नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, भारतीय परंपरेनुसार चतुर्थी चंद्र महिन्यात दोनदा येते. भगवान गणेशाचा जन्म चतुर्थी तिथीला झाला होता, म्हणून ही तिथी गणेशाला समर्पित आहे.
अमावस्येनंतर येणाऱ्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी आणि पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी म्हणतात.
पण जर चतुर्थी तिथी मंगळवारी आली तर तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात.
यावेळी अंगारकी चतुर्थी वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तिसऱ्या तारखेला आहे म्हणजेच हा सण 19 एप्रिल 2022 रोजी साजरा केला जाईल.
अंगारकी चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असेही म्हणतात. अंगारकी चतुर्थी सगळ्यात मोठी चतुर्थी मानली जाते.
त्या सोबत ही चतुर्थी मंगळवारच्या दिवशी येत असेल तर तिचे अजून जास्त मान्यता असते. कारण मंगळवारचा दिवस हा श्री गणेश गणपतीचे दिवस असतो.
या दिवशी येणारी चतुर्थी ही खूप मोठी असते, म्हणून त्या दिवशी आपण गणपती बाप्पाला विशेष नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याची विशेष पूजा करायची आहे.
आरती करायची आणि मंत्र जाप करायचा आहे. तर 19 एप्रिल अंगारकी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला एक विशेष नैवेद्य म्हणजे मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे.
हा नैवेद्य तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेत दाखवू शकता. जर तुमच्या चतुर्थीच्या दिवशी उपवास असतो तर मग तुम्ही हा नैवेद्य संध्याकाळी दाखवू शकता नाहीतर इतर वेळी हा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता.
तसेच मोदक करणे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एक खोबर्याची वाटी म्हणजे सुक्या खोबर्याची वाटी आणि त्यामध्ये एक छोटासा गुळाचा खडा..
तो नैवेद्य सुद्धा गणपतीला तुम्ही दाखवू शकतात. जर मोदक केले तर मग गुळखोबरे दाखवायचे नाही. जर मोदक करत नसेल तर मग तुम्ही ते गुळखोबरे दाखवायचे आहे.
मग त्यानंतर गणपती बाप्पाचे पूजन करायचे, आरती करायची आहे. सगळं झाल्यानंतर जोही नैवेद्य केला आहे तो बाप्पा समोर ठेवायचा आहे.
मोदकांच्या असेल, गूळ खोबऱ्याचा असेल तर घरातल्या लोकांनी प्रसाद स्वरुपात खायचा आहे. तर अशा रीतीने 19 एप्रिल अंगारकी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आहे….
मात्र त्याआधी गणपतीची विधिवत पूजा केली जाते आणि उपवास केला जातो. अंगारकी चतुर्थीला उपवास केल्याने वर्षभर चतुर्थी तिथीचे फळ मिळते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा समज आहे.
अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेशाचे स्वरूप चतुर्मुखी आणि चार हातांचे असते असे मानले जाते. गणेशाच्या या रूपाला संकटमोचन गणेश म्हणतात.
असे मानले जाते की अंगारक म्हणजेच मंगळदेवाने गणेशाचे तप केले होते, त्यामुळे गणपतीने प्रसन्न होऊन मंगळवारी चतुर्थी तिथी येईल त्या दिवशी अंगारकी गणेश चतुर्थी म्हणून ओळखले जाईल असे वरदान दिले.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा.
Recent Comments