नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,यंदा गुरुपुष्यामृत योग आणि आषाढ अमावस्या एकाच दिवशी आले आहेत आणि त्यामुळेच या दिवशी काही गोष्टी केल्या तर नक्कीच त्याचा लाभ तुम्हाला होईल. मग काय आहे या दिवसाचं महत्व आणि कुठल्या गोष्टी कराव्या, चला जाणून घेऊया.
आषाढ महिन्याच्या शेवटी येणाऱ्या अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या म्हटलं जातं. चातुर्मास पहिली अमावस्या म्हणून आषाढी अमावस्येकडे पाहिलं जात.
श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी अमावस्या येत असल्याने सर्व देवांची दिवे लावून पूजा केली जाते. भगवान शंकर, माता पार्वती, गणपती आणि कार्तिकेय यांची दीप अमावस्याच्या दिवशी पूजा केली जाते.
या दिवशी पूर्वजांचे स्मरण केले जाते आणि त्यांच्यासाठी एक दिवा सुद्धा लावला जातो. याशिवाय दीप अमावास्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचा ही विशेष महत्त्व आहे.
योगायोगाने दीप अमावस्या आणि गुरुपुष्यामृत योग एकाच दिवशी आले आहेत आणि त्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखीनच वाढल आहे. पंचांगानुसार यावर्षी अमावस्या तिथी आणि शनिवारी 27 जुलैपासून रात्री 9 वाजून 11 मिनिटांनी सुरू होईल.
आणि ती 28 जुलैला रात्री 11 वाजून 24 मिनिटांनी पर्यंत असेल. तर गुरुपुष्यामृत योग 28 जुलैला सकाळी 7 वाजून 4 मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजून 16 मिनिटांपर्यंत असेल.
याचबरोबर आपल्या घरात भरपूर धन यावर, भरपूर पैसा यावा यासाठी या दिवशी मात्र लक्ष्मीची पूजा केली जाते किंवा काही उपाय देखील केले जातात. परंतु त्याचबरोबर काही अशी कामे आहेत ,जी आपण या दिवशी चुकूनही करू नये.
तर आपण रिकामे या दिवशी केली तर माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते. मग त्यामुळे घरामध्ये हळूहळू आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात.
यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे, दीप अमावस्येच्या दिवशी कोणत्या गोष्टी मित्रांनो सर्वात पहिली गोष्ट म्हणजे या दिवशी चुकूनही माता लक्ष्मीच्या मूर्तीचे किंवा प्रतिमेचं विसर्जन करू नका.
कारण अमावस्या ही माता लक्ष्मी आगमनाचा दिवस आणि या दिवशी जर आपण माता लक्ष्मीच्या मूर्तीचे किंवा प्रतिमेचे विसर्जन केलं तर माता लक्ष्मीला आपल्या घरातून घालवून देण्यासारखा आहे.
कारण आपल्यापैकी अनेक लोक आपल्या यामध्ये जर खंडित मूर्ती असेल, तर ते पाण्यामध्ये विसर्जित करतात परंतु ही मूर्ती या दिवशी विसर्जित करू नका.
या दिवशी तुम्ही देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती स्थापित करू शकता, परंतु खंडित मूर्ती या दिवशी विसर्जित करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी चुकूनही कोणाला उधार पैसे देऊ नका किंवा कोणाकडून उद्या पैसे घेऊन नका.
कारण असे केल्याने आपल्या घरामध्ये बरकत राहत नाही आपल्या घरात जो पैसा येतो तो टिकून राहत नाही, पैसा पाण्यासारखा वाहून जातो. दुसऱ्या दिवशी एखाद्या व्यक्तीला खूप गरज असेल आणि त्यासाठी तुम्ही मदत म्हणून हे पैसे देऊ शकता, परंतु उदार म्हणून कोणालाही या दिवशी पैसे देऊ नका.
तसेच या दिवशी म्हणजेच कोणालाही माता लक्ष्मीची मूर्ती भेट म्हणून देऊ नका. यामुळे सुद्धा आपली आर्थिक स्थिती कमजोर होऊ शकते. पुढची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा दिवा लावतो, संध्याकाळच्या वेळी आपण जेव्हा देव पूजा करतो, त्यावेळी चुकूनही आपल्या जो मुख्य दरवाजा आहे तो बंद ठेवू नका.
कारण ही वेळ म्हणजे माता लक्ष्मीची येण्याची वेळ मानली जाते. यावेळी माता भ्रमण करत असते आणि ज्या घरामध्ये पूजापाठ चालू असेल वातावरण शांत असेल प्रसन्न असेल अशा घरांमध्ये माता लक्ष्मी आगमन करते.
आणि अशा वेळी जर आपण आपल्या घराचा मुख्य दरवाजा बंद ठेवला तर माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत नाही.
त्यामुळे संध्याकाळच्या वेळी म्हणजे आपण जेव्हा दिवा लावतो, त्यावेळी थोडा वेळ का होईना घराचा मुख्य माझ्या उघडा ठेवा, असं केल्याने माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये वास करते.
तर या होत्या काही गोष्टी या दिवशी चुकूनही करू नये. कारण आपण जर या काही गोष्टीची काळजी घेतल्यास, तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहील…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments