामोच्चार करून समर्पण करावे.
तसेच शंकराला पंचामृत अर्पण करावे. पंचामृतानंतर शिवलिंगावर रुद्राभिषेक करावा. यानंतर गंध, अक्षता, फुले वहावित. नैवेद्य दाखवून शंकराचे नामस्मरण करावे.घरी महादेवाची पिंड किंवा प्रतिमा असेल तर चौरंगावर विधीवत ठेऊन पूजा मांडावी.
पिंड किंवा प्रतिमा नसेल तर वाळूची पिंड मांडून पूजा करावी. पहाटे स्नान करून पूजा करावी. या पूजेला देवाला अभ्यंगस्नान घालावे.
बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शिवपिंडीवर वाहाव्यात. शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृतानी स्नान घालावे. ऊॅं नम: शिवायसह शिवस्मरणात जागरण करावे.
शिवपूजेत हळद-कुंकू न वापरता भस्म वापरावा, तर शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात. नैवेद्य दाखवावा आणि निरांजन ओवाळावं आणि आरती करावी.
सर्वत्र महाशिवरात्रीला उपवास केला जातो. शरीर शुद्धीकरणासाठी उपवास केले जातात. ठराविक प्रमाणात घेतलेला ठराविक आहार शरीरावर विशिष्ठ परिणाम करतात. म्हणून शरीर शुद्धीकरणासाठी आणि मन सजग आणि शांत बनते.
काहीजण दूध आणि फळे खाऊन उपवास करतात तर काहीजण निव्वळ पाणी पिऊन उपवास करतात. थोडीशी फळे आणि पाणी पिऊन उपवास करावा किंवा पचायला हलका आहार घेऊन उपवास केल्याने शरीर हलके रहाते.
उपवासासोबत रात्रभर आराधना, प्रार्थना आणि ध्यान करत जागरण करावे. महाशिवरात्रीच्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा.
शिवपुराणात महाशिवरात्रीसंदर्भात एक कथा आढळून येते. सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेव आणि पालनहार श्रीविष्णू यांच्यात श्रेष्ठत्वावरून जोरदार वाद झाला. दोघांचे भांडण सुरू असताना, त्यांच्यासमोर एक महाकाय अग्निस्तंभ प्रकटला.
या अग्निस्तंभाचे तेज पाहून दोघे जण स्तिमित झाले. प्रकटलेल्या अग्निस्तंभाचा शोध घेण्यासाठी विष्णू देवांनी वराह रुप, तर ब्रह्मदेवांनी हंसाचे रुप धारण केले. काही केल्या या दोघांचा त्याचा आदि-अंत समजेना.
अखेर त्या अग्निस्तंभातून शिवशंकर प्रकट झाले. शिवतत्त्व या दिवशी प्रथम पृथ्वीवर अवतरल्यामुळे हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जाऊ लागला.
प्रथम प्रहर पूजा, 18 फेब्रुवारी: शनिवारी संध्याकाळी 06:41 ते रात्री 09:47 दुसऱ्या प्रहरची पूजा , 18 फेब्रुवारी: शनिवारी रात्री 09:47 ते 12:53, तिसऱ्या प्रहरची पूजा
19 फेब्रुवारी: रविवारी रात्री 12:53 ते 03:58 चौथ्या प्रहरची पूजा, 19 फेब्रुवारी: रविवार पहाटे 03:58 ते सकाळी 07:06
शिव हा विरोधाभासांचा सुंदर समन्वय आहे.भगवान शिवाचे हे चरित्र मानवी जीवनातील सर्वोच्च आदर्शांचा कळस आहे. महादेव हे गृहस्थ तसेच वितरागी आदियोगी आहेत, त्यांचा गुण हा संदेश देतो की भगवंताच्या भक्तीसाठी संसाराचा त्याग करावा लागत नाही, योगमार्गाचा अवलंब करावा लागतो.
स्वतःच्या वाईट प्रवृत्तींचा, आसक्तीचा आणि अहंकाराचा त्याग केला पाहिजे, जेणेकरून विवेकाला योगाशी सुसंगत करता येईल. कैलास निवासी भगवान शिव एकीकडे परमपवित्र हिमालयात तपश्चर्येत तल्लीन राहतात
आणि दुसरीकडे स्मशानभूमीत भूतांसह वास्तव्य करतात असे मानले जाते. याचा व्यावहारिक अर्थ असा आहे की, शुद्ध आणि श्रेष्ठ यांच्याशी संबंध असणे हे श्रेयस्कर आहे, परंतु ते घृणास्पद आणि पापी मानले जाऊ नये.
सर्व देवाची मुले आहेत आणि तो स्वतः सर्वांवर समान प्रेम करतो. शिव येथे योग्य दृष्टी आणि मैत्री शिकवतो.महाशिवरात्री हा महान सण आपल्याला सृष्टीवर भगवंताच्या अवताराची आठवण करून देतो.
या व्रताच्या नियमात पहाटे स्नान करून उपवास केला जातो.महाशिवरात्रीच्या उपवासाचे काही नियम आहेत. काही भाविक निर्जल उपवास करतात तर काही फळे खातात. तसे, उपवासात फळे आणि पाण्याचे मिश्रण असावे,
म्हणजे तहान लागली असेल तर पाण्याचे सेवन करावे आणि भूक लागल्यास फळांचे सेवन करावे. महाशिवरात्रीला एकत्र ध्यान आणि उपवास केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात. खरे. ते होऊ लागते.
महाशिवरात्रीचे व्रत परम भक्तीभावाने पाळणाऱ्या व्यक्तीवर भगवान शंकराची कृपा होऊन त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे म्हटले जाते. शिवरात्रीचे खरे व्रत म्हणजे परमात्मा शिवाशी आपली बुद्धी जोडून त्याच्या जवळ राहणे.
उपवासाचा अर्थ जवळ राहणे. जागरणाचा खरा अर्थही काम आहे,महाशिवरात्रीला शिव आणि शक्तीची भेट झाली , शिवभक्त रात्रभर आपले आराध्य जागरण करत असतात. शिवभक्त या दिवशी भगवान शिवाचा विवाह साजरा करतात. असे मानले जाते की महाशिवरात्रीला शक्तीचा विवाह भगवान शिवाशी झाला होता.
या दिवशी भगवान शिव एकांतवासाचा त्याग करून गृहस्थ जीवनात प्रवेश केला. एकांती असलेला शिव गृहस्थ झाला. शिवरात्रीच्या १५ दिवसांनी होळीचा सण साजरा करण्यामागे हे देखील एक कारण असल्याचे मानले जाते. म्हणूनच महाशिवरात्री हा हिंदू धर्म मानणाऱ्या आणि भगवान शिवाच्या उपासकांचा प्रमुख सण आहे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments