नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, हिवाळ्यात बाजरीची भाकरी खाण्याचे 21 फायदे व 3 भयंकर तोटे..
बाजरीच्या नियमित सेवनाने आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रात बाजरीचे पीक तसेच त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. कारण बाजरी ही आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते.
त्यामुळे आजही ग्रामीण भागात बाजरीच्या भाकरी बनविल्या आणि मोठ्या प्रमाणात खाल्या जातात. कारण बाजरीमध्ये मोठ्या प्रमाणात फॉस्फरस, प्रथिने, फायबर तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम सारखे अनेक पोषक घटक असल्याने खासकरून या बाजरीच्या भाकरी थंडीच्या दिवसात आपल्याला खाल्या पाहिजेत.
तसेच बाजरीची भाकर खाण्याचे बरेच फायदे आहेत, बाजरीमध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता असल्यामुळे बाजरी हिवाळ्यात आपले शरीर उबदार ठेवण्यास मदत करते. त्यामुळे आपल्याला थंडीच्या दिवसात जास्त प्रमाणात बाजरीचे सेवन केले पाहिजे.
याशिवाय बाजरी आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी किंवा नियंत्रित करण्यासाठी मदत करत असते. त्यामुळे व्यक्तीला हृदयविकाराचा किंवा हृदयाशी संबंधित आजार होण्याचा, धोका कमी होतो.
तसेच बाजरीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम जास्त प्रमाणात असल्यामुळे, रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी मदत होते. तसेच आपल्याला बद्धकोष्ठता त्रास असल्यास, आपण नियमित बाजरीच्या भाकरी खाल्याने हा त्रास कमी होऊ शकतो.
कारण बाजरीमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असल्यामुळे, बाजरीचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता होत नाही.
तसेच सध्याच्या जीवनात स्नॅक्स व फास्ट फूड पदार्थ जास्त खाण्यात आल्यामुळे परिणामी लठ्ठपणा वाढत आहे. जर अशावेळी तर बाजरीची भाकर खाल्यास तुम्हाला लठ्ठपणा कमी करण्यासाठी मदत होईल. तसेच बाजरी ही पचन क्रियेस अगदी हलकी असते,
ज्याने पचनक्रिया व्यवस्थित होते. पचनक्रिया व्यवस्थित झाल्यास ऍसिडिटी जळजळ असे प्रकार होत नाहीत. बाजरी वजन नियंत्रित करण्यास मदत करते.
तसेच हिवाळ्याच्या दिवसात बाजरीचे सेवन केल्यास आपले शरीर उबदार राहाण्यास मदत मिळते. त्यामुळे थंडीच्या हंगामात बाजरीचे सेवन केले पाहिजे. तसेच बाजरीत चपातीपेक्षा कमी कॅलरी असल्यानं वजन वाढत नाही.
तसंच बाजरीत उष्णतेचं प्रमाण जास्त असल्यानं शरीरात ऊर्जा निर्माण होते. कोलेस्टेरॉलची पातळी कमी राहते. तसेच बाजरीच्या भाकरी या पचनास हलक्या असतात, कारण या बाजरीत तंतुमय घटक अधिक प्रमाणात असतात, ज्यामुळं पचन क्रियेस मदत होते.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments