लक्ष्मीची कृपा होण्यासाठी पॉकेटामध्ये 11 पैकी 1 वस्तू ठेवा…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,प्रत्येकाला वाटत आपलं पॉकेट भरलेलं असावं. म्हणजे पैसा हा प्रत्येकाच्या आयुष्यात आवश्यक असतो. पैसा पॉकेट मध्ये असेल तर आपल्या मनाला समाधान वाटत आणि बिना पैसे शिवाय आयुष्यात कोणताही सुख मिळत नाही.

पण बऱ्याच व्यक्तींना अस होत की, सकाळी पॉकेट भरलेलं असत आणि संध्याकाळ पर्यंत ते रिकामी होत. अस का होत? आपल्याकडे तो पैसा का ठिकत नाही? तर आज आपण पाहणार आहोत की पॉकेट कायम भरून राहण्यासाठी काही टोटके असतात.

कारण आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवता मग पर्स असेल, पॉकेट असेल, काहीजण बटवा वापरतात तो बटवा असेल किंवा आपली तिजोरी असेल, कपाट असेल जे लोक व्यवसाय करतात, उद्योग धंदा करतात त्यांचा कॅश बॉक्स असेल.

म्हणजे गल्ला असेल या धन ठेवण्याच्या जागी लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या या 11 वस्तू पैकी कोणतीही 1 वस्तू आपण नक्की ठेवा.

आपल्या पॉकेटमध्ये पैसा भरून राहण्यासाठी पहिली गोष्ट आहे एक 21 तांदूळ, तर आपण हे 21 तांदूळ पुडी बांधून आपल्या पॉकेटमध्ये व्यवस्थित ठेवायचे आहे. कारण अन्न जसे कणाकणाने वाढते.

तसेच आपले पैसे देखील कणाकणाने वाढतात. ज्यांच्या पॉकेट मध्ये लक्ष्मी असते जर त्यांच्या पॉकेटमध्ये आपण तांदूळ ठेवले तर आपले पैसे वाढण्यास व पैसे टिकून राहण्यास मदत होते.

दुसरी वस्तू म्हणजे पिंपळाचे पान होय, जर आपण पिपळाचे पान आपल्या पॉकेटमध्ये ठेवले तर आपले पैसे नेहमी ठिकून राहतील आणि वाढत राहतील.

तिसरी गोष्ट आहे कवडी,जर आपण कवडी आपल्या पॉकेट मध्ये ठेवली तर आपले पैसे वाढण्यास निश्चित मदत होईल. मित्रांनो त्यानंतर येतो चांदीचा सिक्का,चांदी किव्हा सोन्याचा सिक्का आपल्या पॉकेट मध्ये ठेवायचा आहे.

त्यावर विधी करून ठेवलेला असावा आणि तो ठेवताना काळजी घ्यावी की तो चकूनही पडू नये. पडले तर आपल्यावर दुर्भाग्य येऊ शकते.

त्यानंतर रूद्राक्षपण ठेवू शकता. कारण रुद्राक्ष पॉकेटमध्ये ठेवण अत्यंत सोईचे असते. छोट्या साईझमध्ये जर रुद्राक्ष पॉकेट मध्ये ठेवला, तर तुमच्यावर लक्ष्मी देवतेची कृपा होते.

आणि तुमच्या पॉकेट मध्ये पैसा नेहमी टिकून राहतो. अजून एक गोष्ट अशी की आपले आई वडील आपल्याला पैसे देतात, खर्चण्यासाठी किव्हा इतर कामांसाठी, सहज म्हणून दिलेला.

तो जर पैसा तुम्ही तुमच्या पॉकेट मध्ये व्यवस्थित सांभाळून ठेवला. तर तुमचा पैसा कायम ठिकण्यास मदत होते. तो पैसा खर्चायचा नाही.जो बक्षीस म्हणून दिलेला पैसा असतो तो कधीही खर्चायचा नसतो.

