नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, हिंदू पौराणिक कथांनुसार, या दिवशी भगवान शिव यांनी आपले पुत्र गणेशाचे नाव सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून घोषित केलं होतं, त्यामुळे या दिवसाचे विशेष महत्त्व मानले जाते.
तसेच श्री गणपतीना विघ्नहर्ता म्हणतात, त्यांची पूजा केल्याने सर्व समस्या दूर होतात आणि म्हणूनच गणपतीच्या चतुर्थीला संकष्टी असं म्हटलं जातं.
म्हणून या दिवशी गणपतीची पूजा केल्याने तुमची सर्व त्रास दूर करून आपल्याला श्री गणपतीला प्रसन्न होत असतात.त्यामुळे अनेक लोक या दिवशी व्रत उपवास करीत असतात आणि काही मंत्रजप करीत असतात.
त्यामुळे जर तुम्हीही या विशेष दिवशी या विशेष मंत्राचा जप केल्यास, आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होईल आणि श्री गणेश आपल्यावर प्रसन्न होतात.
याशिवाय कोणतेही कार्य सुरू करण्यापूर्वी आपण श्रीगणेशाचे पूजन करतो, कारण श्री गणेश आपल्या सर्व प्रकारच्या अडचणी आणि समस्या तसेच सर्व विघ् दूर करून आपल्या कार्यांमध्ये यश मिळवून देतात.
तुमच्या जीवनात काही अडचणी किंवा समस्या येत असल्यास किंवा नोकरीमध्ये बढती मिळत नाही, व्यापार धंद्यात तोटा होतोय, तर या सर्व समस्यांचे निवारण करण्यासाठी, विघ्नांचा नाश करण्यासाठी या संकष्ट चतुर्थीला सकाळी लवकर हा उपाय करावा.
12 नोव्हेंबर, 2022 शनिवारचा दिवस आलेला आहे आणि या दिवशी संकष्टी चतुर्थी आलेली आहे. त्यामुळे या दिवशी भगवान श्री गणेशाची पूजा आराधना करण्याचा दिवस मानला जातो.
कारण ही तिथी श्रीगणेशांना अत्यंत प्रिय आहे, श्री गणेश हे प्रथम पूजनिय आहेत. त्यामुळे त्यांना विघ्नहर्ता आणि सुखकर्ता आणि दुखहर्ता म्हटलं जातं.जे भक्त मनोभावे श्रीगणेशाची पूजा करतात, त्यांच्या नावांचा उच्चार करतात, त्यांच्या जीवनातील सर्व विघ्नांचा आणि सर्व दुःखांचा श्री गणेश नाश करतात.
काही वेळा आपल्या जीवनामध्ये अनेक वेळा असं होतं की, आपण अगदी महत्त्वाचं असं मोठं एखादं काम पद्धत कामांमध्ये आपल्यालाही यश मिळत नाही. अनेक प्रयत्न करून देखील त्यात सतत अडथळे निर्माण होतात,
म्हणजेच आपल्या जीवनामध्ये एकामागून एक विघ्न येत असतात, तर या विघ्नांचा नाश करण्यासाठी संकष्ट चतुर्थीला सकाळी उठल्यानंतर आपल्याला काही शब्द बोलायचे आहेत, ज्यामुळे आपल्या जीवनातील सर्व विघ्नांचा नाश होईल.
आपल्या जीवनातील सर्व विघ्ने दूर करून आपली कार्य निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी आपल्याला या संकष्टी चतुर्थीला सकाळी लवकर उठून स्नान आधी निवृत्त व्हायचं आहे आणि देवघरातील नित्य पूजा करायचे आहे.
आणि नंतर एक चौरंग मांडून त्यावर लाल वस्तू बनवायचा आहे, यावर श्री गणेशाची मूर्ती स्थापित करायचे आहे.श्री गणेश मूर्तीला धूप-दीप दाखवायचा आहे आणि चंदनाने टिलक करायचा आहे आणि अखंड अक्षता अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर श्री गणेशाला प्रिय अशा मोदकांचा नैवेद्य दाखवला आहे.
ही पूजा झाल्यानंतर श्री गणेश यांच्या काही नावांचा उच्चार आपल्याला करायचे आहे. या नावांचा जर आपण श्रद्धापूर्वक स्मरण केलं, तर श्रीगणेश प्रसन्न आपले जीवनातील सर्व विघ्न दूर करतात.
या नावांचा उच्चार करताना आपल्या डोळे झाकून मन एकाग्र करायचा आहे आणि या नावाचा उच्चार करायचा आहे..
” गणपती, विघ्नराज ,लंबतोंड गजानन, हेरंब, एकदंत ,गणादीप, विनायक, पशुपाल आणि भवनधज ही गणपतीचे नाव आहेत.
या नावाचा उच्चार पूजा झाल्यानंतर करायचा आहे. अशा प्रकारे पूजा करून या गणपतीच्या नावांचा उच्चार तुम्ही नक्की करू शकता. गणपती हे विघ्नविनाशक आहेत,ते आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर करतील.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments