नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, सनातनी धर्मात गाईला आईचा दर्जा दिला आहे कारण गरुड पुराणातील हिंदू शास्त्रनुसार गाईमध्ये हिंदु धर्माच्या सर्व देवी-देवतांचा वास असतो. आपण गाईला बऱ्याच गोष्टी खायला घालतो.
ज्या गोष्टींमुळे आपल्याला गोमाता आशीर्वाद देते. जे व्यक्ती मनोभावे गाईचे पूजन व सेवा करतात, त्यांच्या जीवनात नेहमी सुख व समृद्धी तसेच समाधान नांदते. गाईच्या मुखामध्ये चारही वेदांचे वास्तव्य असते.
गाईचे पूजन केल्यास त्रिदेव म्हणजे ब्रह्मदेव, श्रीहरी विष्णु व देवाचेदेव महादेव, यांचीही कृपा आपल्यावर होते.श्रीकृष्णांना गोपाल म्हटले जाते, कारण ते गाईचे पालन, पोषण, सेवा, व पूजन करीत असत.
गायीला पोळी खाऊ घालण्याची आपली फार पूर्वीपासूनची परंपरा आहे. गाईचे पूजन केल्यास देवी लक्ष्मीचे पूजन केल्याचे पुण्यफळाचे आपल्याला प्राप्ती होते. आपण गाईला पोळी खायला देतो, म्हणजे साक्षात भगवंत यांना आपण नैवेद्य दिल्यासारखे होते.
पण काही गोष्टी अशा आहेत की, त्या गाईला खायला दिल्याने आपल्याला जीवनभर गरिबी आणि दारिद्र्यचा सामना करावा लागतो. गायीची सेवा केल्याने घरात सुख-समृद्ध येते.
माता लक्ष्मीचा घरात वास राहतो. ज्या घरात गाईची पुजा होत नाही त्या घरात अचानक कोणतेही संकट येत राहतात. यामुळे शहरातील सर्व लोक जिथे गोशाला असते तिथे रोज काही न काही खायला ठेऊन येतात.
पण काही वेळेस गाईला खायला घालण्यात या 3 वस्तू जर आल्या तर आपल्या घरातील सुख-समृद्धी निघून जाते.त्यामुळे या 3 गोष्टी गाईला चुकूनही खायला घालू नका. तुम्ही सकाळची पहिली चपाती किंवा भाकरी गाईला चारल्याने सर्व देवतांचा आशीर्वाद मिळतो.
गाईची तुलना देवी देवतांबरोबर केली जाते तिला गुरु समजले जाते. गाईला गुरू ग्रहाची देवता म्हणतात म्हणून गुरुवारी जर चपातीतून एक चमचा हळद घालुन खायला दिल्यास घरात सुख-समृद्धी येते, घरातील धन वाढण्यास मदत होते.
ज्या लोकांना मानसिक त्रास, ताण-तणाव असतो त्यांनी गाईला चपातीतून गूळ घातल्याने एक ऊर्जा निर्माण होते. गाईला पहिली भाकरी किंवा चपाती घातल्याने तुमची ग्रहस्थिती शुभ राहते. गाईला चपाती नेहमी ताजी घालावी.
कारण शिळे अन्न गाईला दिल्याने तिचा अपमान समजला जातो. तसेच शिळे अन्न चारल्याने घरात सं-कट येऊ शकते. जर तुम्ही गाईला रोज पिंपळाचे पान खायला देत असाल, तर ते पान स्वतः तोडू नका.
आपण घरात भाजीपाला आणतो त्यातील शिळी भाजी किंवा खराब किंवा निवडून उरलेली भाजी गाईला घालू नका. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गाईला दूध घालू नका कारण त्याने तुमच्यावर आर्थिक संकट येऊ शकते.
वरील 3 घटक गाईला घालू नका. त्याने दारिद्र्य येऊ शकते. घरातील धनाचे मार्ग बंद होतात. हिंदू धर्म शास्त्रात गोमातेला ईश्वर मानले आहे, आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी गोमाता दूर करते, आपल्याला सं-कटातून वाचवते म्हणून गाईला वरील 3 पदार्थ चुकूनही खायला देऊ नका.
ज्यामुळे गोमाता रुष्ट होईल व आपल्या जीवनात दुर्भाग्य येईल.तसेच गोमाताला म्हणजे गाईला ताजी व गरम पोळीच खायला द्यावी. गाईला पोळी खाऊ घालतांना दुसरी चूक आपण हि करतो की आपण गायीला कोरडी पोळी खायला देतो.
म्हणजेच आपण नुसती पोळीच गायीला खायला देतो. परंतु गाईला पोळी आपण नुसती खायला न देता, त्या पोळीला थोडेसे तूप लावून, किंवा चणाडाळ, गूळ, किंवा साखर आपल्याकडे त्यापैकी घरात जे काही उपलब्ध असेल ते पोळी मध्ये ठेवून गायीला खायला द्यावी.
याचबरोबर, गाईला गूळ खाऊ घालणे देखील खूप शुभ मानले जाते. यामुळे गोपूजनाचे विशेष लाभ आपल्याला मिळतात. आणि आपल्या अडचणी व संकटांपासून आपली सुटका होते.
गाईला पोळी व गुळ खाऊ घालण्या बरोबरच पालक खाऊ घालणे ही खूप शुभ असते. गाईला पालकाची भाजी खाऊ घातल्याने आपल्या कुंडलीतील नकारात्मक दोष नष्ट होतात.
गाईला पोळी खाऊ घातल्यानंतर गाईच्या पायाखालची माती आपल्या कपाळावर लावावी.असे मानले जाते की गाईच्या पायाखालची माती कपाळावर लावल्यास तीर्थामध्ये स्नान केल्याच्या पुण्यफळाची आपल्याला प्राप्ती होते.
या सर्व नियमांचे पालन करून जर आपण गाईला पोळी खाऊ घातली तर आपण नेहमी सुखी समाधानी राहू शकतो. आपल्यावर गोमातेंचा आशीर्वाद कायम राहतो. तेहेतिस कोटी देवी-देवतांची कृपा आपल्यावर होऊन आपण सुखी, समाधानी, व संपन्न राहतो.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments