नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,असे म्हणतात की मुलगी झाली आणि लक्ष्मी आली मुलगीला आपण देवी लक्ष्मीचे स्वरूप म्हणतो मुलींमध्ये देवी लक्ष्मी देवी सरस्वती व देवी दुर्गा यांचे रूप पाहायला मिळते.
मुलगी प्रत्येक आई-वडिलाची खूप लाडकी असते तिला राज कन्यासारखी वाढवली जाते परंतु मनात नेहमी ही भावना असते की मुलगी हे परक्याचे धन आहे ती काही दिवस आपल्या घरी राहील.
व काही दिवसांनी ती परक्याच्या घरी जाईल म्हणून मुलगी वयात आली की, आईवडील आपल्या लाडक्या परीचा विवाह करून देतात व आपली जबाबदारी पूर्ण करतात मुलीचे लग्न थाटामाटात व्हावे हे प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते.
त्यामुळे, मुलगी वयात आली कि, आई वडिलांना तिच्या लग्नाची काळजी लागलेली असते. आपल्या मुलीचे लग्न अगदी थाटामाटात व आनंदात पार पडावे यासाठी आई वडील कित्येक वर्षांपासून तयारी करत असतात.
मुलीला देण्यासाठी हे घे, ते घे हे कित्येक महिने आधी पासूनच सुरु झालेलं असते. सासरी गेल्यावर मुलीला कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू नये म्हणून अगदी बारीक सारीक वस्तू देखील घेतल्या जातात.
परंतु मुलीच्या प्रेमापोटी आपण अशा काही वस्तू मुलीला देत नाही ना ज्यामुळे आपणच नाही तर आपली मुलगी सुद्धा अडचणीत येऊ शकते. हिंदू शास्त्रा नुसार काही अश्या वस्तू सांगितल्या आहेत, ज्या मुलींना सासरी जाताना कधीच देऊ नये. चला तर मग जाणून घेऊ कोणत्या आहेत त्या वस्तू.
मुलीला सासरी जाताना झाडू देऊ नये. झाडू म्हणजे लक्ष्मी, आणि आपण आपल्या घरची लक्ष्मी मुलीला देऊन टाकणे म्हणजे आपल्या घरातून लक्ष्मीला स्वतःहून बाहेर काढण्यासारखे आहे.
मुलीचे चांगले व्हावे, ती आर्थिक दृष्ट्या सक्षम असावी असे सर्वांनाच वाटते. परंतु आई वडिलांची लक्ष्मी हिरावून आपल्या घरी लक्षमी नांदावी असे कोणत्याही मुलीला वाटत नाही. म्हणून मुलगी सासरी जाताना झाडू कधीही देऊ नये.
याचबरोबर, सुई, चाकू, सुरी, कैची अश्या धारधार व टोकदार वस्तू देखील मुलीला देऊ नये. कारण या वस्तूंमुळे आपल्यामध्ये व मुलीच्या सासरच्या व्यक्तींमध्ये तेढ निर्माण होते. परस्परांतील संबंध बिघडतात.
सासर व माहेर अशा कात्रीत मुलगी सापडते. तिला नेमके काय करावे ते सुचत नाही. म्हणून या वस्तू मुलीला देऊ नयेत.याशिवाय, तवा आणि पोळपाट लाटणे या आपल्या रोजच्या वापराच्या वस्तू आहेत.
यावरच आपण रोज चपाती किंवा भाकरी बनवतो. यांना साक्षात अन्नपूर्णा देवीचे स्वरूप मानले जाते. म्हणून या वस्तू मुलीला दिल्यास आपल्या घरातून देवी अन्नपूर्णा निघून जाते.
यामुळे आपल्या घरात अन्नधान्याला बरकत मिळत नाही. चाळण देखील मुलीला सासरी जाताना देऊ नये. चाळणीचे काम काय असते तर चांगले एका बाजूला आणि वाईट एका बाजूला करणे.
जर आपण मुलीला चाळण दिली तर एकतर आपल्याकडे सर्व काही चांगले राहते आणि तिच्याकडे वाईट जाते. किंवा आपल्याकडे वाईट राहते व सर्व चांगले तिच्या सोबत जाते.
घरी बनवलेले लोणचे देखील मुलीला देऊ नये. काही घरांमध्ये प्रत्येक वर्षी लोणचे बनवून मुलीला सासरी दिले जाते. लोणचे हे आंबट व तिखट असते. यामुळे आपले संबंध देखील आंबट व तिखट होऊ शकतात.
याचबरोबर, हिंदू धर्मात बापांना विघ्नहर्ता म्हटले जाते म्हणजेच जेथे बाप्पा असतात, तेथे कोणतेही विघ्न येत नाही. गणपती बाप्पांना शोभतेचे प्रतीक मानले जाते, म्हणूनच मुलीच्या जीवनात कोणतीही विघ्न येऊ नये .
व तिच्या जीवनात सर्वकाही शुभ व मंगलमय घडावे यासाठी बाप्पांची मूर्ती किंवा फोटो मुलीच्या लग्नात आवर्जून दिले जाते. परंतु जर तुम्ही ही तुमच्या मुलीच्या लग्नात बाप्पाची मूर्ती किंवा फोटो भेट देण्याचा विचार करत असाल तर हा विचार लगेचच बदला.
कारण शास्त्रानुसार मुली या देवी लक्ष्मीचे स्वरूप मानल्या जातात आणि गणपती बाप्पा व देवी लक्ष्मी एकत्रित असणे म्हणजे धनाच्या आगमनाचा हा संकेत आहे, अशात जर आपण घरातून जाणाऱ्या लक्ष्मीला गणपती बाप्पाची मूर्ती.
किंवा फोटो भेट म्हणून दिले तर तिच्या मागे घरात खूप मोठी धन हानी होऊ शकते. ती जाताना घरातील सर्व सुख-समृद्धी घेऊन जाते म्हणून मुलीला कधीही गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो भेट म्हणून देऊ नये.
आपल्या मुलीचा विवाह यापूर्वी झालेला आहे व आपण तिला बाप्पांची मूर्ती किया फोटो भेट म्हणून दिलेला आहे आणि आपल्याला जर त्याचे परिणाम भोगावे लागत असतील तर यासाठी एक काम करावे म्हणजे आपली स्थिती पूर्ववत होईल.
यासाठी आपल्या मुलीला सांगावे कि गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो तिने आपल्याला भेट म्हणून द्यावी हे खूप शुभ असते. कारण घरच्या मुलीने घरासाठी गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो भेट म्हणून दिला तर यामुळे घरात बरकत राहील तसेच देवी लक्ष्मीही आपल्या घरात कायमचे वास्तव्य करेल.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments