नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, 29 सप्टेंबर, भाद्रपद पौर्णिमा पिंपळाच्या झाडाखाली लावा 9 दिवा..
भारतात अनेक लोक रोज पूजा अर्चना करत असतात. आपल्या जीवनातील दुःख संकटे कष्ट दूर करण्यासाठी अनेक प्रकारे व्रत उपासना करत असतात जेणेकरून त्यांच्या आयुष्यामध्ये सुख-शांती-समाधान येऊ शकेल .
आपल्या हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला खूप महत्त्व आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर पिंपळाच्या झाडाकडे पाहिले गेल्यास तर हे झाड मानवासाठी उपयुक्त सिद्ध ठरते आहे कारण हे रात्री आणि दिवसा दोन्ही वेळ ऑक्सिजन सोडत असते.
पद्मपुराणाचा नुसार पिंपळाचे झाड हे श्रीविष्णूचा अवतार असल्यामुळे या झाडाची पूजा केली जाते. यामुळे आपल्याला हवे असलेले इच्छित फळ मिळते. पिंपळाच्या झाडा मध्ये श्रीविष्णूचा वास तर असतोच
पण पौर्णिमेच्या दिवशी माता महालक्ष्मी चा सुद्धा वास असतो. पद्म पुराणानुसार पिंपळाचे पूजन व प्रदक्षणा केल्यास आपले आयुष्य वाढते.
जे व्यक्ती पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करतात अशा व्यक्तींना सर्व पपातून मुक्तता मिळते आणि त्यांना स्वर्गाची दारे खुली होतात. पिंपळा मध्ये सर्वतीर्थ असल्याचे सुद्धा मानले असल्याचे सुद्धा मानले जाते.
पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यास आपल्याला शनिदेवाच्या प्रकोपापासून संरक्षण लागते आणि श्री शनि देवची आपल्यावर कृपा होते.. पिंपळाच्या झाडावर माता महालक्ष्मी ची बहीण अलक्ष्मी ही सुद्धा वास करत असते.
म्हणून या झाडाचे सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत पर्यंतच पूजन करावे त्यानंतर पूजन करू नये.त्याने तुमच्या घरात दारिद्र्य येऊ शकते.रात्री या झाडाचे पूजन केल्यास आपल्याला दारिद्र्य व गरिबी येते.
ज्या व्यक्ती शनिवारी या झाडाची पूजा करतील त्या व्यक्तीला शनि दोषापासून मुक्तता मिळेल. त्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची सुद्धा कृपा होईल परंतु शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे त्या व्यक्तीवर श्रीशनिदेवाची कृपा होते.
फक्त रविवार सोडून पिंपळा च्या झाडा ची पूजा करणे शुभ असते .परंतु अमावस्या व पौर्णिमा या दिवशी केलेले पूजन खूपच लाभदायक ठरते. दर शनिवारी एक मातीचा किंवा पितळेचा दिवा घ्यावा
त्यात राईचे तेल टाकून काळ्या दोऱ्याची वात टाकावी आणि किंवा एक रुपयाचे नाणे टाकावे व हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा.या उपयने शनिदेवाच्या कोपा पासून संरक्षण होते.
दिवा लावताना दिव्याची तोंड पश्चिम दिशेला आले पाहिजे. कारण पश्चिम दिशेचे स्वामी श्री शनिदेव आहेत,असे केल्याने आपल्यावर शनि देवाची कृपा होते.
जर तुम्ही पितृदोष याने पीडित असाल असाल किंवा जर तुमच्या पितरांना तुम्हाला प्रसन्न करायचे असेल पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावायचा आहे. तुम्हाला सर्पदोष पासून मुक्तता साठी दिव्यामध्ये वात बनवून त्यात थोडसे काळे तीळ मिसळायचे आहे
आणि हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे.या दिव्याची वात कोणत्याही दिशेला नसावी सरळ मधोमध वरच्या दिशेला जाणारी असावी .आणि भगवान विष्णू यांचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप कराव.
शनी दोषापासून मुक्तता पाहिजे असेल तर ओम शं श्री शनेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. जर पितृदोष यापासून मुक्तता पाहिजे असेल
तर ओम पितृ भ्यो नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments