नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,हिंदू धर्मात विविध सण-समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. पितृ पक्ष संपला की अश्विन महिन्याची सुरूवात होते. अश्विन महिन्याच्या सुरूवातीलाच अश्विन नवरात्र सुरू होते.
हिंदू धर्मात अश्विन नवरात्रीला महत्वाचे स्थान प्राप्त आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 विविध रूपांची पूजा केली जाते. संपूर्ण वर्षभरात एकूण चार नवरात्री असतात.
पहिली नवरात्री चैत्र महिन्यात असते तर शारदीय नवरात्री जी अश्विन महिन्यात साजरी केली जाते आणि इतर दोन नवरात्री ह्या गुप्त स्वरूपात असतात. परंतु चैत्र आणि अश्विन नवरात्रीला भारतात मोठ्या प्रमाणात साजरी केले जाते.
दरम्यान, आता लवकरच शारदीय नवरात्र सुरू होणार आहे. ही नवरात्र अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजरी केली जाते. हिंदू पुराणांच्या मते, नवरात्रीच्या 9 दिवसांच्या काळात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते.
तसेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. यंदा 26 सप्टेंबर रोजी नवरात्रीचा पहिला दिवस आहे. तर 4 ऑक्टोबरला नवरात्रीचा शेवटचा दिवस असणार आहे.
नवरात्र उत्सव म्हणजे नऊ दिवस चालणारा हिंदू धर्मातील देवीचा उत्सव. तसे पाहायला गेले तर आपल्या हिंदू धर्मात सर्वच उत्सव विविध प्रकारे साजरे केले जातात.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केली जाते. तसेच आत्ता नवरात्र उत्सव संपणार आहे. तसेच यावर्षी 9 व्या दिवशी दसरा साजरा केला जाईल,
म्हणून 26 सप्टेंबरपासून संपूर्ण देशात उत्साहाने व आनंदाने दसरा साजरा केला जाईल. मात्र, आपल्या नवरात्रीनंतर एक उपाय करायचा आहे..
ज्योतिषशास्त्रानुसार हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे. 26 सप्टेंबरपासून सुरू होणारा नवरात्रोत्सव 4 ऑक्टोबर पर्यंत साजरा केला जाईल आणि 5 ऑक्टोबर रोजी विजय दशमीला दुर्गा विसर्जनाने त्याची सांगता होईल.
या नऊ दिवसांत भाविक विविध प्रकारे देवीची उपासना करतात. या उपासनेचा एक भाग म्हणून नऊ दिवस सातत्याने दिवा तेवत ठेवला जातो. या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनासोबतच अखंड ज्योतीही प्रज्वलित केली जाते.
मात्र केवळ दिवा तेवत ठेवून भागणार नाही, तर त्याच्याशी संबंधित गोष्टींचीही काळजी घेणे महत्त्वाचे ठरते.
अखंड ज्योती म्हणजे जी खंडित होत नाही किंवा अविरत जळत राहते. नवरात्रीत जागरणही केले जाते. अखंड तेवणारा दिवा हे जागृतीचे प्रतीक आहे. ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत मालवू न देता अखंड तेवत ठेवली जाते,
तशी आपली आत्मज्योत सदैव तेवत राहावी आणि आपण सदैव जागृत राहावे, याची जाणीव करून देण्यासाठी नवरात्रीत नऊ दिवस दिवा अखंड तेवत ठेवला जातो.
ज्योतिषशास्त्रानुसार अखंड ज्योती हे अखंड श्रद्धेचे प्रतीक आहे. अशा वेळी देवीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा. यदाकदाचित ज्योत मालवली, तर छोट्या निरांजनाने पुन्हा ज्योत प्रज्ज्वलित करा.
असे मानले जाते की दिव्यासमोर मंत्राचा जप केल्याने हजारो पटींनी अधिक पुण्य प्राप्त होते. दिव्याच्या मंद प्रकाशात देवीसमोर बसून ध्यानधारणा केल्यास मन लवकर एकाग्र होते.
तसेच हा चमत्कारिक उपाय म्हणजे ही नवरात्रीत वापरलेली अखंड ज्योती ही तुमच्या तिजोरीत एका कोपऱ्यात ठेवावे…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments