पतींच्या दीर्घायुष्यासाठी करा चमत्कारिक उपाय, घरांत सुख-समृद्धी येईल..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, पतींच्या दीर्घायुष्यासाठी करा चमत्कारिक उपाय, घरांत सुख-समृद्धी येईल..

विवाहित स्त्रीची ओळख तिच्या मंगळसूत्र वरून होते. ज्यावेळी एखाद्या मुलीचे लग्न होते, त्यावेळी सर्वात आधी तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातले जाते. मंगळसूत्र म्हणजे काळ्या मण्यांच्या सरीमध्ये दोन सोन्याच्या वाट्या आणि चार सोन्याचे मणी ओवलेले असतात.

याचबरोबर मंगळसूत्र म्हणजे पती बद्दलचे प्रेम आणि आदराचे प्रतीक आहे.तसेच पतीवरील सर्व संकटांचे रक्षण करण्याचे हे एक साधन आहे.

मंगळसुत्रातील 2 दोरे म्हणजे पती-पत्नीचे बंधन होते. तसेच 4 सोन्याचे मणी म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ होय. मंगळसुत्रातील दोन वाट्या म्हणजे सासर आणि माहेर. मंगळसुत्रातील एक वाटी शिवाची आणि सासरच्या शक्तीचे प्रतिक आहे.

शिवशक्तीचा सांभाळ करायचा असतो. तर 2 वाट्यात घुसणारी तार असे सांगते की, आता माहेरच्या कुलदेवीची उपासना सोडून सासरच्या कुलदेवीची उपासना करावी.

ही परवानगी हिंदू धर्मापासून मंगळसूत्र द्वारे दिले जाते. माहेरच्या वाटीत हळद आणि सासरच्या वाटीतत कुंकू भरून देवीचे स्मरण करून मंगळसूत्र पूजन केले जाते. मंगळसूत्र गळ्यात बांधले जाते.

लग्नाच्या वेळी मंगळसूत्र नवरा मुलगा नवरीच्या गळ्यात बांधतो आणि तेव्हापासून ते पती-पत्नी होता. मग त्यानंतर ती स्त्री ते मंगळसूत्र आयुष्यभर गळ्यात ठेवते. मंगळसूत्र हा फक्त दागिना नसून, ते भारतीय स्त्रीचे श्रीधन आहे.

मंगळसूत्राला संस्कृतमध्ये मांगल्य तंतू असे म्हटले जाते. म्हणजे मंगल करणारा दोरा. तसेच मंगळसुत्रची लांबी पोटापर्यंत असावी, कारण तेथे अनाहत चक्राचे स्थान आहे. त्याच्या दोन्ही वाट्याचा अनाहत चक्राचे स्पर्श झाला पाहिजे.

यामुळे स्त्रियांचे मन चित्त शांत राहते. या चक्रामधून स्त्रीला आत्मिक शांती मिळते आणि त्याचा प्रभाव संपूर्ण घरावर पडतो. मंगळसूत्रात सर्व राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते, परंतु त्याचे महत्त्व सगळीकडे सारखे आहे.

तामिळनाडू आणि केरळ या प्रदेशांमध्ये ताली नावाचा एक सौभाग्य अलंकार वधूच्या गळ्यात बांधण्याची पद्धत आहे, त्यावरून लग्नाच्या वेळी वधूच्या गळ्यात मंगळसूत्र बांधण्याची प्रथा चालू झाली असावी.

कुंकू-चुडा याप्रमाणे मंगळसूत्र हे सौभाग्याचं प्रतीक असून ते घालून पतीला दीर्घायुष्य याची प्राप्ती व्हावी, अशी प्रार्थना पत्नी सदैव करीत असते. आजकाल मंगळसूत्रमध्ये खूप वेगवेगळ्या डिझाइन्स तयार करतात.

तसेच महिला फॅशन म्हणून किंवा आवडीचे म्हणून या नवनवीन मंगळसूत्र गळ्यात घालतात. त्यामुळे स्त्रिया कितीही आधुनिक झाल्या तरी मंगळसुत्र घालण्याची प्रथा काही बंद होवू शकत नाही.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!