नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,सूर्य उपासनेमुळे मानवला जीवन यश, धन-संपत्ती, सुख-शांती प्राप्त होते असं शास्त्रात म्हटलं आहे. तसेच रविवारी सूर्य उपासना केल्यास त्याचा बराच फायदा होतो.
दररोज विधीवत भगवान सूर्याची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात.
सूर्य मंत्राचा जप केल्याने जन्मकुंडलीतील सूर्याची स्थिती बळकट होते. या दिवशी पूजा-अर्चना केल्याने एखाद्या व्यक्तीला अनेक दुःखातून मुक्तता मिळते. मान्यता आहे की, भगवान सूर्याची पूजा केल्याने घरात यश, सुख, समृद्धी आणि संपत्ती येते.
परंतु तुम्हाला माहिती आहे काय की भगवान सूर्यला अर्घ्य अर्पण करताना काय सावधगिरी बाळगली पाहिजे. भगवान सूर्याला अर्घ्य अर्पण करण्याचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. ही परंपरा वर्षानुवर्षे सुरु आहे.
सकाळी स्नान केल्यानंतर भक्त सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करतात आणि प्रार्थना करतात. सूर्यदेवाला नेहमी तांब्याच्या कलशातून अर्घ्य द्या. भगवान सूर्यला कधीही स्टील, प्लास्टिक किंवा काचेच्या बाटलीतून अर्घ्य अर्पण करु नये.
अर्घ्य अर्पण करताना भांडे दोन्ही हातांनी धरुन डोक्याच्या वर पकडून जल अर्पण करावे. यामुळे सूर्याची किरणे डोक्यावर पडतात. भगवान सूर्याला अर्घ्य अर्पण करताना कलशात अक्षता आणि लाल फुले ठेवणे शुभ मानले जाते.
मान्यता आहे की जल अर्पण करताना त्याचे शिंतोडे तुमच्या पायावर पडल्यास तुमची पूजा अपूर्ण मानली जाते. सूर्यदेवाला अर्घ्य देताना आपला चेहरा पूर्व दिशेने असावा. तांब्याचा कलश दोन्ही हातांनी धरुन ठेवा
आणि नंतर भगवान सूर्याला जल अर्पण करा. हे लक्षात ठेवावे की अर्घ्य देताना सूर्याची किरणे त्या प्रवाहात दिसतील. यामुळे नवग्रह मजबूत होतात. सूर्य देवाला अर्घ्य देताना सूर्यमंत्रांचा जप करावा.
स्मरामि खलु तत्सवितुर्वरेण्यम् रूपं हि मण्डलमृचोथ तनुर्यजूंषि। सामानि यस्य किरणा: प्रभवादिहेतुं ब्रह्माहरात्मकमलक्ष्यमचिन्त्यरूपम्।।
सूर्याला दररोज अर्घ्य करण्याचे फायदे –भगवान सूर्याला जल अर्पण केल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते. मान्यता आहे की भगवान सूर्याला अर्घ्य अर्पण करताना पाण्याचा प्रवाह आणि त्यावर पडणारी किरणे पाहून मनात सकारात्मक ऊर्जा संचाकते.
धर्मग्रंथानुसार दररोज भगवान सूर्याला अर्घ्य अर्पण केल्याने कुटुंबातील सदस्य निरोगी राहतात. या व्यतिरिक्त, कुंडलीतील सूर्य दोषांशी संबंधित समस्या दूर केल्या होतात.
याचबरोबर, सूर्य देवतेची मनोभावे पूजा केल्यास आणि त्यास अर्घ्य अर्पण केल्यास आपल्या मनोकामना निश्चित पूर्ण होतील. सूर्य उपासनेसोबतच आदित्यस्त्रोत्र देखील पाठ करणं आवश्यक आहे. कारण की, ते देखील लाभदायक आहे.
जर आपल्या कुंडलीत सूर्य जर कमकुवत स्थानी असेल तर त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण आयुष्यावर झालेला दिसून येतो. त्यामुळे आपण कितीही मेहनत केली तरी आपल्याला अपेक्षित यश हे मिळतच नाही.
रविवारी सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर सूर्य मंत्राचा जप करा. कारण ज्योतिषमध्ये रविवार सूर्यदेवाच्या उपासनेचा विशेष दिवस मानण्यात आला आहे. कुंडलीमध्ये सूर्य शुभ स्थितीमध्ये असल्यास व्यक्तीला घर-कुटुंब आणि समाजात मान-सन्मान मिळतो.
सूर्यामुळे व्यक्ती धन आणि प्रसिद्धी प्राप्त करतो. ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्यदेवाची स्थिती ठीक नसेल त्यांना खूप कष्ट करूनही मनासारखे यश आणि फळ प्राप्त होत नाही.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments