नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, दत्त जयंती सप्ताहात !! श्री गुरुचरित्र । गुरुचरित्र पारायण कसे करावे? संपूर्ण नियम, अटी
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. दत्त जयंती या दिवशी दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते.
या दिवशी दत्ताची मनोभावे नामजपादी उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास साहाय्य होते.
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या.
त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस `दत्तजयंती’ म्हणून साजरा करतात.
मार्गशीर्ष पौर्णिमा 26 डिसेंबर रोजी श्रीदत्त जयंती साजरी होत आहे. धर्म ग्रंथानुसार या दिवशी भगवान दत्तात्रयचा जन्म झाला होता. श्रीदत्तात्रयांचे स्वरूप त्रिगुणात्मक त्रिमूर्ती असलेले ब्रह्मा-विष्णू-महेश अशा स्वरूपाचे आहे.
सत्त्व, रज आणि तम हे त्रिगुण, तसेच या गुणांचे प्रतीक म्हणजे त्रिमूर्ती दत्त होत. निर्मिती-पालन-संहार हे त्यांचे कार्य होय. देव आणि मुनिवर त्यांचे ध्यान करतात. दत्ताची उपासना तीन प्रकारे करता येते. गायत्री मंत्र वा गुरुमंत्राचे स्मरण, श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण सेवेतून ही उपासना होते.
सर्वात पहिले श्रीदत्ताची मूर्ती किंवा प्रतिमा लाल कपड्यावर स्थापित करा. त्यानंतर श्रीदत्ताचे आवाहन करा. त्यानंतर एक तांब्याभर पाणी जवळ ठेवा. उजव्या हातामध्ये एक फुल आणि थोड्या अक्षदा घेऊन खालील मंत्राचा उच्चार करा…
ऊँ अस्य श्री दत्तात्रेय स्तोत्र मंत्रस्य भगवान नारद ऋषि: अनुष्टुप छन्द:, श्री दत्त परमात्मा देवता:, श्री दत्त प्रीत्यर्थे जपे विनोयोग:।
त्यानंतर फुल आणि अक्षता श्रीदत्ताच्या प्रतिमेवर अर्पण करा. त्यानंतर हात स्वच्छ करून खालील मंत्राचा उच्चार करा..
जटाधरं पाण्डुरंगं शूलहस्तं कृपानिधिम। सर्व रोग हरं देव, दत्तात्रेयमहं भज॥
दत्तजयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही. या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्रसप्ताह असे म्हणतात.
दत्तमंदिरामध्ये भजन, कीर्तनादी कार्यक्रम आयोजीत केले जातात. दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात. दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे.
महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते. दत्तश्रीगुरूंचे करुया ध्यान वंदू चरण प्रेमभावे. ब्रह्मा विष्णू महेश एकत्र आले..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments