केळीच्या झाडावर असे पाणी अर्पण करा, 2 मिनिटात पहा चमत्कार, होईल भगवान नारायण विष्णूची कृपा….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये निसर्गाला देवता मानून निसर्गातील प्रत्येक घटकाची पूजा केली जाते. प्राचीन काळापासून नदी, पर्वत, जमीन, झाडे, यांना देवता मानले आहे व त्यांचे पूजन केले जाते.

हिंदू धर्मामध्ये अनेक झाडे व रोपांची पूजा केली जाते व त्यांना देवतास्वरूप मानले जाते. पिंपळ, तुळस, केळी या झाडांची पूजा करण्याचे आपल्या हिंदुधर्मात सांगितलेले आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये केळीच्या झाडाची पूजा करण्याचीदेखील महत्त्व सांगितलेले आहे.

त्यामुळे केळीच्या झाडाला प्राचीन काळापासून पूज्य आणि पवित्र मानले गेले आहे. सनातन धर्मामध्ये केळीचे झाड पूजनीय मानण्यात आले आहे. केळीचे फळं, पानं पूजेमध्ये उपयोगात आणले जातात.

हे शुभ आणि पवित्रतेचे प्रतिक आहे. केळीच्या झाडामध्ये देवगुरु बृहस्पतीचा वास मनाला गेला आहे. शास्त्रानुसार सात गुरुवार नियमितपणे केळीची पूजा केल्यास साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

मुलींना उत्तम वर प्राप्त होतो. केळीची पूजा केल्यामुळे ग्रह आणि ग्रहांचे ग्रह दोष दूर होतात असे मानले जाते. आपल्या आयुष्यामध्ये काही समस्या व कष्ट असतील तर आपण आम्ही सांगितलेले उपाय अवश्य करून पाहा.

ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे , ज्यांच्या घरांमध्ये पैशाचा प्रश्न कायम आहे व पैसा टिकत नाही, कायमचा आर्थिक चणचण भासते अशा लोकांनी केळीच्या झाडाची पूजा करुन लक्ष्मी मातेला केळी अर्पण केली तर लक्ष्मी माता प्रसन्न होते व आपल्याला आर्थिक प्रश्नच शिल्लक राहात नाही.

हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये कधीही आर्थिक समस्या निर्माण होणार नाहीत व कायम घरामध्ये पैशाचा ओघ चालू राहील. जर आपल्या कुंडलीमध्ये गुरु ग्रहाचा दोष निर्माण झाला आहे किंवा गुरु ग्रह अति तेज आहे तर शुक्रवारच्या दिवशी केळीच्या झाडापाशी कच्चे दूध आणि पाणी अर्पण करावे.

यामुळे गुरुग्रहासंबंधी सर्व दोष दूर होतात. जर आपल्याला काही दुःख व कष्ट असतील व काही त्रासातून मार्ग मिळत नसेल तर रोज केळीच्या झाडाची सेवा करावी. यामुळे आपले कष्ट व समस्या दुर होतात.

याशिवाय, आपण आपल्या दारात दररोज तुळशीची पुजा करून आणि तिला नियमित पाणी सुद्धा घालतो, यामुळे आपल्याला अनेक धार्मिक फायदे होतात इ केळीच्या झाडाची सुद्धा नियमित पूजा केली जाते आणि तुळशी प्रमाणेच त्याचे फायदे पण आहेत.

अनेक प्रयत्न करुनही जर आपल्या विवाहाला विलंब होत असेल किंवा अनेक प्रयत्न करून देखील विवाह जमत नसेल तर आपण रोज केळीच्या झाडाची पूजा करावी व सेवा करावी.

यामुळे आपल्या विवाहाचा विलंब थांबेल व आपल्याला लवकरच आपल्या मनासारखा जीवनसाथी मिळेल. शिक्षणासंबंधी काही अडचणी निर्माण होत असतील तर दररोज केळीच्या झाडाची पूजा करावी व केळीला रोज जल अर्पण करावे.

यामुळे आपल्याला शैक्षणिक लाभ मिळतात. पती-पत्नीतील संबंध सुधारण्याकरता उपाय- जर पती-पत्नीमध्ये कायम मतभेद व भांडणं होत असतील तर पती-पत्नीने मिळून केळीच्या झाडाची सेवा करावी.

तसेच केळीच्या झाडासमोर तुपाचा दिवा लावावा, त्यामुळे पती-पत्नीतील संबंध सुधारतात व प्रेम वाढते. जर आपली मुले आपल्याला दुःख देत असतील किंवा काही प्रकारे त्रास देत असतील.

तर गुरुवारी केळीच्या झाडाखाली बसून गुरु ग्रहाच्या मंत्राचे उच्चारण करावे. यामुळे सर्व समस्या दूर होतात व मुले आपल्या मनासारखी वागतात.तसेच याशिवाय, घरातील मुले नेहमी आनंदी आणि सर्व संकटापासून दूर राहतात.

अशी आख्यायिका आहे की केळीच्या झाडाची पूजा केल्याने समृद्धी येते. घरात केळीचे झाड लावल्याने बृहस्पती ग्रहाचे शुभ परिणाम मिळतात. हे घरात असल्याने वैवाहिक जीवनातील सर्व अडथळे दूर होतात.

विवाहायोग्य मुलं-मुलींचे लग्न लवकर होतात. उच्च शिक्षण आणि ज्ञान प्राप्तीसाठी हे झाड उपयुक्त असल्याचे सिद्ध होते, कारण त्यामधून नेहमीच शांत आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत.

केळीच्या झाडाची नियमित पूजा केल्याने आपल्यावर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद राहतो. भगवान नारायण विष्णू आणि लक्ष्मी माता यांना नियमित केळीचा भोग लावल्यानंतर प्रसन्न होऊन आपल्या भक्तांवर कृपा ठेवतात.

दर गुरुवारी केळीच्या झाडाला थोडेशी पाणी व कच्चे दुध अर्पण केल्याने गुरु ग्रहामुळे झालेला ग्रहदोष दूर होतो. रोज न चुकता केळीच्या झाडाला पाणी घातल्याने आपल्या परिवारातील लहान मुलाचे स्वास्थ्य चाणले राहते आणि घरात संकटांना येण्यासाठी जागा राहत नाही.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!