नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,ओम नमः शिवाय, हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्याच्या अमावस्याला हलाहरी अमावस्या म्हणतात. शेतकर्यांसाठी याला खूप महत्त्व आहे. या दिवशी शेती केली जात नाही. नांगर आणि बैलाची पूजा केली जाते.
यावर्षी आषाढ महिन्यातील अमावस्या 28 आणि 29 या दोन दिवशी असेल. अमावास्येच्या दिवशी पितरांसाठी श्राद्ध विधी आणि नैवेद्य करण्यासाठी हलाहरी अमावस्या खूप खास आहे.
या दिवशी झाडे लावणेही महत्त्वाचे आहे. हलाहरी अमावस्येला बेलचे झाड लावावे असे म्हणतात. या दिवशी यमुना आणि गंगा नदीतही स्नान करावे. वास्तविक, 28 जून ही श्राद्ध कर्माची अमावस्या आहे आणि 29 जून ही स्नान आणि दानाची अमावस्या आहे. या दिवशी शक्य असल्यास शनि धान्य दान करावे.
अमावस्या तिथी 28 जून रोजी पहाटे 5.53 पासून सुरू होईल आणि 29 जून रोजी सकाळी 8.23 पर्यंत चालेल. उडीया तिथी असल्याने 28 जून आणि 29 जून या दोन्ही दिवशी हलाहरी अमावस्या साजरी केली जात आहे.
मंगळवार अमावस्या तिथी असल्याने मंगल दोष निवारणासाठी या संयोगाने पूजा करता येते. हलहरी अमावस्येच्या दिवशी नांगराची पूजा केली जाते. कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करण्यापूर्वी देवाचे आभार मानणे हा हा उत्सव साजरा करण्याचा उद्देश आहे.
या दिवशी अशी काही कामे केली जाऊ शकतात, ज्यामुळे कौटुंबिक त्रासासोबत मानसिक आनंदही दूर होईल.तसेच याशिवाय, अमावस्येचा दिवस तांत्रिक प्रयोगांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
त्यामुळे एकादशी तिथी असू द्या, पौर्णिमा तिथी असेल किंवा अमावस्या तिथी असेल हे दिवस महत्त्वाचे असतात ज्योतिष उपाय करण्यासाठी. मित्रांनो आज आपण जो उपाय बघणार आहोत तो आपल्या घरात सुख-समृद्धी येण्यासाठी येण्यासाठी,पैसा येण्यासाठी असणार आहे.
मित्रांनो तुमच्या घरामध्ये जर पैशांची खूप तंगी असेल, घरात सतत वादविवाद होत असतील, भांडण होत असतील, घरातील वातावरण अशांत असेल तर यासाठी अमावस्येच्या दिवशी आपण हा उपाय करायचा आहे.
तसेच तुम्ही कोणतेही अमावस्येला हा उपाय सुरू करू शकता आणि एकदा हा उपाय केल्यानंतर पुढे येणारे अमावस्येला देखील हे उपाय पुनरावृत्ती करू शकता. तुम्ही एखाद्या आमावस्याला हा उपाय केला आणि त्याचा तुम्हाला फरक जाणवला नाही.
तर पुढे येणारे अमावस्येच्या दिवशी सुद्धा तुम्ही उपाय करू शकता.त्यानंतर जाणून घेऊया हा उपाय कसा करायचा. हा उपाय आपण अमावस्येच्या दिवशी कधीही परंतु सूर्यास्तापूर्वी करायचा आहे, म्हणजे अंधार पडण्यापूर्वी आपण हा उपाय करायचा आहे.
आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला मूठभर तांदूळ लागणार आहेत. कोणतेही तांदूळ चालतील. मग ते मूठभर तांदूळ घेतल्यानंतर तांदळाची आपण खीर बनवायचे आहे.
तांदळाची खीर बनवल्यानंतर ही खीर आपण वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि या खीरीमध्येच चपातीचे काही तुकडे टाकायचे आहेत. लक्षात घ्या, चपाती किंवा खीर आपण जेव्हा घरामध्ये बनवणार आहोत, तेव्हा अमावस्या प्रारंभ असावी.
अमावस्या तिथी प्रारंभ झाल्यानंतरच ही खिर बनवायचे आहे आणि हा उपाय करण्यापूर्वी कोणीही ही खीर किंवा चपाती उष्टी केली असून नये. ही तर अशा प्रकारे ताटामध्ये तांदळाची खीर आणि चपातीचे तुकडे घेतल्यानंतर, ही प्लेट आपण घराच्या छतावर ठेवायचे आहे किंवा अंगणामध्ये ठेवली तरीही चालेल.
मात्र ही प्लेट आपल्याला अशा ठिकाणी ठेवायची आहे की, जिथे कावळे येऊन ती खीर आणि चपाती खातील, त्यांना स्पर्श करतील अशा ठिकाणी आपण ही खीर ठेवून द्यायचे आहे आणि जेव्हा कावळा स्पर्श करेल किंवा ही खीर खाईल, त्यानंतरच आपण भोजन करायचा आहे.
मित्रांनो या उपायामुळे आपली पितर आपल्यावर प्रसन्न होतात. आपल्या कुंडल पितृ दोष असेल, ग्रह दोष असेल किंवा वास्तुदोष असेल. घरामध्ये क्लेश असेल, या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी, या सर्व दोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्या पितरांचे आशीर्वाद आपल्यावर असणं खूप महत्त्वाचा आहे.
आणि हा उपाय केल्याने पितरांचे आशीर्वाद आपल्याला नक्की प्राप्त होतात. त्यामुळे अमावस्या तिथीस हा छोटासा आणि सोपा उपाय नक्की करून पहा. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे इष्ट देवतेचे नाव नक्की लिहा..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments