नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, जेव्हा पैसाची खूप गरज असेल, तेव्हा बोला चमत्कारिक मंत्र..
हिंदू संस्कृती आणि परंपरेत दीप प्रज्वलन हा खूप मोठा आणि महत्त्वाचा संस्कार आहे. त्यामुळे दिवाळीत दिव्यांचा उत्सव साजरा केला जातो.तसेच देवाचे पूजन करताना दररोज सकाळी
आणि सायंकाळी देवासमोर दिवा लावला जातो. नवरात्रात किंवा विशेष अनुष्ठानवेळी चोवीस तास दिवा ठेवण्याचा संकल्प केला जातो. कारण दिवा हे तेजाचे प्रतिक मानले जाते.
त्यामुळे हिंदु धर्मातील शास्त्रानुसार, दिवा लावल्याने पावित्र्य, चैतन्य आणि सकारात्मकता घरात येते. तसेच त्यामुळे अंधाराचा विनाश होतो. त्यामुळे दिवा लावणे हे आशेचे लक्षण मानले जाते.
दिवा हा अप्रत्यक्षरित्या आश्वस्त करत असतो. पण आपल्या घरातील देवघरात दिवा लावताना त्या दिव्याखाली ही एक वस्तू ठेवल्यास, आपल्याला आयुष्यभर पैसाची चणचण भासणार नाही.
तसेच हिंदु धर्म शास्त्रानुसार, देवा हा कधीच जमिनीवर लावू नये, त्यामुळे आपण जर दिवाखाली ही एक वस्तु ठेवल्यास, आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील.याशिवाय दैवीशक्ती तसेच सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात राहील.
प्रत्येकाच्या घरात सकाळ-संध्याकाळ दिवा लागत असतो, त्यामध्ये कोणाच्या घरात तेलाचा तर कोणाच्या घरात तुपाचा दिवा लावला जातो.
पौराणिक ग्रंथामध्ये असा उल्लेख आढळतो की, अग्नी शिवाय देवता प्रसन्न होत नाही,कारण देवांना अग्निसाक्ष प्रिय असते. म्हणून आपण प्रत्येक पूजा पाठांमध्ये होम-हवन करण्याची प्रथा आहे.याच पद्धतीने आपण देवघरात दिवा लावते वेळी त्या दिव्याचा खाली अक्षता म्हणजे तांदूळ टाकावे.
आपण दररोज देवघरात दिवा लावताना, त्याच्या खाली तांदळाचे एक दोन दाणे टाकावे.
सकाळी संध्याकाळी दिवा लावताना 12 जाणे आणि त्यावर तो दिवा लावा.याशिवाय जेव्हा संध्याकाळी दुसरा दिवा लावते वेळी,ते सकाळी टाकलेले दाणे गोळा करून, एका डब्यांत जमा करावे आणि हे तांदुळाचे दाणे पक्षांना खाऊ घालावे.
पण दिवा लावताना या नियमाचे पालन आवश्यक केले पाहिजे.त्यामुळे कधीही देवघरात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी दिवा लावण्याचा आधी तिथे दोन-तीन तांदळाचे दाणे तिथे टाकायचे आणि त्यावर तो दिवा ठेवायचा आहे.
कारण शास्त्रानुसार दिव्याचा प्रकाश परब्रह्म व नारायण स्वरुप मानला गेला आहे. सायंकाळी प्रज्वलित केलेला दिवा केवळ अंधःकार आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करून आणि आपल्या घरात आणि मनात चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जेचा निर्माण करतो.
दीप प्रज्ज्वलन हे धर्म आणि विजयाचे सूचक मानले आहे.कोणत्याही शुभ कार्याची, कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने केली जाते. सत्कर्माचा साक्षीदार दिवा होत असतो.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments