सावधान!! या रंगांचे कपडे बनवतात श्रीमंत, तर या रंगांचे येऊन येतात दारिद्र्य!

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, आपण दररोज नीटनेटके कपडे परिधान करून घराबाहेर पडतो. कपडे परिधान करताना ड्रेस सेन्स आणि मॅचिंगची आपण विशेष काळजी घेतो. हे आपण चांगले दिसण्यासाठी करत असलो,

तरीही कपड्याच्या रंगाचा आपल्या आयुष्याशी खूप घट्ट संबंध असतो. आपल्या मनावर वेगवेगळ्या रंगांचा खूप खोलवर प्रभाव होतो. काही रंग थंडावा देतात तर काही रंग ऊर्जा वाढवतात.

त्याचबरोबर काही रंग मनाला जड करतात, तर काही रंग मनाला आनंद देतात. रंगांचे स्वतःचे सखोल विज्ञान आहे.

याशिवाय, ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहांचा आपल्या जीवनावर खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पडत असतो. सोबतच आठवड्यामध्ये सात दिवस असतात आणि प्रत्येक वार हा विशिष्ट ग्रहा संबंधित असतो.

त्याचबरोबर आपण प्रत्येक वेळी त्याच्या ग्रहाच्या अनुसार कपडे परिधान केले तर आपले भाग्य मजबूत बनते. आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळते त्याच बरोबरच प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होते.

चला तर मग जाणून घेऊया ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक वारी कोणत्या रंगाचे कपडे आपण परिधान केले केले पाहिजेत याबद्दल..

सोमवारचा वार हा भगवान शंकराचा दिवस मानला जातो तसेच सोमवार हा चंद्र ग्रहाचा सुद्धा वार मानला जातो म्हणून या दिवशी पांढरा रंगाचे कपडे तसेच चमकदार व सिल्वर रंगाचे कपडे अवश्य परिधान करावे.

अत्यंत शुभ फळ प्राप्त होते त्याचबरोबर आपले भाग्य दिवस बलवान होते. मंगळवारचा दिवस हा हनुमंताचा दिवस मानला जातो त्याचबरोबर मंगळवार हा मंगळ ग्रहाचा सुद्धा वार मानला जातो. या दिवसाचा स्वामी मंगळ असतो म्हणूनच या दिवशी तुम्ही लाल रंगाचे कपडे परिधान करा.

कारण हा लाल रंगाचा तुम्हाला उत्साह निर्माण करेल . तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये यश प्राप्त करून देईल. या दिवशी तुम्ही लाल रंगा सोबतच केशरी रंगाचे कपडे सुद्धा परिधान करू शकतात.

बुधवार हा श्री गणेश यांचा वार आहे आणि गणपती बाप्पा ना दूर्वा अधिक प्रिय आहे म्हणूनच बुधवारच्या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करावे. बुधवारच्या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये यश प्राप्त होते.

गुरुवारचा दिवस हा श्रीहरी विष्णूचा दिवस सोबतच साईबाबांचा दिवस सुद्धा मानला जातो. या दोन्ही देवांना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे म्हणूनच या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त पिवळ्या रंगाचा तसेच केशरी ,नारंगी, पर्पल, गुलाबी या रंगाचे कपडे सुद्धा परिधान करू शकतात.

हे सर्व रंग गुरूवारच्या दिवशी तुम्ही परिधान करू शकतात. शुक्रवारचा दिवस हा माता महालक्ष्मीच्या दिवस मानला जातो म्हणून या दिवशी माता महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तसेच ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये गरीबी कंगाली आहे .

त्यांनी माता महालक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी गुलाबी रंगाचा कपडे परिधान करावे. कारण हा गुलाबी रंग आपल्या जीवनामध्ये उत्कर्ष निर्माण करणारा आहे त्याचबरोबर माता महालक्ष्मीची कृपाप्रसाद मिळविणारा सुद्धा आहे.

आपण या दिवशी वेगवेगळ्या रंगबिरंगी कपडे परंतु त्यामध्ये गुलाबी रंगाच्या छटा असते अशा पद्धतीचे कपडे सुद्धा घालू शकता.

शनिवारचा दिवस हा शनिदेवाचा दिवस मानला जातो. ज्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये बाधा, समस्या आहेत अशा व्यक्तींनी जर शनिदेव यांना प्रसन्न करण्यासाठी शनि उपासना केल्यास अशा व्यक्तींवर शनिदेव कृपा वर्षाव करतात.

आणि त्यांना साडेसाती पासून मुक्त करतात म्हणूनच शनिवारच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे अवश्‍य परिधान करा. जर काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे शक्य झाले नाही.

तर या दिवशी तुम्ही निळ्या रंगाचे कपडे सुद्धा परिधान करू शकतात. सोबतच्या दिवशी तुम्ही निळा किंवा जांभळा रंगाचे कपडे सुद्धा परिधान करू शकता.
शेवटचा वार म्हणजे रविवार होय.

रविवार हा सूर्य देवाचा वार म्हणून ओळखला जातो या दिवशी तुम्ही सोनेरी रंगाचे कपडे परिधान करू शकता त्याच बरोबर पिवळे किंवा गुलाबी रंगाचे कपडे सुद्धा तुम्ही परिधान करू शकता.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!