नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, निरोगी आरोग्यासाठी 40 टिप्स आयुष्यात गोळ्यांना मुक्ती द्या..
आहारामध्ये फळांचा समावेश करणे अतिशय आवश्यक आहे. निरोगी आरोग्यासाठी नियमित एक किंवा दोन फळांचं सेवन करावं. आपल्या आरोग्याशी संबंधित कित्येक समस्यांवर नैसर्गिक औषधोपचार म्हणून फळे खाणे फायदेशीर ठरते.
तसंच वेगवेगळ्या आजारांपासून आपला बचाव देखील होतो. यापैकी एक आरोग्यवर्धक फळ म्हणजे कीवी प्रामुख्याने सांगितले जाते. या फळामध्ये आरोग्यास पोषकतत्त्वांचा प्रचंड प्रमाणात साठा आहे.
या किवीच्या फळामुळे आपल्याला आरोग्याबरोबरच त्वचेलाही फायदा होत असतो .याचबरोबर हे फळांचा नियमितपणे आहारात समावेश केल्यास, तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक वाढते.
तसेच हे फळ चवीला खूपच चविष्ट असून ,हे तुमच्या सौंदर्यात वाढविण्याचे काम करते. हे खाल्ल्याने चेहऱ्यावर एक वेगळेच तेज येते. यातील विटामिन E मुळे आपल्या त्वचेला मुलायम करण्यास मदत होते.याशिवाय किवीमध्ये फाइबर प्रमाण जास्त प्रमाणात असते.
या फळांचे दिवसातून 1 ते 2 सेवन केल्यास मुलायम आणि तजेलदार त्वचा होण्यास मदत होते. किवितील एंटीबैक्टीरियल हा घटक आपल्या चेहऱ्याला मुरुमे तसेच काळे डाग यासह अनेक गोष्टींपासून दूर ठेवते.याशिवाय हे फळ हृदयासाठीही अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
जर आपल्याला हृदयविकाराचा किंवा कमी रक्तदाबचा त्रास असल्यास ,किवी हे आरोग्यदायी फळचे नियमितपणे सेवक केल्यास लो ब्लड प्रेशरला नियंत्रित करते.तसेच यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका टाळता येतो.
यातील फायबर आणि विटामिन, जे आपल्या शरीरातील सर्व धमन्यांना मजबूत करण्यास मदत करते आणि त्यामुळे योग्य रक्तप्रवाहची क्षमता वाढते. तेच रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते.
य फळामुळे आपल्या डोळ्यांचे विकार असल्यास तेही बरे होतातआणि आपले डोळेच आरोग्य वाढवते. याशिवाय अस्थमासारख्या मोठ्या आजारांमध्येही हे खूप गुणकारी मानले जाते. हे किवीचे फळ साधारणपणे हिरव्या रंगाचे असते.त्यामुळे आपल्या डोळ्यांना गारवा मिळतो.
तसेच या किवीच्या फळामुळे आपली भूक वाढते ,आणि त्यामुळे तुमच्या पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. यांत फळात मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने, तुमचे अन्नपचन व्यवस्थित होते. याशिवाय तुम्हाला झोपेची समस्या असल्यास ,यातील नैसर्गिक एन्झैम मुळे ती समस्या दूर होते.
यातील क जीवनसत्त्वचे प्रमाण मुबलक असते. जे लिंबू आणि संत्र्याच्या तुलनेत दुप्पट असते,असे सांगितले जाते.या जीवनसत्त्वमुळे गर्भवती महिलांनाचे आरोग्य आणि गर्भाला स्वस्थ ठेवण्यास मदत करते.यासह कोलेस्टेरॉल नियंत्रण ठेवण्यासाठी हे खूप मोठे प्रभावी फळ मानले जाते.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments