नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,ज्योतिषशास्त्रानुसार मेष ते मीनपर्यंत 12 राशी आहेत. या 12 राशींमध्ये 9 ग्रहांचं गोचर होत असतो. या गोचराचा काही राशींवर शुभ, तर काही राशींवर अशुभ परिणाम होत असतो.
ग्रहांची स्थिती, स्थान, नक्षत्र राशींनुसार परिणाम देत असतात. व्यक्तीच्या जीवनातील चढ-उतार ग्रहांच्या स्थिती आणि महादशा-अंतर्दशा यावर अवलंबून असते.
ग्रहाचा गोचर म्हणजे एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणे.
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यापासून राहु केतुपर्यंत सर्व ग्रहांची स्वत:ची एक गती आहे. नवग्रहांमध्ये चंद्राचे संक्रमण सर्वात कमी कालावधीचं असून दर सव्वा दोन दिवसांनी गोचर करतो. तर शनिच्या संथ गतीमुळे अडीच वर्षांनी राशी बदल करतो. सप्टेंबर महिन्यात ग्रहांची चलबिचल पाहायला मिळेल. सूर्य, बुध, शुक्र राशी बदल करणार आहे.
1.मेष राशी: मेष राशीच्या लोकांसाठी महिन्याची सुरुवात आनंददायी होईल. आर्थिक दृष्टिकोनातूनही हा महिना अनुकूल असणार आहे. इतकेच नाही तर कोणत्याही वादामुळे तुम्ही काही काळ तणावात राहू शकता.
प्रेम संबंधांच्या बाबतीत महिना चांगला जाणार आहे. पण जोडीदाराच्या रागामुळे तुमचा स्वभावही थोडा चिडचिडा होऊ शकतो. तुमच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर या महिन्यात कार्यक्षेत्रात अपेक्षित यश मिळण्याचा योग आहे.
तुम्हाला खूप ताजेतवाने आणि उत्साही वाटेल. व्यावसायिकांसाठी चांगला काळ आहे. त्यांना चांगला नफाही मिळू शकतो.
2. मिथुन राशी: सप्टेंबर महिन्यात तुमच्या चतुर्थ भावात म्हणजे सुख आणि मातेच्या स्थानात मंगळ आणि सूर्य हे दोन्ही अग्नि तत्वाचे भ्रमण असेल. त्यामुळे मिथुन राशीच्या लोकांना या काळात कौटुंबिक जीवनात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
या काळात तुम्हाला संयमाने पुढे जाण्याचा आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.
3.सिंह राशी: सप्टेंबर महिन्यात 16 तारखेला सूर्य ग्रह तुमच्या दुसऱ्या घरात प्रवेश करेल. या स्थानात मंगळ 6 सप्टेंबरपासून विराजमान असेल. त्यामुळे सामाजिक क्षेत्रात तुम्ही तुमच्या बोलण्याने एखाद्याला दुख होऊ शकतो.
तथापि, महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या तृतीय भावात शुक्राचे भ्रमण असल्यामुळे कला, शिक्षण इत्यादी क्षेत्रात यश मिळू शकते.
4.कन्या राशी: या महिन्यात सूर्य आणि मंगळ तुमच्या राशीत भ्रमण करणार आहेत. त्यामुळे हा सप्टेंबर महिना तुमच्यासाठी आव्हानात्मक ठरू शकतो. तुमचे मन शिक्षण आणि धार्मिक कार्यांपासून दूर जाऊ शकते.
यासोबतच तुमच्या राशीतील सूर्य आणि मंगळाची स्थिती तुम्हाला नाराज करू शकते. या काळात रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग-ध्यानाची मदत घ्यावी.
5.मीन राशी: मीन राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना व्यवसायात प्रचंड नफा घेऊन येईल. महिन्याच्या 14 तारखेनंतर तुमच्यासाठी परिस्थिती अधिक चांगली होईल. मात्र, या काळात नोकरी व्यावसायिकांच्या बदलीची शक्यता आहे.
मात्र, सध्या स्पर्धेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना हा काळ अनुकूल नाही. इतर विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल राहील. मात्र, एखाद्या व्यक्तीमुळे अस्वस्थ स्थिती उद्भवू शकते.
6. कुंभ राशी: या महिन्यात खूप चांगले परिणाम मिळू शकतात. तुम्ही पूर्ण ताकदीनिशी कार्यक्षेत्राच्या शिखरावर जाल आणि यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे चांगले दिवस सुरू होतील.
या काळात या राशीच्या अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होऊ शकतात. प्रेमप्रकरणाच्या बाबतीत हा महिना तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे. या महिन्यात तुमचे नाते पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होईल.
नोकरदार लोकांचे त्यांच्या बॉसशी संबंध सुरुवातीला नकारात्मक आणि नंतर सामान्य असतील.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments