नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, हिंदू धर्मात सौभाग्य अलंकारांमध्ये सर्वात महत्वाचा दागिना म्हणजेच मंगळसूत्र होय. हा दागिना वैवाहिक जीवनाचे तसेच पतीचे आयुष्य सुरक्षित रहावे म्हणून घातला जातो.
हिंदू धर्म शास्त्रानुसार मंगळसूत्र परिधान करण्याचे काही नियम सांगितले आहेत. त्याचे पालन जर प्रत्येक विवाहित स्त्रीने केले तर तिच्या पतीचे आयुष्य, त्यांचे वैवाहिक जीवन सुखी होऊ शकते.
सौभाग्य अलंकारांमध्ये प्रत्येक दागिन्यांचे एक विशेष महत्व आहे मग ते धार्मिक असो किंवा आरोग्यासाठी असो. दागिने घातल्यामुळे स्त्री सौंदर्य खुलून दिसते फक्त इतकेच नाही तर त्या दागिन्यांमुळे तिचे आरोग्य निरोगी राहते, उत्तम राहते.
त्यामुळे या दागिन्यांचे महत्व आपल्या शास्त्रात जे सांगितले आहे ते माहीत असायलाच हवे.
सर्वात महत्वाचे म्हणजे स्त्रीने आपले मंगळसूत्र कधीही काढू नये असे केल्याने आपल्या पतीचे आयुष्य कमी होते. तसेच विवाहित स्त्रीने तिचे मंगळसूत्र इतर कोणत्याही स्त्रीला मग ती कितीही जवळची असुदेत देऊ नये.
आपले सौभाग्य दुसऱ्या कोणाला देऊ नये, अगदी काहीही झाले तरी सुद्धा. असे केल्यास पती पत्नीच्या नात्यात प्रेम कमी होऊन दुरावा येतो. असे परिणाम टाळण्यासाठी तुम्ही कोणालाही मंगळसूत्र देऊ नका.
मंगळसूत्रात काळे मणी जरूर असावेत. पारंपारिक मंगळसूत्र काळ्या मण्यांचे होते. काळे मणी नजर दोषांपासून आपले रक्षण करतात. आपले वैवाहिक जीवन सुरक्षित ठेवतात.
आपले पतीसोबत त्यामुळे वाद होत नाहीत. वैवाहिक सौख्य राहते. मंगळसूत्र हे शास्त्रानुसार सोन्याचेच हवे असे सांगितले जाते. तुमची जर परिस्थिती नसेल तर तुम्ही थोडे तरी सोने मंगळसूत्रात घाला.
मंगळसूत्र हे लग्नातील पवित्र बंधन मानले जाते. त्यामुळे प्रयत्न करा की मंगळसूत्र हे सोन्याचे असेल.
आजकाल फॅशन म्हणून कोणत्याही प्रकारचे मंगळसूत्र वापरण्याची पद्धत आली आहे, त्यासाठी लोक काहीही करत असतात, परंतु मंगसूत्रातील वाट्या या कपाच्या आकाराच्या हव्यातच.
त्या वाट्या म्हणजे हळदी व कुंकुचे प्रतिक मानले जाते तसेच पती व पत्नीचे प्रतीक मानले जाते. हिंदू धर्म शास्त्रानुसार मंगसूत्रातील वाट्याना खूप महत्व आहे, म्हणून तुम्ही कपच्या आकाराच्या दोन वाट्या असणारे मंगळसूत्र खरेदी करा.
असद केल्याने तुमचे वैवाहिक जीवन सुखी राहते, तुमच्या पतीचे आयुष्य वाढते व तुमचा संसार सुखाचा व सुरक्षित राहतो.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments