नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, भाऊबीज, भावासाठी करा 3 गोष्टी..
कार्तिक महिन्यात प्रामुख्याने लक्ष्मी देवी आणि श्रीविष्णू यांचे पूजन केले जाते. कार्तिक महिन्याचा प्रारंभ हा दीपोत्सवातील महत्त्वाच्या सणांनी होतो. कार्तिक शुद्ध प्रतिपदा बलिप्रतिपदा,
तर द्वितीया यम द्वितीया म्हणजेच भाऊबीज म्हणून साजरी केली जाते. यानंतरची पंचमी पांडव पंचमी व ज्ञानपंचमी म्हणून साजरी करण्याची परंपरा प्रचलित आहेत. याशिवाय याच महिन्यात कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची सांगता होते.
दिवाळीच्या बरोबर 15 दिवसांनी कार्तिक पौर्णिमा येते. हिंदू धर्मात कार्तिक पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवाळीतही घरोघरी दिवे लावून पूजा केली जाते. असे म्हणतात की या पौर्णिमेच्या पूजेने देव नेहमी प्रसन्न होतो.
या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुर राक्षसाचा अंत केला होता. या आनंदात देवतांनी दिवा लावून हा दिवस साजरा करण्यात येते.
हिंदू धर्मात कार्तिक पौर्णिमाचे अधिक महत्त्व आहे. याच दिवशी महादेव शिवशंकारांनी त्रिपुरासुरांचा वध केला होता, अशी मान्यता आहे. म्हणूनच ते ‘त्रिपुरारी’ या नावानेही ओळखले जातात.
या दिवशी शिव मंदिरात अखंड वात लावली जाते. एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. या दिवशी दिवाळीचा शेवटचा दिवस आहे असे मानले जाते.
कार्तिक पौर्णिमाच्या दिवशी दान करा या दिवशी पूजा, दान इत्यादी केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते. विष्णु पुराणानुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूने मत्स्यावतार घेतला होता.
या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केले तर ती गोष्ट पवित्र मानली जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केली जाते. कार्तिक पौर्णिमेला या चुका करू नका
कार्तिक पौर्णिमा हा अत्यंत पवित्र दिवस आहे, त्यामुळे या दिवशी कोणाशीही वाद घालू नका. कोणाशीही गैरवर्तन करण्याची आणि अपशब्द न बोलण्याची चूक करू नका.
या दिवशी शक्यतो तामसी पदार्थांचे सेवन करू नये.
या दिवशी मांसाहार आणि मद्यपान केल्याने जीवनात संकटे येतात, याची विशेष काळजी घ्या. या दिवशी कोणत्याही असहाय किंवा गरीब व्यक्तीचा अपमान करु नका. या पवित्र दिवशी नखे आणि केस कापणे देखील टाळावेत, असे केल्यास जीवनात संकटांना आमंत्रण मिळते.
या दिवशी ‘हरिहर भेट’ म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते, असे मानले जाते. म्हणून त्यावेळी बेल व तुळस वाहून त्यांची पूजा करतात. या दिवशी घरोघरी, अंगणात, मंदिरात दिवे लावण्याची पद्धत आहे.
कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी शुभ मानले जाते. कार्तिक पौर्णिमेला देशभरातील विविध भागांमध्ये जत्रा भरतात. यात्रा काढल्या जातात. पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते. नदीत स्नान करणे शक्य नसल्यास गंगाजल मिश्रित स्नान करावे, असे सांगितले जाते.
यानंतर लक्ष्मी नारायणाचे पूजन करावे. लक्ष्मी नारायणाची षोडशोपचार पूजा झाल्यानंतर तुपाचा दिवा लावावा. सत्यनारायण पूजन करणे या दिवशी उत्तम मानले गेले आहे.
सत्यनारायणाची पूजा शक्य नसेल, तर सत्यनारायणाची कथा आवर्जुन ऐकावी, असे सांगितले जात आहे. या दिवशी लक्ष्मी नारायणाला खिरीचा नैवेद्य दाखवावा.
सायंकाळी पुन्हा लक्ष्मी नारायणाची आरती करावी. तुळशीचे पूजन आणि आरती करावी. तसेच दीपदान करावे, असे सांगितले जाते.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments