10 जुलै, मोठी आषाढी एकादशी, मनातील इच्छा बोलून इथे ठेवा 1 वस्तू…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे आषाढी एकादशी. या दिवशी मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणार एकादशीला आषाढी एकादशी असे म्हणतात.

आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी देखील म्हटले जाते. यावर्षी 10 जुलै 2022 रोजी आषाढी एकादशी येत आहे. राज्यात आध्यात्मिक दृष्टिकोणातून या दिवसाला खूप महत्त्व आहे.

गेल्या आठशे वर्षांपासून लाखो वारकरी आषाढी एकादशीच्या दिवशी संत महंतांच्या वारी घेऊन पंढरपूरात विठुरायाच्या भेटीसाठी मैलोन् मैल पायी चालत येतात.

यात आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलीची, देहू येथून संत तुकारामांची , त्रंबकेश्वरवरून निवृत्तीनाथांची आणि पैठणहून संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरमध्ये दाखल होते. विठ्ठलाच्या भक्तीत दंग होऊन संत ज्ञानेश्वर आणि तुकोबांच्या अभंगाच्या तालावर पावले टाकत लाखो वारकरी खांद्यावर पालखी घेऊन चालत असतात.

या दिवशी चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेण्याला खूप महत्त्व असते. जे वारीला जाऊ शकत नाहीत ते या दिवशी उपवास करुन घरीच मनोभावे विठ्ठलाची पूजा करतात.

आषाढीच्या एकादशीचे आणखी एक विशेष महत्त्व म्हणजे या वारीला जाण्यापूर्वी शेतकरी आपल्या शेतात पेरणी करतात आणि ते वारी करून घरी परत जाईपर्यंत शेतातील माल वाढू लागलेला असतो.

धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचं एक वर्ष हे देवांची एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असते आणि उत्तरायण हा दिवस असतो. आषाढ महिन्यातील कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनाला सुरुवात होते.

या काळात देवांची रात्र असते त्यामुळे सर्व देव झोपी जातात. यामुळेच आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. अशी मान्यता आहे की या काळात असुर प्रबळ होतात आणि त्यांच्या शक्‍तींपासून सुरक्षित राहण्यासाठी व्रत करणे आवश्यक असते.

त्यामुळे या दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजा करण्याला अतिशय महत्त्व आहे. श्री स्वामी समर्थ, आषाढी एकादशी आली आहे. देवशयनी आषाढी एकादशी म्हणजेच तिला महाएकादशी सुद्धा म्हणतात.

या एकादशीच्या दिवशी रात्री कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी इथं एक वस्तू ठेवा. तुमच्या सर्व इच्छा काही दिवसातच पूर्ण होतील. श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय केल्यास तर त्याचे फळ नक्की मिळेल आणि आपल्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतील.

प्रत्येकाच्या घरात असतील असेल, नसेल तर तुम्ही ती कोणत्याही वस्तू म्हणजेच तुम्हाला एक छोटीशी खोबर्‍याची वाटी लागणार आहे. जी आपण मसाल्यात वापरत असतो. ती म्हणजे सुक्या खोबर्‍याची वाटी किराणा शॉप मध्ये तुम्हाला मिळते.

ती खोबऱ्याची वाटी छोटीशी आली तरी चालेल खोबरं तुटलेल्या किंवा कापलेला नको ती पूर्ण वाट हवी. आपल्याला वाटी आल्यानंतर ती वाटी घेऊन देवघरात बसायचा आहे.
हा उपाय तुम्ही आषाढी एकादशी सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी केव्हाही करू शकतात.

जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करू शकतात. फक्त उपाय करण्याआधी देवघरात दिवा अगरबत्ती लावाव्यात. त्यानंतर ही वाटी घेऊन आपण देवघरात बसाव. आपल्या

हातात दोन्ही हातात घेऊन आधी देवाला प्रार्थना करुन आधी जी इच्छा आहे ती बोलावे लागणार आहे ते बोलावं. त्यानंतर ती वाटी देवघरात ठेवून द्यावी. मग त्यानंतर जे कुणी मंत्र असेल जी सेवा तुम्ही करत असाल ती करावी.

मग त्यानंतर मंत्र माहिती नसेल तर “ओम भगवते वासुदेवाय नमः”, हा मंत्र 11 वेळा बोलला तरी चालेल. मग त्यानंतर ती रात्रभर देवघरात असू द्यावी आणि दुसऱ्या दिवशी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी ती वाटी घ्यावी आणि तिचे तुकडे करावेत आणि प्रसाद म्हणून घरातल्या सगळ्या सदस्यांनी तो खावा.

उपवास असेल किंवा नसेल तरी खावे. या एका छोट्याशा उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. देवतांचा आशीर्वाद मिळेल, सकारात्मकता मिळेल. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होते…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!