तो पॉकेट मध्ये तसाच ठेवायचा. तो पैसा इतर पैसे ला टिकविण्यास व वाढवण्यास मदत करतो. त्यानंतर जे आपण पैसे पॉकेट मध्ये ठेवतो ते सरळ ठेवावे घडी मारून ठेवू नये.

किंवा त्यांचे कोपरे दुमडलेले नसावेत, यामुळे लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होते आणि रुष्ट झाल्यामुळे आपल्या पॉकेट मध्ये पैसा शिलक राहत नाही. त्यानंतर तुम्ही जर महालक्ष्मीचा फोटो जरी पॉकेट मध्ये ठेवला तर तुम्हाला त्याचा फायदा होईल.

याचबरोबर, सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे, भगवान श्रीकृष्णांच्या मुकुटामध्ये मोरपंखा होय. कारण मित्रांनो ही छोटासा मोरपंख आपण आपल्या धन ठेवण्याच्या ठिकाणी काही नक्की ठेवा.

त्यामुळे केवळ धनाची प्राप्ती होते पैशाचे प्राप्ती होते असे नव्हे तर विद्या आणि ज्ञानसुद्धा त्यासोबत चालून येत. योग्य प्रकारचे निर्णय घेतले जातात विद्यार्थ्यांसाठी तर हा मोरपंख एक वरदानापेक्षा कमी नाही.

याशिवाय, लवंगची एक जोडी म्हणजेच 2 साबूत लवंगा. न तुटलेल्या न फुटलेल्या आणि ज्यांना समोर फुल आहे अशा 2 साबुत लवंगा आपण आपल्या धन ठेवण्याच्या जागी ठेवा.

यामुळे नकारात्मक शक्ती तर दूर राहतेच मात्र जो पैसा वायफळ खर्च होतो, घरात जो पैसा टिकून राहत नाही त्या पैशाला टिकवून ठेवण्याचं आणि पैशांमध्ये वाढ करण्याच काम या लवंगा करत असतात.

तंत्र मंत्र शास्त्रात या लवंगाच फार मोठा महात्म सांगितलेला आहे. लवंगाचे टोटके आणि उपाय हे तंत्र मंत्र शास्त्रात अगदी सर्रास केले जातात.

पुढील वस्तू म्हणजे, लाल रंगाचा कागद. मित्रांनो एक छोटासा लाल रंगाचा कागद आपल्या पर्स, पाकीट, वॉलेटमध्ये नक्की ठेवून पहा ज्या दिवशी ठेवाल शक्यतो मंगळवारी किंवा शुक्रवारी आपण या वस्तू आपल्या पर्स पॉकेटात ठेवायच आहे.

किंवा कोणत्याही पौर्णिमेला अथवा अमावास्येला सुद्धा आपण या वस्तू ठेवू शकता. इतर दिवशी ठेवला तरी चालेल. मात्र मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा आणि अमावस्या हे काही विशेष दिवस असतात.

विशेष तिथी असतात तर कोणताही लाल रंगाचा कागद आपण आपल्या पर्स, पॉकेटमध्ये ठेवू शकता. लाल रंग माता लक्ष्मीस अत्यंत प्रिय आहे आणि लाल रंग हा आपल्या धनामध्ये पैशांमध्ये बरकत निर्माण करतो. पैशाला स्वतःकडे आकर्षित करतो. हा लक्ष्मीला आकर्षित करणार रंग आहे.

पुढची वस्तू आहे कोणत्याही स्वरूपाचे यंत्र मग त्यामध्ये कुबेर यंत्र असेल, श्रीयंत्र असेल, लक्ष्मी कुबेर यंत्र असेल कोणत्याही प्रकारचे यंत्र त्याची व्यवस्थित पूजा करून ते सिद्ध करून आपण आपल्या पर्स, पॉकेटमध्ये ठेवून द्या. त्यामुळे सुद्धा पैसा वाढू लागतो. अनेकांना याचा शुभ परिणाम जाणवलेला आहे.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!