नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,श्री स्वामी समर्थ, झाडू आपल्या घरातील घाण कचरा एकत्र करून बाहेर काढते व आपले घर स्वच्छ ठेवते. असे मानले जाते की ज्या घरात स्वच्छता असते तेथे सकारात्मक उर्जा कायम वास्तव्य करते.
व अशा घरातील सर्व वास्तू दोष निघून जातात झाडूशी निगडित अनेक नियम आहेत व झाडूच्या अनेक उपायांनी आपण आपले जीवन सुखी व समृद्ध करू शकतो.
आपण पाहणार आहोत की, रात्री झाडूखाली अशी कोणती वस्तू लपवून ठेवावी त्यामुळे आपले नशीब पलटेल .असे म्हणतात की हात फिरे तिथे लक्ष्मी वसे ज्या ठिकाणी स्वच्छता असते, अशा ठिकाणी देवी लक्ष्मीचे वास्तव्य असते आणि झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीकही मानले जाते.
असे म्हणतात एकादशीच्या दिवशी तीन झाडू गुपचुपपणे कोणालाही न सांगता सकाळी सकाळी अंधारात एखाद्या मंदिरात नेऊन ठेवले किंवा त्यातीलच एका झाडूने संपूर्ण मंदिर स्वच्छ करून ते तीनही झाडू गुप्तदान म्हणून तेथेच ठेऊन दिले.
आणि त्या झाडुनी जसजशी मंदिराची साफसफाई होईल तसतशी आपल्या घरातील दारिद्य्र, नकारात्मक शक्ती, वाईट शक्ती, दुख, त्रास, अडचण, बाधा या हळूहळू दूर होऊ लागतील.
आपण आपल्या घरात ज्या झाडूने घराची स्वच्छता करतो तो झाडू कधी कोणालाही देऊ नये. घरातील झाडू वापरून वापरून खराब झाला असेल झाडताना झाडूचा काही भाग निघत असेल तर असा झाडू त्वरित बदलावा.
जुना खराब झालेला व तुटलेला झाडू कधीह घरात स्वच्छतेसाठी वापरू नये. यामुळे वास्तु दोष उत्पन्न होतो. घरातील झाडू जर कोणाला दिला तर देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होते व घरातून निघून जाते.
जेवण केल्यानंतर जमिनीवर जर उष्टे पडलेले असेल तर सरळ झाडूने झाडू कधीही एकत्र करू नये. आधी ते कपड्याने पुसून स्वच्छ करावे. त्यानंतरच झाडुनी झाडावे. नाहीतर घरात वास्तुदोष उत्पन्न होतो.
घरातील फरशी पुसताना त्या फरशी पुसण्याचा पाण्यात थोडेसे मीठ टाकावे यामुळे घरातील जीवजंतू नष्ट होतात. नकारात्मक शक्ती आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही आणि देवी लक्ष्मीचा आपल्यावर घरावर आशीर्वाद राहतो.
परंतु अशी मान्यता आहे की गुरुवारी कधीही फरशी पुसून नये. नाहीतर देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होते. याशिवाय, गुरुवारी फरशी पुसणे खूप आवश्यक असेल तर फरशी पुसण्याचा पाण्यात चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने फरशी पुसावी. यामुळे तो दोष नष्ट होतो. झाडू कधीही मोकळ्या जागेत ठेवू नये.
झाडू नेहमी कोपर्यात लपवून ठेवावा. आपल्या घरातील झाडू कोणाला दिसणार नाही अशा प्रकारे झाडू ठेवावा बाहेरच्या व्यक्तीची आपल्या झाडूवर नजर पडल्यास हा अपशकुन मानला जातो.
मित्रांनो किचन मध्ये किंवा अन्नधान्य ठेवण्याच्या जागी कधीही झाडू ठेवू नये. नाहीतर आपल्या घरातील अन्नधान्याचा साठा लवकर लवकर संपू लागतो. अन्नधान्यात बरकत राहत नाही. तसे आरोग्याशी निगडित समस्याही उद्भवतात.
झाडू कधीही खराब होऊ देऊ नये. झाडू नेहमी स्वच्छ राहील या गोष्टीकडे लक्ष द्यावे. घरात नवीन झाडू आणला की त्याचा वापर करण्यापूर्वी त्याच्या मुठीला लाल रंगाचा दोरा गुंडाळून त्याचे पूजन करावे व त्यानंतरच त्या झाडूचा वापर करावा.
यामुळे आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहते. जर एखादा लहान बालक अचानक पणे हातात झाडू घेऊन घरात झाडू मारू लागला तर समजून जावे अचानकपणे आपल्या घरी पाहुणे येणार आहेत.
झाडूला कधीही पाय लावू नये आणि जर चुकून कधी आपल्या पायाचा स्पर्श झाला तर लगेच झाडूला नमस्कार करावा. झाडूचा शरीराला स्पर्श होणे ही अपशकुन मानले जाते.
झाडू चुकून आपल्या शरीराला लागली तर झाडूला नमस्कार करावा व लगेच तोंड हात पाय धुऊन घ्यावेत. झाडूने कोणालाही मारू नये. मग तो प्राणी असो की व्यक्ती असो. जर कोणी घरातून बाहेर पडले तर लगेच घरात झाडू मारू नये.
घरातून बाहेर पडले आणि आपण लगेचच घरात झाडू मारायला सुरुवात केली तर ती व्यक्ती घरातून बाहेर पडली आहे त्या व्यक्तीच्या कार्यात अडथळे येतात. त्याचे कार्य पूर्ण होत नाही.
म्हणून घरातून बाहेर पडले तर कमीत कमी अर्धा तासानंतर झाडलोट करावी. झाडू कधीही उभे करून ठेवू नये जमिनीवर आडवा ठेवावा. याशिवाय दोन झाडू कधीही एकत्र ठेवू नयेत.
यामुळे घरात भांडण व वादविवाद होत राहतात. नवीन घरात प्रवेश करतो त्या वेळी एक नवीन झाडू घेऊनच घरात प्रवेश करावा.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments