नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, शनिवारचा दिवस भगवान शनिदेवाला समर्पित असतो. शनिदेवाला न्यायाचा देवता असे म्हटले जातं. शनिदेव सर्व कर्मांचा हिशेब ठेवत असल्याने सांगितले जाते.
तसेच या कर्मानुसार ते फळ देतात. कुंडलीमध्ये शनि दोष, महादशा, साडेसाती असल्याने व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. जर कुठल्या व्यक्तीवर शनिदेव प्रसन्न झाले तर,ते त्या व्यक्तीवर कुठल्याही प्रकारची समस्या येऊ देत नाही. व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळत.
ज्योतिष शास्त्रानुसार, जे लोक चांगले कर्म करतात ,यांच्यावर शनिदेवाचा अशुभ परिणाम होत नाही. शनिदेव हे न्यायाचे देवता असल्यामुळे ते मनुष्याच्या प्रत्येक वाईट कर्माची शिक्षा देत असतात.
असे म्हटले जाते की ,शनिदेव जर एखाद्या वर क्रोधित झाले तर त्याचा नाश हो असतो. शनिदेव मनुष्याच्या कर्मानुसार फळ देऊन, त्याला एक चूक सुधारण्याची एक संधी देतात.याशिवाय हे शनिदेव जर एखाद्याच्या कुंडलीत असल्यास त्या व्यक्तीच्या जीवनात खुप समस्या निर्माण होतात.त्यामुळे आपण जर शनिदेवाची उपासना केल्यास ,
आपल्या कुंडलीतील मोठ्यातला मोठा समस्या किंवा दोषाचे निवारण होत असते.
आपल्याला जर आर्थिक समस्या असतील, किंवा पैशासंबंधी काही अडचणी असतील तसे यामुळे तुम्ही कर्जबाजारी झाला असाल, त्याशिवाय तुम्हाला प्रत्येक कामात अडथळा निर्माण होत असेल.
यासारख्या अनेक समस्या दूर करण्यासाठी हा उपायाचा उपयोग होऊ शकतो.या उपायासाठी जर आपल्याला शनि देवाची कृपादृष्टी प्राप्त करायचे असेल,तर प्रत्येक शनिवारी शनिदेवांना तेल अर्पण करून त्यांची पूजा करावी.
या व्यतिरिक्त प्रत्येक पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करून, त्याची पूजा करावी आणि त्या झाडाला 7 प्रदक्षिणा पूर्ण घालाव्यात. शनिवारच्या दिवशी व्रत केल्याने ,आपल्या कुंडलीतील शनिदोष दुर होतो.
याचबरोबर काळ्या गाईला तेल किंवा एकदा ब्राम्हणाला काळे घोंगडी दान करावी.तसेच घरात शनीयंत्राची स्थापना करून नियमित विधीपूर्वक पूजा केल्यास तर शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतील.यासह या यंत्राच्या पुढे मोहरीचे दिवा लावावा.
शनि देवाची कृपादृष्टी प्राप्त करण्यासाठी दोन पोळ्या बनवून एक पोळी तेल तर दुसरा पोळीला शुद्ध तुप लावावे.या दोन्ही चपात्या काळ्या गाईला खायला द्याव्यात,
त्याबरोबरच शनिदेवांचे नियमित पूजा करावी.तसेच शनिवारच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावून पाणी अर्पण केल्यास,
शनि देवा आणि माता देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतात.महाबली हनुमानाचे पूजा करावी या दरम्यान हनुमानाला शेंदूर ,काळया तिळाचे तेल आणि तिळाचे तेल, तसेच लाल फूल अर्पण करावे.
हा उपाय शनिवारी केल्यास, आपल्या प्रत्येक कामात यश मिळून आणि प्रगती होण्यास मदत होते.त्याचबरोबर आपला आत्मविश्वास वाढतो.या प्रभावी उपायासाठी शनिवारी सकाळी लवकर उठून स्नान करून शनी देवाच्या मंदिरात जाऊन त्यांना नमस्कार करून ,
त्यानंतर तिथे राईचा दिवा लावावा. तसेच थोडेसे तेल शनिदेवांना अर्पण करून ओम शम: शनेश्वराय नमः या मंत्राचा जप 11 वेळा जप करावा.
याचबरोबर मंदिरातून घरी जाताना ,एक पोळी एका काळ्या कुत्र्याच्या खायला द्यावी आणि शनिदेवना दुःख कष्ट व त्रासांचे निवारण व्हावे,यासाठी प्रार्थना करावी.यामुळे आपल्या सर्व आर्थिक समस्यांचे निराकरण होते.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments